Skip to main content

पुरुष , स्त्रिया आणि बाह्यसौंदर्य

लेखक शुचि यांनी सोमवार, 28/06/2010 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
काल जिममधे माझं आटोपल्यावर नवर्‍याची वाट बघत एक पुस्तक चाळत बसले होते. पुढील उतार्‍यानी लक्ष वेधलं - पुरुष हे प्रचंड प्रमाणात व्हिज्युअल असतात. स्त्रियांना आवडो अथवा न आवडो एक गोष्ट अजीबात नाकारता येत नाही ती म्हणजे - पुरुषांकडून बाह्यसौंदर्याला दिलं जाणारं अवास्तव महत्व. एखाद्या पुरुषाला सुंदर स्त्रीचं छायाचित्र दाखवा अणि त्याची नजर हमखास २ क्षण जास्त रेंगाळेल याउलट आकर्षक पुरुषाच्या छायाचित्राची दखलही एखादी स्त्री घेणार नाही. १०० पुरुषांना विचारा की ते सौंदर्यास अधिक प्राधान्य देतात की स्वभावास आणी ९५ पुरुष सांगतील सौंदर्य बाकीच्या ५ जणांना प्रश्न कळला नसेल. मला हा मुद्दा पटला, नीट पटला. या अशा जडणघडणीमागे नक्की काय कारण आहे याविषयी सूज्ञांची मतं जाणून घ्यायला आवडतील. एक "स्टिरीओटाइप" म्हणून आपण म्हणजे समाज असे साचेबद्ध मुलं , मुली घडवतो का मूळ मानसिकताच भिन्न भिन्न आहेत? स्टिरीओटाइप म्हणजे मला म्हणायचय - मुलींचे कान टोचणे. मुलांचे न टोचणे, पुढे देखील एखाद्या पुरुषानी रंगीत (गुलाबी वगैरे) कपडे घातले तर त्याची थट्टा करणे. ___ यावरून एक विनोदही आठवतो - स्त्रिया लग्न करून ही आशा ऊराशी बाळगतात की आपण त्याला बदलू शकू. पुरुष लग्न करतात या आशेनी की ती लग्नानंतर बदलणार नाही. (= सुटणार नाही, सौंदर्य टिकेल वगैरे वगैरे अशक्य गोष्टी 8| )

वाचने 25086
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

>>मुलींचे कान टोचणे. मुलांचे न टोचणे असहमत... आमच्या घरी लहानपणी माझे व माझ्या बहिणीचे दोघांचे कान टोचलेले...माझ्या कानाची छिद्रं बुजली आता ती गोष्ट वेगळी...

In reply to by प्रभो

पण म्हणजे मुलांनी सुंदर सुंदर डूल घालायची पद्धत नाही ना समाजात. हे स्टिरीओटाइप्स कारणीभूत आहेत का सौंदर्यदृष्टी भिन्न भिन्न असण्यास? सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

ओ शुचितै हल्ली फॅशन हाय हो कानात डुल/रिंग/खडे घालायची. ( प्रश्न न कळला ) गणा

In reply to by गणपा

कानात डूल घातलेले, रंगीबेरंगी कपडे घालणारे, अंग गोंदवून घेणारे पुरुष हे अपवाद आहेत. नियम नाहीत. (निदान आज तरी) भारतात, अमेरिकेत, इंग्लंड वा चीनमधे ह्या प्रकारचे लोक बघा: उच्चपदस्थ अधिकारी (एक्जिक्युटिव्ह्ज), राजकारणी, मंत्री ह्यांच्या पोषाखाकडे पहा. त्यातल्या बायकांचे आणि पुरुषांचे पोषाख अगदी रंगसंगतीच्या बाबतीत वेगळेच असतात. पुरुषांच्या कपड्यांचे रंग आजिबात उठावदार नसतात. उलट बायकांचे असतात.

