✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लावणी : आसं कसं वो तुमी मर्द गडी

प — पाषाणभेद, Fri, 07/23/2010 - 22:08
आसं कसं वो तुमी मर्द गडी
{{{कानडाऊ योगेशु वदला तू लावणी लिहायची फर्माईश केलीस तू पाषाणाने लिहीली लावणी आनंदाने वाचन करा आस्वाद घ्या तुम्ही सारे}}}

जमीन खोदताय निसती तुम्ही जेसीबी यंत्र येईना धड कामी खालचा वरचा गियर टाकीता अ‍ॅक्शीलेटर दाबूनी बंद पाडता गाडी पाव्हनं आसं कसं वो तुमी मर्द गडी ||धृ|| कोरस : डिझल भरलंय नव्ह टाकीत तुमी, हात लावून जरा हलवा दाजी तुमी गाडी निट चालवा दिवसाराती कामच काम, नाय दुसरं काही ठावं जळ्ळं मेलं लक्षण तुमचं, धंदा करायचं नुसतं नावं गाडी भाड्यानं कशाला लावता धंद्याची गावंना तुम्हा नाडी अहो आमदार, आसं कसं वो तुमी मर्द गडी ||१|| लई दिसांची मैतरी आपली, वाढू लागली प्रित डोक्यामदी गजरा माळूनी, साजरी करूया रात टॅक्टर दामटायचा सोडून देवून उगा म्हनं चालवू का बैलगाडी अहो मिशीवाले, आसं कसं वो तुमी मर्द गडी ||२|| गावरान आबं पिकल्याती, पेरू लागल्याती पाडाला पाडायाची आठवन पडली, बहार जड झाला झाडाला उगाच खुळ का काढीता म्हनं तुझी माझी नाय जमायाची जोडी ||३|| टोपीवालं, आसं कसं वो तुमी मर्द गडी येड्यावानी करताय सगळं, सरळ चालंना काही सांगून सांगून थकले मी ग,काम्हून वाकड्यात शिरता बाई पायात पाय आडकला तुमचा कमरंचं धोतार रस्ता झाडी अहो फ्येटेवालं, आसं कसं वो तुमी मर्द गडी ||४|| कोरस : डिझल भरलंय नव्ह टाकीत तुमी, हात लावून जरा हलवा दाजी तुमी गाडी निट चालवा - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/०७/२०१०

प्रतिक्रिया द्या
1979 वाचन

💬 प्रतिसाद (5)

बा पाषाणा,

मेघवेडा
Fri, 07/23/2010 - 22:42 नवीन
=)) =)) बा पाषाणा, धन्य आहेस!
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

विनायक प्रभू
Fri, 07/23/2010 - 23:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

प्रभो
Fri, 07/23/2010 - 23:03 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

पाषाणालाही

तिमा
Sun, 07/25/2010 - 10:03 नवीन
पाषाणालाही डिझेल फोडणारा!!! =)) =)) =)) हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

पाषाणभेदा , लै झकास्स

कानडाऊ योगेशु
Wed, 07/28/2010 - 19:56 नवीन
पाषाणभेदा , लै झकास्स मर्दा! शिट्ट्या,टाळ्या,पैसे,टोपी,फेटे..धोतर..जे काही मिळेल ते उडवुन..! कोरस ही भन्नाट! (पँटवाला) योगेश.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा