डिस्क्लेमरः हे लेखन केवळ विरंगुळा म्हणून घ्यायचे आहे.
नुकताच एका सदस्याने स्वयंपाक येणे/करणे यावरून एक धागा काढला आहे. लग्न करण्यापूर्वी सांगितलेल्या किंवा अपेक्षित धरलेल्या गोष्टी प्रत्यक्षात न झाल्यामुळे होणार्या मनस्तापाविषयी तो धागा आहे.
आजकाल लग्न ठरताना आणि ठरल्यावर प्रत्यक्ष लग्न होण्यापूर्वी एकमेकांना भेटण्याची बरीच संधी मिळते. त्या वेळी एकमेकांना थोडेफार समजून घेणे, आवडीनिवडी जाणणे, विचार जाणून घेणे हे अपेक्षित असते.
सहसा या आजमावण्याच्या काळातले विषय म्हणजे देवधर्मविषयक, साहित्य, संगीत, नाटक सिनेमा, मुले, कुटुंब नियोजन, मुलगी नोकरी करणार की नाही, पैसा कमावणे/खर्चणे, भविष्यातील स्वप्ने, एकत्र/विभक्त कुटुंब (आणि स्वयंपाक) वगैरे.
पण काहीकाही साधे साधे विषय जे या आजमावण्यात कधीच येत नाहीत. पण ते नंतर त्रासदायक ठरू शकतात. ते अगदी रोज दाढी करणे/न करणे वगैरे ट्रिविअल पण असू शकतात.
उदाहरणार्थ:
दोन्ही जोडीदारांपैकी एकाला ढणाढणा पंखा लावून बसण्या/झोपण्याची सवय असणे आणि दुसर्याला जरासा पंखा असला तरी लगेच सर्दी, डोकेदुखी होणे.
आता लग्नापूर्वी एकमेकाला "झोपताना पंखा लागतो का/चालतो का?" असे कोणी विचारणार नाही. पण जेव्हा झोपायची वेळ येते तेव्हा दोघांपैकी एकाला तडजोड भाग पडणे आणि त्रास होणे* हे नक्कीच.
*त्रास दोघांना होणार की एकाला हे त्या व्यक्तींवर अवलंबून आहे. आपल्यासाठी दुसरा त्रास झेलतोय या विचाराने पहिल्याला त्रास होऊ शकतो.
(आता लोक म्हणतील की एसी लावायचा. पण तो पर्याय खारिज. ब्रेड मिळत नाही तर केक खा हे चालणार नाही)
एकाला तिखटजाळ जेवायची सवय आणि दुसर्याला सपक जेवणाची सवय.
चला तर अनुभवी पतींनो आणि पत्नींनो !!! आपण अशा विषयांची यादी करू या. म्हणजे आपल्या लग्नोत्सुक मिपाकरांना आणि मिपाकरणींना मानसिक तयारी करायला बरे पडेल.
नितिन थत्ते
वाचने
3862
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
उदाहरणार्थ:
प्र.का.टा.आ.
सुसंवाद
आवड
च्यायला नखरे नुस्ते!! आमच
दोन्ही जोडीदारांपैकी एकाला
>>आमचीच कहाणी सांगताय राव. हा
In reply to दोन्ही जोडीदारांपैकी एकाला by नीधप
तुम्ही पण आमचीच कहाणी सांगताय
In reply to >>आमचीच कहाणी सांगताय राव. हा by गणपा
अखिल भारतीय
In reply to तुम्ही पण आमचीच कहाणी सांगताय by स्पंदना
आमचा अपवादच म्हणायचा! दोघंही
In reply to अखिल भारतीय by ऋषिकेश
आमच्या बाबतीत
=)) =)) =)) =)) लै
In reply to आमच्या बाबतीत by विकास
तडजोड
प्रतिसाद देणार होतो पण अवांतर
बाकी सर्व सोडा.. पंख्याच्या
केक
In reply to बाकी सर्व सोडा.. पंख्याच्या by भारतीय