In reply to by हुप्प्या

आपल्याकडे पुरुषांनी देखील कुंडले घालण्याची पद्धत होती. स्त्री पुरुष सर्वच कुंडलं वापरीत असत एकेकाळी. अगदी गेल्या पिढीपर्यंत मुंजीत भिकबाळी घालायची पद्धत होती. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

मी माझ्या मुलाचे कान टोचवून घेतले होते आणि दोन वेगवेगळ्या प्रकारचे डूलही आणले होते. जेव्हा तो दंगा करायला लागला तेंव्हा मात्र काढून टाकले. तो लहान असताना गुलाबी रंगाचे फ्रॉकही घालून झाले. मुलींसारखे केस बांधणे वगैरे हौस पुरवून घेतली. आता ते फोटो बघून तो कूरकूर करतो ती गोष्ट निराळी! :) पण बरेचसे पुरुष बाह्य सौन्दर्याला महत्व देतात असे मलाही वाटते. आजकाल काही स्रियांनाही स्त्रियांचे आकर्षण वाटते या गोष्टीचाही विचार करायला हवा. तसा विचार न केल्यास पुरुषांसाठी ते अन्यायकारक होइल.;) रेवती

In reply to by रेवती

आजकाल काही स्रियांनाही स्त्रियांचे आकर्षण वाटते या गोष्टीचाही विचार करायला हवा.
हा हा हा , ही गोष्ट खरी आहे. माझा एक मित्र सायकॉलॉजिस्ट आहे. तो सांगतो स्त्रीयांच नटण्याथटण्याचं मुख्या कारण असतं की त्या दुसर्‍या स्त्रीयांपेक्षा सुंदर दिसाव्यात. आमचं कसं क्षणिक असतं, कोणी फटाकडी दिसली की शिट्ट्यावगैरे नाही वाजवत , पण "व्वाह !!" एवढं जरुर निघतं पण पुढच्याच क्षणाला मी तिला विसरुनही जातो. ;)

In reply to by टारझन

ह्म्म अनाठायी स्पर्धा असते. शिवाय खोलवर कुठेतरी कमी पडत असलेल्या स्त्रिया, असुरक्षीत वाटून , बाह्यसौंदर्यावर भर देतात हे मी स्वतः पाहीलय. "उथळ पाण्याला खळखळाट फार" सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by टारझन

पण पुढच्याच क्षणाला मी तिला विसरुनही जातो. न विसरुन सांगतोस कोणाला? ;) (विसराळू)चतुरंग

काही स्त्रिया ह्या त्यांच्या अंतरंगावर प्रेम करावं अश्या असतात आणि बर्‍याचश्या स्त्रिया या त्यांच्या बाह्यरंगावर जीव ओवाळून टाकावा अश्या असतात.. असो, हा आपला असाच माझा एक फुटकळ प्रतिसाद.. माझा फार अभ्यास नाही या विषयावर! ;)

वागणुकीतल्या काही लैंगिक (जेंडर बेस्ड)फरकांना काही जैविक कारणं असू शकतात. उत्क्रांतीच्या निवड प्रक्रियेत पुरुष व स्त्रिया यांच्यातील जीवशास्त्रीय फरकामुळे वेगवेगळ्या गुणधर्मांना प्राधान्य मिळतं. डॉकिन्सने या फरकाचं सेल्फिश जीन मध्ये चांगलं वर्णन केलं आहे. स्त्री पुरुषांतील भिन्न मानसिकता काही प्रमाणात उत्क्रांती व गेम थिअरी यांनी समजून घेता येते.

In reply to by राजेश घासकडवी

अरे हो तुम्ही ह्या विषयावर टिप्पणी केली होती. जसं नाजूक, शाळकरी मुलींसारखा आवाज, ब्लाँड केस हे पुरुषांना आवडतात स्त्रियांना डीप, रेझोनेटींग आवाज आवडतो. यात कोणता तरी हार्मोन त्या त्या व्यक्तीत अधिक असल्याचा उल्लेख आला होता. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हेच विचारतो! तुमह्या इज्ञानाचा अन मिपावरच्या काथ्याकुटाचा काय समंध?? ;) -Nile

In reply to by Nile

स्त्री जितकी सतेज, उत्फुल्ल, तरुण तितकी ती प्रजोत्पादनास अधिक सक्षम, अधिक काळ मुलं बेअर करु शकेल का काहीसा निष्कर्ष निघतो पुरुषांच्या मानसिकतेत. मला नीट सांगता येत नाही आहे. मी असं काहीसं वाचलं आहे. दुवा सापडला की देते. http://www.guardian.co.uk/science/2010/jun/04/men-blonde-women-attracti… There are higher numbers of females born blonde than males and retention of blonde hair into adulthood is a sexually selected indicator of fitness in females. Caucasian blondes are usually slightly higher in oestrogen than brunettes and are likely to exhibit other infantile sexually selected traits (indicating low levels of testosterone) that are considered desirable by males, for example finer facial features, smaller nose, smaller jaw, pointed chin, narrow shoulders, smooth skin and less body hair, and infantile behaviour such as higher energy levels and playfulness. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

स्त्री जितकी सतेज, उत्फुल्ल, तरुण तितकी ती प्रजोत्पादनास अधिक सक्षम, अधिक काळ मुलं बेअर करु शकेल का काहीसा निष्कर्ष निघतो पुरुषांच्या मानसिकतेत.
असं आहे होय! च्यायला माहितंच नव्हत! (इथुन पुढे पोरींना प्रपोजींग लाईन म्हणुन वरची ओळ फेकावी म्हणतो! ;) ) -Nile

In reply to by Nile

आपण टर्मिनेटर -३ पाहिला नाहीत काय? असो, 'चपला' खायच्या नसतील तर असं काही मुलींच्या तोंडावर बोलू नकोस! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हॅ हॅ हॅ, उपरोध का काय म्हंतात ते समजुन घ्या! ;) -Nile

In reply to by शुचि

बरचसा पटलेला प्रतीसाद, मुळात पुरुषांना जे सुंदर वाटत ते स्रियांच्या सौंदर्यांच्या कल्पनेपेक्षा वेगळ असतं, पण दोघांचेही उद्देश एकच असतात. पुरुष आणि स्रिया दोघेही आपल्या बिजांचे सातत्य असावे असे बघतात. मुळात स्त्रीचे सौंदर्य हे तिच्या उत्तम आरोग्याचे निर्देशक असते. पुरुषांना स्रीच्या सौंदर्याच्या ज्या खाणाखुना आवडतात, त्या बर्‍याचदा स्त्रीच्या ऊत्तम आरोग्याच्या व चांगल्या जनन्क्षमतेच्या निर्देशक असतात. तसेच बर्‍याचदा स्त्रीयांना आवडणारे गुण हे पुरुषांच्या संरक्षणक्षमतेचे निदेर्शक असतात. कुठेतरी याची मुळे कळपात राहणार्‍या समुदायात आहेत. यावर अजुन लिहायला आवडेल पण परत कधीतरी...

In reply to by शुचि

यातला ओस्ट्रोजेन आणि प्रोस्ट्रोजेन चा मुद्दा पटत नाही. प्रोस्ट्रोजेन मुळे पुरुषाना टक्कल पडते असे म्हणतात. याचा अर्थ टक्कल हे शारीरीक सौंदर्याचे लक्षण मानायला हवे ...... ( लॉजीक म्हणजे कै च्या कैच असते रे .)

