>>मुलींचे कान टोचणे. मुलांचे न टोचणे
असहमत... आमच्या घरी लहानपणी माझे व माझ्या बहिणीचे दोघांचे कान टोचलेले...माझ्या कानाची छिद्रं बुजली आता ती गोष्ट वेगळी...
पण म्हणजे मुलांनी सुंदर सुंदर डूल घालायची पद्धत नाही ना समाजात. हे स्टिरीओटाइप्स कारणीभूत आहेत का सौंदर्यदृष्टी भिन्न भिन्न असण्यास?
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
कानात डूल घातलेले, रंगीबेरंगी कपडे घालणारे, अंग गोंदवून घेणारे पुरुष हे अपवाद आहेत. नियम नाहीत. (निदान आज तरी)
भारतात, अमेरिकेत, इंग्लंड वा चीनमधे ह्या प्रकारचे लोक बघा:
उच्चपदस्थ अधिकारी (एक्जिक्युटिव्ह्ज), राजकारणी, मंत्री ह्यांच्या पोषाखाकडे पहा. त्यातल्या बायकांचे आणि पुरुषांचे पोषाख अगदी रंगसंगतीच्या बाबतीत वेगळेच असतात. पुरुषांच्या कपड्यांचे रंग आजिबात उठावदार नसतात. उलट बायकांचे असतात.
आपल्याकडे पुरुषांनी देखील कुंडले घालण्याची पद्धत होती. स्त्री पुरुष सर्वच कुंडलं वापरीत असत एकेकाळी. अगदी गेल्या पिढीपर्यंत मुंजीत भिकबाळी घालायची पद्धत होती.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
मी माझ्या मुलाचे कान टोचवून घेतले होते आणि दोन वेगवेगळ्या प्रकारचे डूलही आणले होते. जेव्हा तो दंगा करायला लागला तेंव्हा मात्र काढून टाकले. तो लहान असताना गुलाबी रंगाचे फ्रॉकही घालून झाले. मुलींसारखे केस बांधणे वगैरे हौस पुरवून घेतली. आता ते फोटो बघून तो कूरकूर करतो ती गोष्ट निराळी! :)
पण बरेचसे पुरुष बाह्य सौन्दर्याला महत्व देतात असे मलाही वाटते.
आजकाल काही स्रियांनाही स्त्रियांचे आकर्षण वाटते या गोष्टीचाही विचार करायला हवा. तसा विचार न केल्यास पुरुषांसाठी ते अन्यायकारक होइल.;)
रेवती
आजकाल काही स्रियांनाही स्त्रियांचे आकर्षण वाटते या गोष्टीचाही विचार करायला हवा.
हा हा हा , ही गोष्ट खरी आहे. माझा एक मित्र सायकॉलॉजिस्ट आहे. तो सांगतो स्त्रीयांच नटण्याथटण्याचं मुख्या कारण असतं की त्या दुसर्या स्त्रीयांपेक्षा सुंदर दिसाव्यात.
आमचं कसं क्षणिक असतं, कोणी फटाकडी दिसली की शिट्ट्यावगैरे नाही वाजवत , पण "व्वाह !!" एवढं जरुर निघतं पण पुढच्याच क्षणाला मी तिला विसरुनही जातो. ;)
ह्म्म अनाठायी स्पर्धा असते.
शिवाय खोलवर कुठेतरी कमी पडत असलेल्या स्त्रिया, असुरक्षीत वाटून , बाह्यसौंदर्यावर भर देतात हे मी स्वतः पाहीलय. "उथळ पाण्याला खळखळाट फार"
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
काही स्त्रिया ह्या त्यांच्या अंतरंगावर प्रेम करावं अश्या असतात आणि बर्याचश्या स्त्रिया या त्यांच्या बाह्यरंगावर जीव ओवाळून टाकावा अश्या असतात..
