दिवस रात्र
अन्न शोधत आम्ही चालायचो
ती एका ओळीत सरळ जायची
मी दुसर्या ओळीत सरळ जायचो
बोरिक पावडर व
कीटक नाशकाचे फवारे, चुकवून चालत असताना
अधे मध्ये थांबून
एकमेकांना अबोलसा संकेत द्यायचो
साखरचे कण घेऊन कधीतरी
ती गेली दुसर्या वारुळात वास्तव्याला
मी मात्र तुटलेले वारूळ पुन्हा बांधायचा
प्रयत्न करतोय, जमा करत वाळूचे ... कण, कण
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1328
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा...(रुळ)
सहमत..
In reply to वा...(रुळ) by राजेश घासकडवी
छान
मस्त. सवतचि