In reply to by विजुभाऊ

>> प्रोस्ट्रोजेन मुळे पुरुषाना टक्कल पडते असे म्हणतात. हा कोणता हॉर्मोन? इस्ट्रोजेन, प्रोजेस्टीरॉन का आणखी काही? का तुम्हाला प्रोजेस्टाजेन म्हणायचं आहे? >> याचा अर्थ टक्कल हे शारीरीक सौंदर्याचे लक्षण मानायला हवे ...... असं मानणार्‍या काही व्यक्ती माझ्या ओळखीच्या आहेत. पण त्यांना फक्त बुद्धीमान लोकंच आवडतात. अदिती

In reply to by महेश हतोळकर

का बे ? त्यांनी टक्कल म्हणजे सौंदर्यलक्षण म्हणताबरोबर तु उपटायला सुरूवात पण केली का ? =)) =)) - शर्यत तळवलकर

सगळे एकमेकांना आवडोत आणि जगात शांतता नांदो ... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

ह्या सगळ्यापाठीमागे हे कारण असेल का? ----------------------- समस्त पुरूषांसाठी आज एक खबर आहे. ती जर आपण ऐकली किंवा वाचली तर खुषखबर ठरेल याची मला खात्री आहे. आज सकाळ मध्ये पान क्र सात वर डॉ. मधुरा विप्र यांचा एक लेख आहे. या लेखात त्यानी असे म्हटले आहे की मानव आणी चिपांझी हा उत्क्रांतिमध्ये जो बदल घडला तो वाय या गुणसूत्रातील बदलांमूळे घडला. असे संशोधन केंब्रिजमध्ये एका संस्थेत झाल्याचे नेचर या मासिकात प्रकाशित झालेल्या एका बातमीचा हवाल देऊन म्हतले आहे. नेचर मधिल बातमीचा दूवा - http://www.nature.com/news/2010/100113/full/463149a.html आजवर असा समज प्रचलित होता की मानव आणि माकडे यांच्यातील जनुकीय फरक फक्त २% एवढाच आहे. पण हा फरक गुणसूत्र २१ ( एक्स?) पुरताच मर्यादित असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. मानव आणि माकडे यांच्या वाय गुणसूत्रातील फरक खूप मोठा आहे. या संशोधनातून काही मजेशीर गोष्टी सूचित होतात. १. एक्स हे गुणसूत्र उत्क्रांतीमध्ये बदलले नाही. स्त्रीयांमध्ये दोन एक्स असतात. म्हणजे मानवी स्त्रिया आणि माकडांच्या स्त्रीया यांच्यातला फरक १% पेक्षा कमी आहे. २. मानवाचे माकडांपासून वेगळे होण्यात स्त्रीयांचे नाही तर पुरुषांचे कर्तृत्व निर्णायक आहे. http://www.misalpav.com/node/11789 --------------------------- पुरुष उत्क्रांत असल्याने असा विचार करतात का?

In reply to by चतुरंग

रंगाकाका तुम्हीपण असे आहात ना? (जरी ते कितीही कटु सत्य असल तरी) अस एकदम कुणाच्या तोंडावर बोलतात का हो.. =)) =)) =)) =)) =))

In reply to by गणपा

रंगरावांचा फाऊल आहे हा!! =)) =)) =)) =)) =)) अदिती

In reply to by चतुरंग

आपला प्रतिसाद वाचून तरी असे वाटत नाही!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मला तर वरच्या प्रतिसादावरुन एक्स ऐवजी झेड क्रोमोझोम दिसला =)) =))

In reply to by II विकास II

वाय झेड क्रोमोसोम !!! (आद्य कंपूबाज) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

=)) =)) मिभोकाका फॉर्मात, चला झाडावर!! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>चला झाडावर!! झाडावर काय आहे? उत्क्रांत न झालेल्यांची सभा? :D

In reply to by वेदश्री

नाही नॉस्टॅल्जिक झालेल्यांची सभा आहे. ;) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

दोघही वेगवेगळे आहेत, ज्ञात इतिहासापासून त्यांचे समाजातील स्थान, जबाबदार्‍या वेगवेगळ्या आहेत. असे असताना दोघांकडून भिन्न अपेक्षा ठेवल्या जाणारच. अवांतरः शिक्षणात अयशस्वी ठरलेले लोक शिक्षणपद्धतीला नावे ठेवताना आढळतात. प्रेमभंग झालेले प्रेमाच्या नावाने खडे फोडताना दिसतात. आता हे सौंदर्याला नाके मुरडणारे लोक....

In reply to by Pain

>> आता हे सौंदर्याला नाके मुरडणारे लोक.... कोण म्हणे सौंदर्याला नाकं मुरडतंय? उगाच काय काहीही! अदिती

कमीतकमी तुम्हाला माहिती तरी आहे कि पुरुषांना काय आवडू शकतं..त्या माहितीचा हवा असेल तर वापर तरी करून घेता येतो. आम्हाला ती ही सोय ठेवली नाही म्हणूनच "what women want?" असा सिनेमा निघतो ना? :) बाकी आम्ही सौंदर्या बरोबरच "स्वभावाला" ही तेव्हढच महत्त्व देतो. ;)

पुरुष , स्त्रिया आणि बाह्यसौंदर्य = हे बघा प्रत्येक मालाला गिर्‍हाइक आहे. अजुन काही प्रश्न असतील तर ह्युमन इंन्स्टींक्ट ही बीबीसी निर्मीत मालीका बघणे. जाताजाता: कीप इट सुपर सिंपल टेस्ट ऑफ्टन वर्क्स

हे बरंए !!! आणि आम्ही आपला एखादं मत मांडलं तर लोक आम्हाला हा विषय तो विषय करून भंडावतात आणि मोठे व्हायला सांगतात...आता या वातावरणात कसं बरं मोठा होणार? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

.आता या वातावरणात कसं बरं मोठा होणार?
आगायायायाया =)) =)) =)) =)) ख प लो !@! बाकी आम्ही छोटे असतांनाच पब्लिक ला झेपेना , मोठा झाल्यावर तर .... =)) कोण त्राहिमाम त्राहिमाम ओरडले रे ?

पुरुषांकडून बाह्यसौंदर्याला दिलं जाणारं अवास्तव महत्व. त्याच देखिल हेच म्हणणे होते. संदर्भ सापडल्यानंतर लिंक देईन.तो वर जीम मधुन घरी जा. वेताळ

या बाबतीत बरेच पुरुष शबरीचा आदर्श ठेवतात. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

पुरुषांना शबरीसारखी वृद्ध स्त्री आवडते? ;) जरा स्पष्ट करा ना. गैरसमज होतात.

In reply to by प्रियाली

हॅहॅहॅहॅ ... आवडत असेल बॉ त्यांना वृद्ध स्त्री ... तशा ही माणुसघाण्या लोकांचं सगळ्ळं कस्सं वेग्गळंच असतं =)) - टार्जनराव मोजुनखाणे

In reply to by प्रियाली

शबरीचा आदर्श म्हणजे प्रत्येक बोर चाखून पहाण्याचा! अरेरे, फोड करुन सांगण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

शबरीचा आदर्श ठेवून नक्की काय चाखून पहावे असे म्हणता? :? अजून स्पष्टीकरण दिले तरि चालेल.....

