Skip to main content

मिसळपावचे अधिकृत निवेदन.

लेखक नीलकांत यांनी शनिवार, 15/05/2010 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून मिसळपाव वर जरा गोंधळाचे वातावरण तयार झालेले दिसत आहे. त्यामुळे हा सर्व गोंधळ दूर करण्यासाठी हे निवेदन देतो आहे. मिसळपाव .कॉम हे केवळ मराठी लोकांसाठी मराठीतून व्यक्त होण्यासाठीचे माध्यम म्हणून उपलब्ध करून दिलेले आहे. या संकेतस्थळाचा अन्य कसलाही हेतू नाहीये. हा खुलासा नव्याने देण्याची तशी तर गरज नव्हती कारण जे लोक या प्रवासात गेले तिनाहून अधिक वर्षे सोबत आहेत त्यांना याची जाणीव आहेच. तरी नवीन लोकांना याची कल्पना असावी हे उत्तम. सध्या मिसळपाव वर जो गोंधळ झालेला दिसतो आहे त्यात तात्यांचे नाव गुंतलेले असल्यामुळे ती चर्चा मिसळपाव.कॉम वर कायम घसरताना दिसते आहे. माझा संबंध मिसळपाव सोबत आहे, मिसळपाव उभे करण्यापासून ते आता पर्यंत मी मिसळपाववर आहे आणि तांत्रिक बाजू सांभाळतोय. सदस्यांचे आणि तात्यांचे काय चालले आहे हे मला फार उशीरा माहिती पडले. या सर्व प्रकरणात माझा, मिसळपावचा तसेच संपादकांचा कुठेही काहीही संबंध नाहीये. मिसळपाव गेले अनेक महिने मीच चालवतोय आणि या पुढेही ते तसे चालू राहील याची खात्री देतो. त्यामुळे मिसळपाव बंद पडेल अश्या अफवांवर विश्वास ठेवण्याची मुळीच गरज नाही. मिसळपावचे सर्व अधिकार माझे जवळ आहेत त्यामुळे मी व्यवस्थापनाचे निर्णय घेऊ शकतो. मात्र यापूर्वी माझे मिसळपाववर जसे वर्तन होते तसेच राहील. मी मिसळपावच्या तांत्रिक कामांतच मग्न असेल. रोजच्या संपादनाची कामे संपादक मंडळ करील. येत्या काही काळात मिसळपाव वर खूप बदल अपेक्षीत आहेत. तांत्रिक दृष्ट्या तसेच संकेतस्थळाच्या मांडणीच्या अनुषंगाने हे बदल केले जातील. मिसळपाव अधिकाधिक सहज आणि सोपे करण्यास प्राधान्य असेल. मिसळपाव हे एक सामुदायिक संकेतस्थळ आहे. अनेक विचारांची लोक येथे येत असतात, एखाद्या विषयावर प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असू शकतात. मात्र एक बाब येथे स्पष्ट करावीशी वाटते की मिसळपाव व्यवस्थापन मंडळ हे आपल्या अन्य कामांतून वेळ काढून उरलेल्या वेळात मिसळपावचे काम करते त्यामुळे, मिसळपावर वर हे नाहीये... त्याबद्दल स्पष्टीकरण द्या... खुलासा करा... वगैरे गोष्टी शक्य होत नाहीत. मिसळपावच्या मागची भूमिका लक्षात घेऊनच अश्या(काही) सदस्यांनी यापुढे अश्या प्रतिक्रिया द्याव्यात ही विनंती. मिसळपाव वरच्या प्रेमाखातर लोकांनी हक्काने दिलेली सूचना मी आदेशाप्रमाणेच मानतो मात्र याचा अर्थ हा मुळीच नाही की कुणीही यावं कुठल्याही नव्या आयडीने काहीही लिहावं आणि व्यवस्थापनाने ते गपगुमान ऐकून घ्यावं. झाल्या प्रकारामुळे लोकांचा राग मला मान्य आहे मात्र यात मिसळपाव.कॉम हे संकेतस्थळ कुठेच नाहीये, किंवा त्याच्या संपादन किंवा व्यवस्थापनाचा कुठेच काही संबंध नाहीये. त्यामुळे मिसळपाव वर प्रेम करणार्‍या सदस्यांनी गोंधळून जाऊ नये. झाल्या प्रकारातून लवकरच सर्वांनी सुखरूप बाहेर पडावं ज्यांचं नुकसान झालंय त्यांचं नुकसान भरून निघावं अशीच अपेक्षा आहे. बाकी सर्व बदलांचे परिणाम हळू हळू दिसतीलच. थोडा धीर धरा. आणि हो निश्चिंत होऊन मिसळपाव वर येत राहा. मिसळपाव सक्षम आहे. तुमच्या कुठल्याही सूचना, तक्रारींचं नेहमीच स्वागत आहे. - नीलकांत

