Skip to main content

वा(रुळ)

लेखक sur_nair यांनी शुक्रवार, 25/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस रात्र अन्न शोधत आम्ही चालायचो ती एका ओळीत सरळ जायची मी दुसर्या ओळीत सरळ जायचो बोरिक पावडर व कीटक नाशकाचे फवारे, चुकवून चालत असताना अधे मध्ये थांबून एकमेकांना अबोलसा संकेत द्यायचो साखरचे कण घेऊन कधीतरी ती गेली दुसर्या वारुळात वास्तव्याला मी मात्र तुटलेले वारूळ पुन्हा बांधायचा प्रयत्न करतोय, जमा करत वाळूचे ... कण, कण
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1328
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

एक वेगळाच दृष्टीकोन

छान ! --अवलिया

मस्त. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||