ध्वनी - गॅरे कैझर या लेखकाच्या दृष्टीकोनातून
काल फिरायला जाताना मी आणि नवरा इकडच्या तिकडच्या विषयांवरच्या गप्पा मारत होतो. सहज विषय निघाला "कोबेअर रिपोर्ट" शो चा. मध्यंतरी व्हरमाँट चा एक लेखक या शो मधे येऊन गेला. या लेखकाचं नाव "गॅरे कैझर". त्यानी या शो मधे काही नावीन्यपूर्ण विचार मांडले होते - ध्वनी या विषयावर. या लेखकाने एक पुस्तक लिहीले आहे "द अन्वाँन्टेड साऊंड ऑफ एव्ह्रीथिंग वी वाँट"
घरी जाऊन मी मी जालावर त्याचे विचार वाचले आणि पुढील काही रोचक गोष्टी सापडल्या. त्या या लेखाकाच्या शब्दात- "उपासमार, महायुद्ध, पृथ्वीचे सातत्याने वाढणारे तापमान आदि समस्यांशी तुलना केली तर ध्वनी ही अजीबात समस्या वाटत नाही. लोकांचे लक्षदेखील अजून या समस्येकडे वेधले गेलेले नाही. किंबहुना ही सार्वजनीक समस्या आहे हेच अजून ज्ञात झालेले नाही. आवाज हा तसा पाहीला तर "बारीक", "अशक्त" मुद्दा म्हणून गौण मानला जाऊही शकतो. पण हा मुद्दा वाटतो तितका "बारीक/अशक्त" नसून त्याचा भरपूर त्रास होतो. जसं लहान मुलं, म्हातारी माणसं, आजारी माणसं यांना आवाजाचा सर्वाधिक त्रास होतो. बरेचदा गरीब लोक हे आवाजाची शिकार झालेले दिसतात कारण त्यांची वस्ती रेल्वेच्या रूळांच्या, हायवे, विमानतळ आदिच्या बाजूस असते."
याच लेखकाने सर्वात सुंदर उदाहरण दिलेलं आहे ध्वनी हा दिसायला "अशक्त" पण किती भक्कम मुद्दा/समस्या आहे हे पटवून देण्यासाठी.-
थॉर नावाच्या देवास एकदा आमंत्रण दिलं गेलं - एका बलाढ्य राजाच्या अपंग, वृद्ध आईबरोबर लढण्यासाठी. थॉर हा अतिशय बलवान देव असल्याने त्याला विश्वास होता की तो सहज जिंकू शकेल. पण काय आश्चर्य! ना त्याला , तिला उचलता आलं, ना फेकता आलं ना चीत करता आलं. नंतर शेवटी थॉरच्या लक्षात आलं की दिसायला नाजूक आणि अशक्त असली तरी साक्षात वृद्धत्वाबरोबरचा तो लढा होता.
तसाच ध्वनी दिसवयास "नाजूक" पण लढा द्यायला गेलं की त्याची ताकद कळते.
वरील माहीती साभार - http://www.nytimes.com/2010/05/22/books/excerpt-the-unwanted-sound-of-everything-we-want.html
प्रतिक्रिया
>>ध्वनी
आवाज दाबला
आणि मी हँग
ह्म्म्म्म...
उपासमार,
शोर