थोडे विषयांतर आहे, पण खालील article वाचा ... बाकी वरील विषयावर माझा अनुभव जरा वेगळा आहे, लेखीकीने दिलेले ९५-५ % हे प्रमाण जरा जास्तच वाटत... बाह्यसौंदर्यावर जास्तीत जास्त शिट्या वाजतील, आणि फारतर एखादी कॉफ्फी. पण आयुष्याचा प्रश्न येतो त्यावेळेस, मुल जरा अंतरंगाचा विचार करायचा प्रयत्न करतात. पण जरका प्रेम-प्रकरणात बुबुळ फिरलेली असतील तर सांगता येत नाही बुवा... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5733437.cms "आपल्याकडे बायकांचं स्वतंत्र होणं, वेगळा विचार करणं बायकांपुरतंच मर्यादित राहिलं. समानतावादी प्रयोग झाले ते बायकांवर, जणू पुरुषांशी याचं देणं घेणंच नव्हतं. सहजीवन हे दोघांचं असतं आणि याचे संस्कार मुलं आणि मुली या दोघांवरही अगदी लहानपणापासून व्हायला हवेत, मुलांचं ग्रूमिंग त्याच दृष्टीकोनातून व्हायला हवं, हे आपल्या गावीही नाही. घराघरातून मुली बदलल्या. मुलं मात्र तशीच राहिली. पौरुषत्वाच्या कल्पनांना घट्ट चिकटून. त्यामुळे अगदी पुरोगामी म्हणवणाऱ्या कुटुंबातही टीपिकल नवरेपण सुटत नाही. मुलांनी कसं मुलांसारखं वागावंंंं... या संस्काराखाली मुलं बिचारी दबून गेलीयेत. पुरुषी स्वभाव म्हणून की काय पण ज्या गोष्टीचा मुलींनी बारकाव्याने विचार केलाय तसा मुलांनी केलेलाच नाहीये. 'तेव्हाचं तेव्हा बघू' असं त्यांचं मत. मुली जेव्हा अपेक्षा व्यक्त करतात, तेव्हा मुलं हबकून जातात ती यामुळेच." ह्याला कारण काय मग - "पुरुषी इगो/ अहंकार" का घरात आई कडून मिळणारी शिकवण (मुलांनी कसं मुलांसारखं वागावंंंं..). मुला - मुलीत भेदभाव अगदी घरात आई पासूनच बघायला मिळतो. अजून 'स्वतंत्र्य' झालेल्या मुली पण 'जोडीदार मात्र त्यांच्यापेक्षा अधिक कमावणाराच हवा' अशा मागणी करताना दिसतात... अवघड आहे, complicated आहे ....

In reply to by अभिषेक९

मला ४ बायका माहीत आहेत ज्या कमावतात आणि एच-१ वर आहेत आणि नवरे एच-४ वर आहेत जे कमवत नाहीत. ३ भारतीय, १ फिलीपाइन. भारतीय बायका नवर्‍याला अजीबात टोचत नाहीत. सुखानी नांदताहेत. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

चार बायका या समाजाचं प्रतिनिधित्त्व करू शकत नाहीत आणि उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत नोकरी करणार्‍या तर नाहीच नाहीत. माझ्या आई-वडलांना ४० वर्षांपूर्वी जे कानावर आलं ते आज माझ्या आणि माझ्या नवर्‍याच्याही कानावर येतं ... बायको (नवर्‍यापेक्षा )जास्त शिकलेली आहे म्हणून तुला काँप्लेक्स येत नाही का, वगैरे वगैरे अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एच-१ आणि एच-४ यावरून शैक्षणिक पात्रता कशी ठरते? एच-४ वर राहणारे एच-१ मिळवण्यास पात्र नसतात असे तर नाही ना वाटत शुचितैंना!

प्रत्येकाने आपल्याला आपला जोडीदार का आवडला व तिला/त्याला आपण का आवडलो याचा (निदान मनातल्या मनात) विचार केला तरी लेखातील निष्कर्षाचा फोलपणा ध्यानात यावा. ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

In reply to by ऋषिकेश

फारच अवघड सांगतो ब्वॉ हा ऋष्या, अरे लेका नुस्ता विचार केला तर फोलपणा नाही लक्षात येणार? ;) -Nile

In reply to by Nile

अरे तसं होत असतं तर हा काथ्याकुट निघाला असता का? ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