असो,
हा आपला असाच माझा एक फुटकळ प्रतिसाद.. माझा फार अभ्यास नाही या विषयावर! ;)
वागणुकीतल्या काही लैंगिक (जेंडर बेस्ड)फरकांना काही जैविक कारणं असू शकतात. उत्क्रांतीच्या निवड प्रक्रियेत पुरुष व स्त्रिया यांच्यातील जीवशास्त्रीय फरकामुळे वेगवेगळ्या गुणधर्मांना प्राधान्य मिळतं. डॉकिन्सने या फरकाचं सेल्फिश जीन मध्ये चांगलं वर्णन केलं आहे. स्त्री पुरुषांतील भिन्न मानसिकता काही प्रमाणात उत्क्रांती व गेम थिअरी यांनी समजून घेता येते.
अरे हो तुम्ही ह्या विषयावर टिप्पणी केली होती. जसं नाजूक, शाळकरी मुलींसारखा आवाज, ब्लाँड केस हे पुरुषांना आवडतात स्त्रियांना डीप, रेझोनेटींग आवाज आवडतो. यात कोणता तरी हार्मोन त्या त्या व्यक्तीत अधिक असल्याचा उल्लेख आला होता.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
स्त्री जितकी सतेज, उत्फुल्ल, तरुण तितकी ती प्रजोत्पादनास अधिक सक्षम, अधिक काळ मुलं बेअर करु शकेल का काहीसा निष्कर्ष निघतो पुरुषांच्या मानसिकतेत. मला नीट सांगता येत नाही आहे. मी असं काहीसं वाचलं आहे. दुवा सापडला की देते.
http://www.guardian.co.uk/science/2010/jun/04/men-blonde-women-attractive
There are higher numbers of females born blonde than males and retention of blonde hair into adulthood is a sexually selected indicator of fitness in females. Caucasian blondes are usually slightly higher in oestrogen than brunettes and are likely to exhibit other infantile sexually selected traits (indicating low levels of testosterone) that are considered desirable by males, for example finer facial features, smaller nose, smaller jaw, pointed chin, narrow shoulders, smooth skin and less body hair, and infantile behaviour such as higher energy levels and playfulness.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
बरचसा पटलेला प्रतीसाद,
मुळात पुरुषांना जे सुंदर वाटत ते स्रियांच्या सौंदर्यांच्या कल्पनेपेक्षा वेगळ असतं, पण दोघांचेही उद्देश एकच असतात. पुरुष आणि स्रिया दोघेही आपल्या बिजांचे सातत्य असावे असे बघतात. मुळात स्त्रीचे सौंदर्य हे तिच्या उत्तम आरोग्याचे निर्देशक असते. पुरुषांना स्रीच्या सौंदर्याच्या ज्या खाणाखुना आवडतात, त्या बर्याचदा स्त्रीच्या ऊत्तम आरोग्याच्या व चांगल्या जनन्क्षमतेच्या निर्देशक असतात. तसेच बर्याचदा स्त्रीयांना आवडणारे गुण हे पुरुषांच्या संरक्षणक्षमतेचे निदेर्शक असतात. कुठेतरी याची मुळे कळपात राहणार्या समुदायात आहेत. यावर अजुन लिहायला आवडेल पण परत कधीतरी...
यातला ओस्ट्रोजेन आणि प्रोस्ट्रोजेन चा मुद्दा पटत नाही.
प्रोस्ट्रोजेन मुळे पुरुषाना टक्कल पडते असे म्हणतात. याचा अर्थ टक्कल हे शारीरीक सौंदर्याचे लक्षण मानायला हवे ......
( लॉजीक म्हणजे कै च्या कैच असते रे .)
>> प्रोस्ट्रोजेन मुळे पुरुषाना टक्कल पडते असे म्हणतात. <<
हा कोणता हॉर्मोन? इस्ट्रोजेन, प्रोजेस्टीरॉन का आणखी काही?
का तुम्हाला प्रोजेस्टाजेन म्हणायचं आहे?
>> याचा अर्थ टक्कल हे शारीरीक सौंदर्याचे लक्षण मानायला हवे ...... <<
असं मानणार्या काही व्यक्ती माझ्या ओळखीच्या आहेत. पण त्यांना फक्त बुद्धीमान लोकंच आवडतात.
अदिती
ह्या सगळ्यापाठीमागे हे कारण असेल का?
-----------------------
समस्त पुरूषांसाठी आज एक खबर आहे. ती जर आपण ऐकली किंवा वाचली तर खुषखबर ठरेल याची मला खात्री आहे. आज सकाळ मध्ये पान क्र सात वर डॉ. मधुरा विप्र यांचा एक लेख आहे. या लेखात त्यानी असे म्हटले आहे की मानव आणी चिपांझी हा उत्क्रांतिमध्ये जो बदल घडला तो वाय या गुणसूत्रातील बदलांमूळे घडला. असे संशोधन केंब्रिजमध्ये एका संस्थेत झाल्याचे नेचर या मासिकात प्रकाशित झालेल्या एका बातमीचा हवाल देऊन म्हतले आहे.
नेचर मधिल बातमीचा दूवा - http://www.nature.com/news/2010/100113/full/463149a.html
आजवर असा समज प्रचलित होता की मानव आणि माकडे यांच्यातील जनुकीय फरक फक्त २% एवढाच आहे. पण हा फरक गुणसूत्र २१ ( एक्स?) पुरताच मर्यादित असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. मानव आणि माकडे यांच्या वाय गुणसूत्रातील फरक खूप मोठा आहे.
या संशोधनातून काही मजेशीर गोष्टी सूचित होतात.
१. एक्स हे गुणसूत्र उत्क्रांतीमध्ये बदलले नाही. स्त्रीयांमध्ये दोन एक्स असतात. म्हणजे मानवी स्त्रिया आणि माकडांच्या स्त्रीया यांच्यातला फरक १% पेक्षा कमी आहे.
२. मानवाचे माकडांपासून वेगळे होण्यात स्त्रीयांचे नाही तर पुरुषांचे कर्तृत्व निर्णायक आहे.
http://www.misalpav.com/node/11789
---------------------------
पुरुष उत्क्रांत असल्याने असा विचार करतात का?
दोघही वेगवेगळे आहेत, ज्ञात इतिहासापासून त्यांचे समाजातील स्थान, जबाबदार्या वेगवेगळ्या आहेत. असे असताना दोघांकडून भिन्न अपेक्षा ठेवल्या जाणारच.
अवांतरः
शिक्षणात अयशस्वी ठरलेले लोक शिक्षणपद्धतीला नावे ठेवताना आढळतात. प्रेमभंग झालेले प्रेमाच्या नावाने खडे फोडताना दिसतात. आता हे सौंदर्याला नाके मुरडणारे लोक....
कमीतकमी तुम्हाला माहिती तरी आहे कि पुरुषांना काय आवडू शकतं..त्या माहितीचा हवा असेल तर वापर तरी करून घेता येतो.
आम्हाला ती ही सोय ठेवली नाही म्हणूनच "what women want?" असा सिनेमा निघतो ना? :)
बाकी आम्ही सौंदर्या बरोबरच "स्वभावाला" ही तेव्हढच महत्त्व देतो. ;)
पुरुष , स्त्रिया आणि बाह्यसौंदर्य = हे बघा
प्रत्येक मालाला गिर्हाइक आहे.
अजुन काही प्रश्न असतील तर ह्युमन इंन्स्टींक्ट ही बीबीसी निर्मीत मालीका बघणे.
जाताजाता: कीप इट सुपर सिंपल टेस्ट ऑफ्टन वर्क्स
हे बरंए !!! आणि आम्ही आपला एखादं मत मांडलं तर लोक आम्हाला हा विषय तो विषय करून भंडावतात आणि मोठे व्हायला सांगतात...आता या वातावरणात कसं बरं मोठा होणार?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
शबरीचा आदर्श म्हणजे प्रत्येक बोर चाखून पहाण्याचा! अरेरे, फोड करुन सांगण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
थोडे विषयांतर आहे, पण खालील article वाचा ...
