प्रलय
प्रलय.........
" येते “ म्हणून सांगून गेली,
परतुनी ना आली पुन्हा.
वाट पाहुनी जीव शिणला,
दाटल्या अन्तरी यातना.
परतीच्या वाटेवर तुझ्या,
सजविला आसवांचा ताटवा .
जाहले निर्माल्य त्याचे,
येशील तू केधवा ?
अनमोल निर्माल्य हे
गंगेत कुठल्या वाहवू ?
महापुराचा प्रलय नंतर,
एकला कसा मी थोपवू ?
निरंजन वहाळेकर
छान
आसवांचे