मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाढदिवस

sur_nair · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
वाढदिवस अलीकडे ते एकमेकांचा वाढदिवस साजरा करत नाहीत एकमेकांना छोटासा पुष्पगुच्छ साधसं भेटकार्डही देत नाहीत इतर कुठल्याही दिवसासारखी ती तारीख येते, निघून जाते मित्र मैत्रिणींच्या शुभेच्छामध्ये हरवतात दोघे एकमेकांचे 'वय वजन वाढते त्यात साजरं काय करायचं' ती म्हणते डिनर व केक, सुंदरशी भेट त्याची सर्व इच्छाच मरते कधी तोही असतो हिरमुसलेला तिच्यावर कशास्तव चिडलेला त्याचा आवडीचा पदार्थ करायचा मग तिचाही बेत रद्ध झालेला यावेळेस तो विचार करतोय निदान प्रयत्न तरी करायचा डिनर नको तर चौपाटीवरच्या भेळेचाच आग्रह करायचा कोमेजणाऱ्या फुलांऐवजी मोगऱ्याचं रोप घ्यायचं पोकळ शब्दांच्या कार्डाऐवजी कवितेचं एक पुस्तक द्यायचं तिच्याही मनात असेच विचार जखमांवर फुंकर घालावे केकचा नुसता बहाणा करत अंतर दोघांतले कापावे यावेळेस काही वेगळेसे होईल कदाचित वाढदिवस साजरा होईल प्रश्न आता फक्त उरतो एवढा पहिला पुढाकार कोण घेईल? सुरेश नायर http://sites.google.com/site/surmalhar/

वाचने 4331 वाचनखूण प्रतिक्रिया 17

शुचि 16/05/2010 - 02:47
वा रे वा वय तर वाढणारच. It's an honor & exclusive priviledge to get old side by side with each other :) वजन वाढणार ह्म्म्म :( That's sad =)) कविता आवडली. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

वाहीदा 20/05/2010 - 13:16
खरे आहे ! It is an absolute privilege and honour to grow together along with someone you really love. त्याच संदर्भात कुठेतरी सुंदरसे वाचलेले आठविले Wrinkles and scars they appear, but that's not what I see. I still see that lovely girl, I fell in love with so many years ago. Gracefully we journey and together we will grow old, I would not want it any other way. Loving you always even till the day I have to go. ~ वाहीदा

ऋषिकेश 16/05/2010 - 18:46
छान हळूवार कविता.. आवडली ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

शिल्पा ब 20/05/2010 - 00:10
छान कविता... बघु या वेळेस वाढदिवस साजरा करता येतो का? :D *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

राघव 20/05/2010 - 12:44
छान मांडलय! आवडले. कोमेजणाऱ्या फुलांऐवजी मोगऱ्याचं रोप घ्यायचं पोकळ शब्दांच्या कार्डाऐवजी कवितेचं एक पुस्तक द्यायचं ... हे कडवे खूप खूप आवडले! येऊ देत अजून. :) राघव

In reply to by राघव

टुकुल 20/05/2010 - 12:48
हेच म्हणतो. कविता तर आवडलीच पण कोमेजणाऱ्या फुलांऐवजी मोगऱ्याचं रोप घ्यायचं पोकळ शब्दांच्या कार्डाऐवजी कवितेचं एक पुस्तक द्यायचं हि आयडीया चांगली आहे --टुकुल