Skip to main content

पुरुष , स्त्रिया आणि बाह्यसौंदर्य

लेखक शुचि यांनी सोमवार, 28/06/2010 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
काल जिममधे माझं आटोपल्यावर नवर्‍याची वाट बघत एक पुस्तक चाळत बसले होते. पुढील उतार्‍यानी लक्ष वेधलं - पुरुष हे प्रचंड प्रमाणात व्हिज्युअल असतात. स्त्रियांना आवडो अथवा न आवडो एक गोष्ट अजीबात नाकारता येत नाही ती म्हणजे - पुरुषांकडून बाह्यसौंदर्याला दिलं जाणारं अवास्तव महत्व. एखाद्या पुरुषाला सुंदर स्त्रीचं छायाचित्र दाखवा अणि त्याची नजर हमखास २ क्षण जास्त रेंगाळेल याउलट आकर्षक पुरुषाच्या छायाचित्राची दखलही एखादी स्त्री घेणार नाही. १०० पुरुषांना विचारा की ते सौंदर्यास अधिक प्राधान्य देतात की स्वभावास आणी ९५ पुरुष सांगतील सौंदर्य बाकीच्या ५ जणांना प्रश्न कळला नसेल. मला हा मुद्दा पटला, नीट पटला. या अशा जडणघडणीमागे नक्की काय कारण आहे याविषयी सूज्ञांची मतं जाणून घ्यायला आवडतील. एक "स्टिरीओटाइप" म्हणून आपण म्हणजे समाज असे साचेबद्ध मुलं , मुली घडवतो का मूळ मानसिकताच भिन्न भिन्न आहेत? स्टिरीओटाइप म्हणजे मला म्हणायचय - मुलींचे कान टोचणे. मुलांचे न टोचणे, पुढे देखील एखाद्या पुरुषानी रंगीत (गुलाबी वगैरे) कपडे घातले तर त्याची थट्टा करणे. ___ यावरून एक विनोदही आठवतो - स्त्रिया लग्न करून ही आशा ऊराशी बाळगतात की आपण त्याला बदलू शकू. पुरुष लग्न करतात या आशेनी की ती लग्नानंतर बदलणार नाही. (= सुटणार नाही, सौंदर्य टिकेल वगैरे वगैरे अशक्य गोष्टी 8| )

वाचने 25086
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

In reply to by शिल्पा ब

लग्न करायला पुरुषाला चांगली दिसणारी (शक्यतो), खायला - प्यायला करता येणारी आणि घरदार सांभाळणारी बायको हवी असते आणि स्त्रीला चांगला कमावणारा, जरा बरा दिसणारा , हुशार आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त असा नवरा हवा असतो...बाकी सगळ्या गोष्टी सगळेजण जुळवून घेतात
अगदी हेच सांगायला प्रतिसाद लिहणार होतो पण आपला प्रतिसाद वाचला.१००००००००००००००००००% सहमत. अगदी योग्य विधान केलत(माझ्या प्रतिसादात लिहलय त्याबद्दल बोलतोय). आजच 'त्या' मॉडेलच्या आत्महत्या प्रकरणी 'अग्रलेखाच्या बादशहा'ने हेच लिहल होत. बाकी खालच्या प्रतिसादांना खुप शुभेच्छा! :D ________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे

In reply to by शानबा५१२

कुठली मॉडेल , कसली आत्महत्या? आम्ही अतिसामान्य लोकं ... ते बादशहाचे लेख कसे वाचणार? ते फक्त तुमच्यासाठीच. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

यु डोन्ट नो अग्रलेखाचा बादशहा? या या,नॉट फ्रोम महाराष्ट नो? 'विवेका बाबाजी'चे आत्महत्या प्रकरण........काही चगळत बसण्यासारख स्टोरीमधे काही नाही,पण आरोप-प्रत्यारोप चांगले चाललेत. इथे शेतकरी दीवसाला मरत आहेत्,त्याच्या बातम्या पण आता दुखी करत नाहीत्,ह्या बांडगुळाला मरण भेटल तर कसल दुख!!फक्त चर्चेचा विषय.............. आणि हो आता कामात असतो(तारापुर अणुशक्ती केंद्र) म्हणुन नाही प्रतिसाद टाकत्............रीझल्ट ५ तारखेला आहे. :D _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे http://www.fl

In reply to by शानबा५१२

शानबाजी, तुम्हाला आणि पर्यायाने 'तारापूर अणुशक्ती केन्द्रा'ला बेस्ट ऑफ लक! ;) ____________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! आपण "मौन" पाळता.... हे वाचून आनंदमिश्रित आश्चर्य वाटले!... :) कीप इट अप.... मौना'मुळे मानसिक शक्तीचा विकास होतो... हे खरे आहे.... युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

तुम्ही विचार करायचा त्रास नका घेउ,मेंदुला सवय नसलेल्या गोष्टी केल्यावर त्रास होतो,तेव्हा आपण व्यनी वाचा!! _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे http://www.fl

In reply to by शानबा५१२

शानबा'जी आपला व्यनि वाचला.... आपल्याला सुधारणा करण्यासाठी बराच वाव असल्याचे प्रकर्षाने जाणवले!.... ;) ________________ जस्ट टेक इट ईझी.... आणि हो! 'हॅव अ नाईस डे' बरं का ? ;) ________________ तारापूर अणु शक्ती केन्द्राची शुभचिन्तक, - मृगनयनी परशुराम लिमये. :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

स्त्री-पुरुषाच्या आयुष्यात एक्मेकांचे महत्व, महात्म्य, आकर्षण वयपरत्वे बदलत जातं. काहीच शाश्वत नसतं. लहानपणी भेटलेल्या स्त्रीयांच्या स्वभावानुसार त्या बाल-पुरुषांना आवडतात किंवा नावडतात तर वयात येताच शारीरिक आकर्षण वाढू लागते (निसर्ग धर्म) स्त्रीयांनाही पुरुषांच्या बाबतीत असेच आकर्षण वाटते. 'तुमच्याशी लग्न केलं हे चुकलच माझं.''तरी ताईने-आईने वेळीच सावध केले होते.' वगैरे वाक्ये ४-५ वर्षांनंतर सुरु होतात. ह्या वयानंतर दोघांचेही शारीरिक आकर्षण (परस्त्री/परपुरुषाबद्दल) कमी होत जाऊन अंतरीक गुणाचे (परस्त्री/परपुरुषांच्या) आकर्षण वाढीस लागते. 'जीवनसाथीच्या निवडप्रकियेत आपण जरा घाई केली' हे स्वतःलाच पटायला लागते. कसा बसा संसार रेटला जातो. म्हातारपणाच्या आजारपणात, दुबळ्या बनत जाणार्‍या शरीरासोबत मनही अशक्त बनत जाते. एकमेकांचे गुण दिसू /जाणवू लागतात. 'नाही हो, माझ्या आजारपणात खूप कष्ट केले ह्यांनी.' किंवा 'तोंडाने भांडखोर असली तरी मनाने प्रेमळ आहे' अशी वाक्ये कानावर येतात. पुन्हा एकमेकांचे नाते घट्ट होऊ लागते. (वरवर भांडणे झाली तरी अंतरात ओलावा निर्माण झालेला असतो.) एकूण काय? तर वयपरत्वे, परिस्थितीनुरुप गरजा, आकर्षण बदलत जाते. ह्यावरून एक विनोद आठवला: एक सत्तरीतला म्हातारा आपल्या पत्नीला विचारतो,' काय ग! मी तरूण मुलींच्या मागे धावतो ते पाहून तुला राग नाही येत?' म्हातारी म्हणते,' अजिबात नाही. अहो, कारच्या मागेही कुत्रे धावतात पण म्हणून काय त्यांना कार चालवता येते?' ------------------------------------------------------ विवाहित पुरुषाने कितीही नोकर्‍या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.

या विषयावर एक वेगळा फोरम चालू करावा लागेल की काय? कित्ती ही चर्चा? ...पुरुष वस्तुस्थिती मान्य का करत नाहीत??! जाउ दे... ============ माउ

या अशा जडणघडणीमागे नक्की काय कारण आहे याविषयी सूज्ञांची मतं जाणून घ्यायला आवडतील. >> तुमच्या या प्रश्नाचं खुलासेवार उत्तर तुम्हाला या पुस्तकात नक्कीच मिळेल. द फेमिनाईन पॉवर - मोअर डिमांड लेस सप्लाय लेखक - एस. के. वाधवा प्रकाशक - जयको बुक्स, मुंबई

स्त्रीयांच्या बाह्य सौंदर्यास नक्किच महत्व आहे.. मुलगा जेंव्हा मुलगी पाहुन आलो असे मित्रांना सांगतो त्या वेळी मित्रांचा पहिला प्रष्ण असतो "कशी आहे दिसायला?" "तर मुली विचारता तो काय करतो?" स्त्रीयां चे सौंदर्य हेच त्यांचे साम्रर्थ्य आहे तर पुरुषाचे सामर्थ्य हेच त्यांचे सौंदर्य असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे