आपण मराठी लोक
सहज जाता जाता एक गम्मत सांगावीशी वाटली.
आपल्या मराठी लोकांबद्दल काय बोलले जाते हे सांगण्याकरता हे लिहिते आहे.
काल आम्ही इथे ओकलंड ,अमेरिका मध्ये शंकर एहसान लॉय यांच्या कॉन्सर्टला गेलो होतो. मला त्या कार्यक्रमाविषयी काही लिहायचे नाही आहे.एखादी कॉन्सर्ट जशी मस्त रंगते तशीच रंगली.
मजा वेगळीच आहे.
गाण्याच्या मध्येमध्ये निवेदक काही न काही गंमत करून वेळ भरून काढतात ना तसा तो निवेदक आला आणि .........
इथे किती गुजराथी श्रोते आले आहेत ?मग गुजराथी लोकांनी हात वर केले.मग त्यांच्यावर त्याने काही जोक्स केले.
असेच तो निवेदक मग किती साउथ इंडिअन आहेत,किती पंजाबी आहेत असे विचारात होता,आणि त्या त्या प्रत्येक लोकांवर तो एक एक जोक करत होता.
शेवटी तो आला महाराष्ट्रीयन लोकावर ? अरे किती मराठी लोक आले आहेत ?
आम्ही हात वर केले.अजून बर्याच लोकांनी हात वर केले.
मग तो म्हणाला......अरे वा! म्हणजे महाराष्ट्रातले लोक खर्च करू लागले आहेत तर!
मराठी लोक म्हणजे लोक खर्च करायचा आहे म्हटल्यावर म्हणतात त्यात काय पहायचय? TV वर पाहता येईल कि.
आता गाडी इतक्यावर च थांबली नाही. त्याने अजून एक जोक आपल्या मराठी लोकांवर केला.
हे मराठी लोक म्हणे हल्ली ज्याचे त्याचे मराठी मध्ये भाषांतर करू पाहतात.दिसला इंग्रजी शब्द कर भाषांतर.
मध्यंतरी मुंबई च्या समुद्रावर कोणते तरी हरिकेन टायफुन येणार होते म्हणे. पण ते आतमध्ये शिरूच शकले नाही. का तर...... मुंबई मधील लोक म्हणाले," त्याला जोवर मराठी नाव आम्हाला सापडत नाही तोवर त्याला आत येवू देणार नाही."
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आता काय?
गुजराती अन साउथ वाल्यांवरही
प्रत्येक प्रांताबद्दल काही उण
निवेदकांची हातोटी
केरळी लोकांच्या उच्चाराबद्दल
चालायचेच.. त्याचा कार्यक्रम
हा हा हा आजकाल भारतीय, हिंदू,
ऑरवेल...
ते काय म्हणतात ना ज्याची
मला वाटते स्वतःवर हसायला
विदुषी
सगळ्याच गोष्टि गंभीरपणे कशाला
तुम्ही गुजराथी, दक्षिण भारतीय
आपण मराठी लोक
ये हुई न काम की बात !!