Skip to main content

आपण मराठी लोक

लेखक पारुबाई यांनी सोमवार, 26/07/2010 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
सहज जाता जाता एक गम्मत सांगावीशी वाटली. आपल्या मराठी लोकांबद्दल काय बोलले जाते हे सांगण्याकरता हे लिहिते आहे. काल आम्ही इथे ओकलंड ,अमेरिका मध्ये शंकर एहसान लॉय यांच्या कॉन्सर्टला गेलो होतो. मला त्या कार्यक्रमाविषयी काही लिहायचे नाही आहे.एखादी कॉन्सर्ट जशी मस्त रंगते तशीच रंगली. मजा वेगळीच आहे. गाण्याच्या मध्येमध्ये निवेदक काही न काही गंमत करून वेळ भरून काढतात ना तसा तो निवेदक आला आणि ......... इथे किती गुजराथी श्रोते आले आहेत ?मग गुजराथी लोकांनी हात वर केले.मग त्यांच्यावर त्याने काही जोक्स केले. असेच तो निवेदक मग किती साउथ इंडिअन आहेत,किती पंजाबी आहेत असे विचारात होता,आणि त्या त्या प्रत्येक लोकांवर तो एक एक जोक करत होता. शेवटी तो आला महाराष्ट्रीयन लोकावर ? अरे किती मराठी लोक आले आहेत ? आम्ही हात वर केले.अजून बर्याच लोकांनी हात वर केले. मग तो म्हणाला......अरे वा! म्हणजे महाराष्ट्रातले लोक खर्च करू लागले आहेत तर! मराठी लोक म्हणजे लोक खर्च करायचा आहे म्हटल्यावर म्हणतात त्यात काय पहायचय? TV वर पाहता येईल कि. आता गाडी इतक्यावर च थांबली नाही. त्याने अजून एक जोक आपल्या मराठी लोकांवर केला. हे मराठी लोक म्हणे हल्ली ज्याचे त्याचे मराठी मध्ये भाषांतर करू पाहतात.दिसला इंग्रजी शब्द कर भाषांतर. मध्यंतरी मुंबई च्या समुद्रावर कोणते तरी हरिकेन टायफुन येणार होते म्हणे. पण ते आतमध्ये शिरूच शकले नाही. का तर...... मुंबई मधील लोक म्हणाले," त्याला जोवर मराठी नाव आम्हाला सापडत नाही तोवर त्याला आत येवू देणार नाही."
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3651
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

त्या निवेदकाची निरीक्षणशक्ती उत्तम आहे हेच म्हणावे लागेल. बाकी जे सत्य आहे ते बदलणार नाही. आणि आपणही " लोक नाव ठेवतात" म्हणुन बदलु नये. आपण जे आहोत ते आहोत, आणि व्यवस्थित आहोत. गुजराथ्याना नाव ठेवली तर ते बदलतील का? बिलकुल नाही. त्यामुळे "तुका म्हणे उगे रहावे, जे जे होइल ते ते पहावे"

प्रत्येक प्रांताबद्दल काही उण घेउन बाकिच्या लोकांला हसवण हे त्याच काम! ते त्यान केल.. आता काही मार्मिक बोलल तरच हसु फुटत हे ही खरच. तसे आपण महाराष्ट्रियन कष्टाळु कारण निसर्ग दत्त मिळवण्यासाठी आपल्याला झुंजाव लागत. साधी वाट चढायची म्हंटल तर घाट लागतात आप्ल्या इथे त्यामुळे असलेल जपुन वापरायची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आपली, आता हे सगळ ज्याला कधी बघुन ही माहित नाही त्याला काय सांगणार?

निवेदकांना कार्यक्रमात सर्वच समुदायाला खुश ठेवायचे असते आणि हलके फुलके वातावरणही जपायचे असते. मग अशा ट्रिक्स वापरून ते सर्वांना हसायला लावतात. बाकी त्यांनी केलेल्या विधानांमध्ये तथ्य तर नक्कीच आहे! पण मराठी माणसाच्या खिशातही आता पैसा खुळखुळायला लागलाय आणि त्याला तो पैसा खर्च करायची इच्छा होत आहे हेही चांगलेच म्हणायचे! :) -- अरुंधती

केरळी लोकांच्या उच्चाराबद्दल बर्‍याच गमती सांगितल्या जातात. वैय अ मेळ्ळू ग्वो टू गेल्फ्....सिम्बळी ठू यर्न म्नी.

चालायचेच.. त्याचा कार्यक्रम फालतु आहे हे इतर मराठी लोकांना तिकिट काढुन न बघता देखील लक्षात आले ह्याचा राग असावा तो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हा हा हा आजकाल भारतीय, हिंदू, मराठी यांच्यावर टिका करणे हा प्रसिद्धिचा शॉर्टकट आहे असे अनेकांना वाटते.

In reply to by अवलिया

ऑल ऑरवेलीयन्स आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल हेच खरे... (ऑरवेलियन्स हा शब्द अवलियन्स असा वाचू नये, त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही...)

मला वाटते स्वतःवर हसायला शिकावे. त्याने सगळ्यांवरच जोक केले ते त्या त्या लोकांना लागले असतीलच बहुधा. बाकी या आरोपवजा जोक्स मधे काहीच दम नाही. कंजूस आणि पराकोटीचे भाषादुराभिमानी तर मी नक्कीच इतर भाषिक लोकात खूप बघितलेले आहेत. पण या जोकवर राग आला असेल तर ही बोधकथा वाचा. (मला एवढेच म्हणायचे आहे की हे आरोप तुम्हाला कुठे तरी खरे वाटत असतील का?) एक राजा असतो. तो खूप शूर आणि दयाळू इ. इ. असतो. त्याच्या दरबारात एक विदूषक असतो. त्या विदूषकाला काहीही बोलायची सूट दिलेली असते राजाने. त्या प्रमाणे एकदा दरबारत तो विदूषक असेच मनोरंजन करत असताना गंमत म्हणून राजाला ***** अशी शिवी देतो. राजा खो खो हसतो. मग विदूषक परत ***** अशी शिवी देतो. राजा अजून हसतो. तेवढ्यात विदूषक राजाला 'ए टकल्या' असं म्हणतो. तेव्हा मात्र राजा खवळतो आणि ताबडतोब त्या विदूषकाला कैदेत टाकतो. लोकं चक्रावतात. पण खरं कारण असं असतं की तो राजा खरंच टकलू असतो आणि ते त्याने महत्प्रयासाने लपवलेलं असतं. चुकून का होईना विदूषक सत्य बोलतो आणि ते राजाला सहन होत नाही.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विद्वान स्त्री चा उल्लेख जेव्हा विदुषी असा होतो तेव्हा मला जाम हसायला येत. बाकी कधी तरी बरी नव्हे ही थट्टा लिहाव लागत.

गुजराथी लोकावर केलेला जोक असा होता ...हे नवरा बायको पण एकमेकांना भाई आणि बेन म्हणतात. साउथ इंडिअन लोकावर असा जोक केला कि हे लोक ग्लोबल वार्मिंग ला मदत करतात.त्यांना प्लास्टिकची पिशवी वापरायला आवडत नाही.ते सगळे समान लुंगी मधूनच घेवून येतात. गुजराथी ,साउथ वाले, मराठी ......सगळ्याच लोकांनी हे खेळीमेळीने घेतले. स्वतः वर पण ते हसले आणि इतरांवर पण.