त्या निवेदकाची निरीक्षणशक्ती उत्तम आहे हेच म्हणावे लागेल. बाकी जे सत्य आहे ते बदलणार नाही. आणि आपणही " लोक नाव ठेवतात" म्हणुन बदलु नये. आपण जे आहोत ते आहोत, आणि व्यवस्थित आहोत. गुजराथ्याना नाव ठेवली तर ते बदलतील का? बिलकुल नाही. त्यामुळे "तुका म्हणे उगे रहावे, जे जे होइल ते ते पहावे"
प्रत्येक प्रांताबद्दल काही उण घेउन बाकिच्या लोकांला हसवण हे त्याच काम! ते त्यान केल.. आता काही मार्मिक बोलल तरच हसु फुटत हे ही खरच. तसे आपण महाराष्ट्रियन कष्टाळु कारण निसर्ग दत्त मिळवण्यासाठी आपल्याला झुंजाव लागत. साधी वाट चढायची म्हंटल तर घाट लागतात आप्ल्या इथे त्यामुळे असलेल जपुन वापरायची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आपली, आता हे सगळ ज्याला कधी बघुन ही माहित नाही त्याला काय सांगणार?
निवेदकांना कार्यक्रमात सर्वच समुदायाला खुश ठेवायचे असते आणि हलके फुलके वातावरणही जपायचे असते. मग अशा ट्रिक्स वापरून ते सर्वांना हसायला लावतात.
बाकी त्यांनी केलेल्या विधानांमध्ये तथ्य तर नक्कीच आहे! पण मराठी माणसाच्या खिशातही आता पैसा खुळखुळायला लागलाय आणि त्याला तो पैसा खर्च करायची इच्छा होत आहे हेही चांगलेच म्हणायचे! :)
-- अरुंधती
मला वाटते स्वतःवर हसायला शिकावे. त्याने सगळ्यांवरच जोक केले ते त्या त्या लोकांना लागले असतीलच बहुधा. बाकी या आरोपवजा जोक्स मधे काहीच दम नाही. कंजूस आणि पराकोटीचे भाषादुराभिमानी तर मी नक्कीच इतर भाषिक लोकात खूप बघितलेले आहेत.
पण या जोकवर राग आला असेल तर ही बोधकथा वाचा. (मला एवढेच म्हणायचे आहे की हे आरोप तुम्हाला कुठे तरी खरे वाटत असतील का?)
एक राजा असतो. तो खूप शूर आणि दयाळू इ. इ. असतो. त्याच्या दरबारात एक विदूषक असतो. त्या विदूषकाला काहीही बोलायची सूट दिलेली असते राजाने. त्या प्रमाणे एकदा दरबारत तो विदूषक असेच मनोरंजन करत असताना गंमत म्हणून राजाला ***** अशी शिवी देतो. राजा खो खो हसतो. मग विदूषक परत ***** अशी शिवी देतो. राजा अजून हसतो. तेवढ्यात विदूषक राजाला 'ए टकल्या' असं म्हणतो. तेव्हा मात्र राजा खवळतो आणि ताबडतोब त्या विदूषकाला कैदेत टाकतो. लोकं चक्रावतात. पण खरं कारण असं असतं की तो राजा खरंच टकलू असतो आणि ते त्याने महत्प्रयासाने लपवलेलं असतं. चुकून का होईना विदूषक सत्य बोलतो आणि ते राजाला सहन होत नाही.
गुजराथी लोकावर केलेला जोक असा होता ...हे नवरा बायको पण एकमेकांना भाई आणि बेन म्हणतात.
साउथ इंडिअन लोकावर असा जोक केला कि हे लोक ग्लोबल वार्मिंग ला मदत करतात.त्यांना प्लास्टिकची पिशवी वापरायला आवडत नाही.ते सगळे समान लुंगी मधूनच घेवून येतात.
गुजराथी ,साउथ वाले, मराठी ......सगळ्याच लोकांनी हे खेळीमेळीने घेतले. स्वतः वर पण ते हसले आणि इतरांवर पण.
प्रतिक्रिया
आता काय?
गुजराती अन साउथ वाल्यांवरही
प्रत्येक प्रांताबद्दल काही उण
निवेदकांची हातोटी
केरळी लोकांच्या उच्चाराबद्दल
चालायचेच.. त्याचा कार्यक्रम
हा हा हा आजकाल भारतीय, हिंदू,
ऑरवेल...
ते काय म्हणतात ना ज्याची
मला वाटते स्वतःवर हसायला
विदुषी
सगळ्याच गोष्टि गंभीरपणे कशाला
तुम्ही गुजराथी, दक्षिण भारतीय
आपण मराठी लोक
ये हुई न काम की बात !!