||ससा, मधमाशा आणि मासे सारे ॥झाडून॥ अर्थात- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल||
ससा, मधमाशा आणि मासे सारे ॥झाडून॥
अर्थात- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल
आधूनिक मिपाप निती कथा
एकदा एक ससा रानातील हिरव्या गार गवतावर उड्या मारत खेळत होता. रानफ़ुलांच्या गंधानी थोडे जास्तच मोहित होऊन त्याने एक टुणकन उंच उडी मारली. त्या उडीने नेमके तिथले एक मधमाशांचे मोहोळ उठले. त्यातल्या मधमाशा ह्या बेफ़ाम उडीने दंग होऊन “ सुटल्या ”. त्यातल्या काहींनी सशाच्या कानाभोवती गुणगुणून त्याला गुदगुल्या केल्या. सशाची जरा करमणूक झाली. ते स्मित विरते न विरते तोच सशाला असे वाटले की एखाद-दोन माशांनी त्याला दंश देखील केला की काय. कदाचित खेळात असे अभावितपणे झाले देखील असेल. किंवा सशाची कातडी हळुवार असल्यामुळे त्याला जरा वाजवीपेक्षा जास्तच पिडा झाली असेल. जे काय असेल ते असो.
ह्या अनुभवाने थोडा खट्टू झालेला ससा ते रान सोडून दुसऱ्याच ठिकाणी भटकला. ते ठिकाण म्हणजे एक तलाव होता. त्यात लहान-मोठे, बारीक-जाडे, टारे-खारे, बलीया-अबलीया, कंपूबाज-एकूल अनेक मासे होते. रानातील विचित्र(?) अनुभव कोणाला तरी सांगायला ससा खूप आतूर झाला होता. आपल्याला तलाव नवीन आहे, व इथे कोण कोण पोहत आहे ह्याची सशाला काही उमज नव्हती. तलावाचे ज्ञान देखील नव्हते. तरी त्याने तलावात उडी मारली आणि रानातील बेचैन अनुभव ॥झाडून॥ साऱ्या जलचरांना सांगीतला. मास्यांना रानातली भाषा काय कळणार? समज दाखवणे तर दूरच, तलावातील मास्यांनी आपल्या स्वभाव धर्माला अनुसरून सशाच्या कोवळ्या कातडीचे लचके तोडायला सुरवात केली. काहींनी सशाची ढाल करून एकमेकांवर हल्ले सुरू केले. सशाला काही कळेना. त्याने पाण्याच्या दुसऱ्या कडेला उडी मारली. तिथे पुन्हा रानातील बेचैन अनुभव ॥झाडून॥ साऱ्या जलचरांना सांगीतला. मासेच ते! मघाचेच मासे तिथेही येऊन आपापला स्वभाव धर्म निभाऊ लागले.
शेवटी सशाने तलावाचे त्याने उडी मारलेले दोन्ही भाग व्हॅक्यूम लावून स्वच्छ केले, व काठावर येऊन बसला. त्या व्हॅक्यूम झोतातून सगळे मासे मात्र अलगद निसटून गेले.
बोध- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल ठरतात.
प्रतिक्रिया
पाहावं
"इथलं " जीवन
कदाचित
वा वा वा !!
अरे व्वा!
आपण
काहीही :-)
>>बोध-
अरे व्वा!!
अरुण मनोहर
नाना, नीती
अवलियाचे
>>परंतु
>>>काही
ससुरा ससा
हे खरे असू
विजुभाउ,
स्वतःची
ज्याला जस
ज्याला जस
तुम्ही
ज्याला जस
शानबाजी
अरेच्या
ससा,