वाचने 27311
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

योग्य वेळी निवेदन करून शंकाकुशंकांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न स्तुत्य. नितिन थत्ते

योग्य वेळी योग्य निवेदन...अभिनंदन नीलकांत ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

निवेदनाबद्दल आभारी आहे. सर्व सभासदान नम्र विनंती आहे कि मिसळपावचे नाव बदनाम होईल अशी कॄती कोणी करु नये.विचारपुर्वक आपला निर्णय घ्यावा. वेताळ

भूमिका जाहिरपणे मांडली हे उत्तमच. बिपिन कार्यकर्ते

गोंधळाचे वातावरण दुर करण्याकरीता केलेल्या जाहिर खुलाशा बद्दल धन्यवाद.. :) मिसळपाव वृद्धिंगत होत जावो ही शुभेच्छा!!!

रोखठोक असुनही अतिशय प्रांजळ आणि समयोचित निवेदनाचा हा एक सुन्दर नमुना होय, जिचे स्वागत स्थापनेपासून असलेले सदस्य तर करतीलच, पण माझ्यासारखे नव्याने या हॉटेलात आलेलेदेखील निश्चित करतील, इतके हे स्पष्ट आहे. नव्याने सदस्य झालेल्या अन्य व्यक्तींचे मत मला माहित असणे शक्य नाही, पण माझ्यापुरते मी सांगू इच्छितो कि, सदस्यत्व घेतलेल्या पहिल्या दिवसापासून मला इथे निखळ आनंद मिळत गेला आहे.... आणि व्यवस्थापक म्हणतात त्याप्रमाणे "मिसळपाव बंद पडेल अशा अफवा" याची जाणीव कुठेच दिसली नाही. कदाचित खरड माध्यमातून अशा प्रकारचे एकमेकात संदेश लिहिले गेले असतील/नसतील.... मात्र "धागा" या बाबी पासून अलिप्त आहे असे माझे वाचन मला सांगते. "....कुणीही यावं कुठल्याही नव्या आयडीने काहीही लिहावं आणि व्यवस्थापनाने ते गपगुमान ऐकून घ्यावं....." इथ "नव्या आयडी" ने याचा अर्थ "नवीन" सदस्यांनी असा नसेल असे गृहीत धरतो. मिसळपावच्या उज्ज्वल वाटचालीसाठी सर्व सदस्य सदैव "पॉझिटीव्हली" कार्यरत राहतील अशी खात्री आहे. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नीलकांत वर काही लोकांनी लेखाचे कौतुक केले आहे. काही अंशी सहमत आहे . या सर्व प्रकरणात बुडित धागे उडवण्याचे मुख्य कारण समजले नाही. जर मिपाच्या व्यवहारात पारदर्शकता असेल तर धागे उडवण्याचे काहीच कारण नव्हते. तुम्ही कसलेसे निवेदन दिले होते असे समजले पण असे काही निवेदन आमच्या नजरेस पडले नाही.