बाकी वरील विषयावर माझा अनुभव जरा वेगळा आहे, लेखीकीने दिलेले ९५-५ % हे प्रमाण जरा जास्तच वाटत... बाह्यसौंदर्यावर जास्तीत जास्त शिट्या वाजतील, आणि फारतर एखादी कॉफ्फी. पण आयुष्याचा प्रश्न येतो त्यावेळेस, मुल जरा अंतरंगाचा विचार करायचा प्रयत्न करतात. पण जरका प्रेम-प्रकरणात बुबुळ फिरलेली असतील तर सांगता येत नाही बुवा...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5733437.cms
"आपल्याकडे बायकांचं स्वतंत्र होणं, वेगळा विचार करणं बायकांपुरतंच मर्यादित राहिलं. समानतावादी प्रयोग झाले ते बायकांवर, जणू पुरुषांशी याचं देणं घेणंच नव्हतं. सहजीवन हे दोघांचं असतं आणि याचे संस्कार मुलं आणि मुली या दोघांवरही अगदी लहानपणापासून व्हायला हवेत, मुलांचं ग्रूमिंग त्याच दृष्टीकोनातून व्हायला हवं, हे आपल्या गावीही नाही. घराघरातून मुली बदलल्या. मुलं मात्र तशीच राहिली. पौरुषत्वाच्या कल्पनांना घट्ट चिकटून. त्यामुळे अगदी पुरोगामी म्हणवणाऱ्या कुटुंबातही टीपिकल नवरेपण सुटत नाही. मुलांनी कसं मुलांसारखं वागावंंंं... या संस्काराखाली मुलं बिचारी दबून गेलीयेत. पुरुषी स्वभाव म्हणून की काय पण ज्या गोष्टीचा मुलींनी बारकाव्याने विचार केलाय तसा मुलांनी केलेलाच नाहीये. 'तेव्हाचं तेव्हा बघू' असं त्यांचं मत. मुली जेव्हा अपेक्षा व्यक्त करतात, तेव्हा मुलं हबकून जातात ती यामुळेच."
ह्याला कारण काय मग - "पुरुषी इगो/ अहंकार" का घरात आई कडून मिळणारी शिकवण (मुलांनी कसं मुलांसारखं वागावंंंं..). मुला - मुलीत भेदभाव अगदी घरात आई पासूनच बघायला मिळतो. अजून 'स्वतंत्र्य' झालेल्या मुली पण 'जोडीदार मात्र त्यांच्यापेक्षा अधिक कमावणाराच हवा' अशा मागणी करताना दिसतात... अवघड आहे, complicated
आहे ....
प्रतिक्रिया
>>मुलींचे
पण म्हणजे
ओ शुचितै
उघड आहे
आपल्याकडे
मी माझ्या
आजकाल काही
ह्म्म
हॅ हॅ हॅ!!
काही
भिन्न मानसिकता
अरे हो
बरं
हेच
स्त्री
स्त्री
आपण
हॅ हॅ हॅ,
बरचसा
यातला
नक्की काय?
अॅन्ड्रो
टक्कल हे शारीरीक सौंदर्याचे लक्षण
का बे ?
तु उपटायला सुरूवात पण केली का ?
सगळे
ह्या
पुरुष उत्क्रांत असल्याने असा विचार करतात का?
रंगाकाका
+१
आपला
छान पैकी
वाय झेड
मिभोकाका
>चला
नाही
दोघही
>> आता हे
बायकांसाठी फायद्याचच आहे की
फे रो मो न
हे बरंए !!!
.आता या
बहुधा ललिता पवार देखिल वरील वाक्याशी सहमत असतील
ललिता पवार?
शबरी
शबरी?
हॅहॅहॅहॅ ...
हा हा हा
आदर्श
थोडे