वाढदिवस
अलीकडे ते एकमेकांचा
वाढदिवस साजरा करत नाहीत
एकमेकांना छोटासा पुष्पगुच्छ
साधसं भेटकार्डही देत नाहीत
इतर कुठल्याही दिवसासारखी
ती तारीख येते, निघून जाते
मित्र मैत्रिणींच्या शुभेच्छामध्ये
हरवतात दोघे एकमेकांचे
'वय वजन वाढते त्यात
साजरं काय करायचं' ती म्हणते
डिनर व केक, सुंदरशी भेट
त्याची सर्व इच्छाच मरते
कधी तोही असतो हिरमुसलेला
तिच्यावर कशास्तव चिडलेला
त्याचा आवडीचा पदार्थ करायचा
मग तिचाही बेत रद्ध झालेला
यावेळेस तो विचार करतोय
निदान प्रयत्न तरी करायचा
डिनर नको तर चौपाटीवरच्या
भेळेचाच आग्रह करायचा
कोमेजणाऱ्या फुलांऐवजी
मोगऱ्याचं रोप घ्यायचं
पोकळ शब्दांच्या कार्डाऐवजी
कवितेचं एक पुस्तक द्यायचं
तिच्याही मनात असेच विचार
जखमांवर फुंकर घालावे
केकचा नुसता बहाणा करत
अंतर दोघांतले कापावे
यावेळेस काही वेगळेसे होईल
कदाचित वाढदिवस साजरा होईल
प्रश्न आता फक्त उरतो एवढा
पहिला पुढाकार कोण घेईल?
सुरेश नायर
http://sites.google.com/site/surmalhar/
प्रतिक्रिया
16 May 2010 - 2:47 am | शुचि
वा रे वा वय तर वाढणारच. It's an honor & exclusive priviledge to get old side by side with each other :)
वजन वाढणार ह्म्म्म :( That's sad =))
कविता आवडली.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
20 May 2010 - 1:16 pm | वाहीदा
खरे आहे !
It is an absolute privilege and honour to grow together along with someone you really love.
त्याच संदर्भात कुठेतरी सुंदरसे वाचलेले आठविले
Wrinkles and scars they appear,
but that's not what I see.
I still see that lovely girl, I
fell in love with so many years ago.
Gracefully we journey and
together we will grow old,
I would not want it any other way.
Loving you always even till the day I have to go.
~ वाहीदा
21 May 2010 - 9:51 pm | sur_nair
खुप छान शब्द वाहिदाजी
16 May 2010 - 3:52 am | अरुण मनोहर
कविता आवडली.
16 May 2010 - 11:40 am | मदनबाण
छान कविता...
मदनबाण.....
"Life is an art of drawing without an eraser."
John Gardner
16 May 2010 - 4:26 pm | दत्ता काळे
कविता आवडली
16 May 2010 - 6:10 pm | पाषाणभेद
व्वा दोघांनीही मैत्री शेवटपर्यंत टिकवलेली दिसतेय.
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
16 May 2010 - 6:30 pm | अरुंधती
कविता आवडली! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
16 May 2010 - 6:46 pm | ऋषिकेश
छान हळूवार कविता.. आवडली
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
17 May 2010 - 7:10 am | निरन्जन वहालेकर
छान कविता ! खोलवर जाऊन भिडणारी ! ! आवडली ! ! !
17 May 2010 - 7:11 am | सहज
कविता आवडली.
18 May 2010 - 9:22 am | क्रान्ति
वा! अगदी सही! :)
क्रान्ति
अग्निसखा
19 May 2010 - 7:11 pm | sur_nair
सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
19 May 2010 - 11:31 pm | बेसनलाडू
(पुढारी)बेसनलाडू
20 May 2010 - 12:10 am | शिल्पा ब
छान कविता... बघु या वेळेस वाढदिवस साजरा करता येतो का? :D
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
20 May 2010 - 12:44 pm | राघव
छान मांडलय! आवडले.
कोमेजणाऱ्या फुलांऐवजी
मोगऱ्याचं रोप घ्यायचं
पोकळ शब्दांच्या कार्डाऐवजी
कवितेचं एक पुस्तक द्यायचं
... हे कडवे खूप खूप आवडले! येऊ देत अजून. :)
राघव
20 May 2010 - 12:48 pm | टुकुल
हेच म्हणतो.
कविता तर आवडलीच पण
कोमेजणाऱ्या फुलांऐवजी
मोगऱ्याचं रोप घ्यायचं
पोकळ शब्दांच्या कार्डाऐवजी
कवितेचं एक पुस्तक द्यायचं
हि आयडीया चांगली आहे
--टुकुल