लवकरच ह्या धाग्यावर काही "द्रष्टे समाजसेवक" नको त्या प्रतिक्रीयांचा पाऊस पाडतील ह्याची खात्री आहे. त्यामुळे हा धागा वाचनमात्र ठेवावा असे वाटते. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

हेच आणि असेच. --अवलिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

द्र्ष्टे समाजसेवक सक्रिय होतील व ते कोण ते कळेलच की रे. त्यामुळे लिहून दे त्यांना. लोकांना कळेल की समाजसेवक कोण अस्सल मिपाकर कोण. :-)

नीलकांतला आणि मिसळपावला आपला फुल्टू सपोर्ट होता/ आहे/ राहिल :)

झाल्या प्रकाराचा मिसळपाव व्यवस्थापनाशी संबंध नव्हता सत्य हे माहीत होतच. पण या वाईट कामासाठी मिपाचा दुरुपयोग केला गेला हेही तितकच खर आहे. या धुराळ्यात हकनाक काही संपादकांवर धुळ उडली. निलकांतांच्या या निवेदनाने या सर्वावर पडदा पडो. मिपाच्या भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा.

माहितीबद्दल धन्यवाद नीलकांत! ह्यापुढे असे काही गैरप्रकार मिसळपाव वेबसाईटच्या माध्यमातून होऊ नयेत ह्यासाठी आवश्यक ती खबरदारी, सदस्यांना आर्थिक धोरणाचे निवेदन इत्यादी माहितीही जर आपण संकेतस्थळावर सहज उपलब्ध करून दिलीत व वैयक्तिक पातळीवर केलेल्या अर्थ व्यवहारांचा मिसळपावाशी काहीही संबंध असणार नाही असा खुलासा केलात तर चित्र अजून स्पष्ट होईल व ह्यासारखे प्रकार पुढे होणार नाहीत. अरुंधती http://iravatik.blogspot.com/

थोडक्यात आपले म्ह्णणणे चान्गले मान्ड्लेत.आता आणखि किति दिवस वरणभाताचे खिमट खाउ घालणार आहात्?मुखप्रुश्ट बदला आता?

In reply to by नरेन

अहो अजून ते खिमट वाढायला निदान एक श्रीमतीजी आहेत. पुढे त्या पण नसणार. मग फक्त अळूचं फदफदं आणि सेल्फ सर्विस =)) नितिन थत्ते

प्रथमच आपलं अस्तित्व दिसलं....... आता तेवढ पहिल पान बदला की........... ----- सौरभ :)

In reply to by मी-सौरभ

प्रथमच आपलं अस्तित्व दिसलं....... हेच तर कौतुकास्पद आहे. नाही का? बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद, नीलकांत-जी! माझा प्रतिसाद तात्यांच्या निवेदनाखाली दिला आहे. ------------------------ सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत! 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

बरेच मोठे बदल झालेले आहेत. लोकविकासचे मनःपूर्वक आभार.

In reply to by धनंजय

या मोठ्या बदलांविषयी (मुखपृष्टावरील स्त्रीचे चित्र सोडून अधिक बदल आत्तापर्यंत जाणवलेला नाही) काही माहिती मिळू शकेल काय? काही मुद्द्यांविषयी थोडेतरी स्पष्टीकरण आवश्यक आहे. मालकीविषयी सदस्यांना घेणे देणे नाही पण पैशांच्या व्यवहाराविषयी उघडपणे बोलणार्‍या सदस्यांना भविष्यात मिपाचा वापर करून सतावले जाणार नाही याची हमी व्यवस्थापकांकडून मिळू शकेल काय?

खुलाश्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा! People want leadership, Mr. President, and in the absence of genuine leadership, they'll listen to anyone who steps up to the microphone.

हे वाचून बरे वाटले. आपला गुंडोपंत

In reply to by सतोश ताइतवाले

स्वगृह पानाच्या सर्वात खाली असलेल्या पर्यायांपैकी मिसळपावचे धोरण हा पर्यायावर टिचकी मारल्यास तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.