लग्न करायला पुरुषाला चांगली दिसणारी (शक्यतो), खायला - प्यायला करता येणारी आणि घरदार सांभाळणारी बायको हवी असते आणि स्त्रीला चांगला कमावणारा, जरा बरा दिसणारा , हुशार आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त असा नवरा हवा असतो...बाकी सगळ्या गोष्टी सगळेजण जुळवून घेतात .... पटतंय तोपर्यंत एकमेकांबरोबर राहतात आणि शेवटी नको असलं तरी या वयात कुठे नवीन शोध म्हणून आहे त्यात समाधान मानतात....फारच वाटलं तर आजकाल वेगळे होतात...मी तर घटस्फोट घेऊन काही काळानी परत त्याच जोडप्याने एकमेकांशी लग्न केल्याचे पहिले आहे...चालायचेच....काय उगं काथ्याकुट करायचाय !!! *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

अहो असं कसं महत्वाचा विषय आहे. या विषयावर चर्चा व्हायला पाहीजे. म्हणजे असे अनेक विचारवंतांचं मत असतं. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

In reply to by शिल्पा ब

चालायचेच....काय उगं काथ्याकुट करायचाय !!!
वा! वा!.. अहो असं नाही केलं तर बुद्धीची खाज कशी जिरणार. घटोऽयं पटोऽयं पाहिजेच. शिवाय पोटातले विचारजंत, आपला(आणि आपल्या मैत्रिणींचा) व्हिसा स्टेटस, शैक्षणिक पातळ्या इ. खुबीने सांगायला फोरम नको का कुठला? (खवच्चट) विंजिनेर

In reply to by विंजिनेर

घटोऽयं पटोऽयं पाहिजेच. शिवाय पोटातले विचारजंत, आपला(आणि आपल्या मैत्रिणींचा) व्हिसा स्टेटस, शैक्षणिक पातळ्या इ. खुबीने सांगायला फोरम नको का कुठला? >> अगदी अगदी जणु काही लोकांची मते पाहुन हे आपले विचार बदलणार आहेत.

In reply to by शिल्पा ब

"काय उगं काथ्याकुट करायचाय !!!" लिहीण्याआधी चार ओळी लिहील्यात यातच कारण नाही का कळलं "उगं"चं? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सर्वसाधारण विचार मांडला...जो लग्न करताना लोक करतात...आता या गोष्टी सगळीकडेच असल्याने काथ्याकूटायचा प्रश्न कशाला? वाटलं आता तरी पाल्हाळ थांबेल पण ??? बरं अजून येऊ द्यात... (खवचट) कधीतरी *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

तुम्ही चार ओळी लिहायच्या आणि इतरांनी 'क्ष' एवढ्या ओळी लिहील्या तर मात्र 'उगं' ... झेपलं नाही त्यातून तुम्हाला काथ्या कुटायचा नसेल तर नका कुटू ... मसंसंवर तो पर्याय नेहेमीच उपलब्ध असतो. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आता आम्ही कुठे आग्रह धरलाय कि तुम्ही नकाच करू म्हणून... आता आम्ही पण एक " शेंबूड आल्यास काय कराल " याचा धागा काढणार आहोत...(हो कुणी म्हणायला नको झेपत नाही म्हणून..) १) शर्टाच्या बाहीला पुसाल २) रुमालाला पुसाल ३) फुर्कन आहात तिथेच शिन्क्राल ४) इतर काही असे पर्याय ठेवायचा विचार करीत आहोत...तुमचे मत मोलाचे आहे. (झेपवणारी) कुढीती * सगळ्याच बाबतीत काय भांडायचं काही कळत नाही?* *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

अय्या, एवढं छान छान, स्वीट स्वीट, क्यूट क्यूट लिहायला कसं हो सुचतं तुम्हाला शिल्पाताई! असो, हे आता फार व्यक्तीगत पातळीवर घसरत आहे, तेव्हा "दुर्बिटणेबै, आवरा"! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ताई का एकदम...आम्ही एवढे काही मोठे नाही झालो अजून =)) =)) असो. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/