नमस्कार,
गेल्या काही दिवसांपासून मिसळपाव वर जरा गोंधळाचे वातावरण तयार झालेले दिसत आहे. त्यामुळे हा सर्व गोंधळ दूर करण्यासाठी हे निवेदन देतो आहे.
मिसळपाव .कॉम हे केवळ मराठी लोकांसाठी मराठीतून व्यक्त होण्यासाठीचे माध्यम म्हणून उपलब्ध करून दिलेले आहे. या संकेतस्थळाचा अन्य कसलाही हेतू नाहीये. हा खुलासा नव्याने देण्याची तशी तर गरज नव्हती कारण जे लोक या प्रवासात गेले तिनाहून अधिक वर्षे सोबत आहेत त्यांना याची जाणीव आहेच. तरी नवीन लोकांना याची कल्पना असावी हे उत्तम.
सध्या मिसळपाव वर जो गोंधळ झालेला दिसतो आहे त्यात तात्यांचे नाव गुंतलेले असल्यामुळे ती चर्चा मिसळपाव.कॉम वर कायम घसरताना दिसते आहे. माझा संबंध मिसळपाव सोबत आहे, मिसळपाव उभे करण्यापासून ते आता पर्यंत मी मिसळपाववर आहे आणि तांत्रिक बाजू सांभाळतोय. सदस्यांचे आणि तात्यांचे काय चालले आहे हे मला फार उशीरा माहिती पडले. या सर्व प्रकरणात माझा, मिसळपावचा तसेच संपादकांचा कुठेही काहीही संबंध नाहीये.
मिसळपाव गेले अनेक महिने मीच चालवतोय आणि या पुढेही ते तसे चालू राहील याची खात्री देतो. त्यामुळे मिसळपाव बंद पडेल अश्या अफवांवर विश्वास ठेवण्याची मुळीच गरज नाही.
मिसळपावचे सर्व अधिकार माझे जवळ आहेत त्यामुळे मी व्यवस्थापनाचे निर्णय घेऊ शकतो. मात्र यापूर्वी माझे मिसळपाववर जसे वर्तन होते तसेच राहील. मी मिसळपावच्या तांत्रिक कामांतच मग्न असेल. रोजच्या संपादनाची कामे संपादक मंडळ करील. येत्या काही काळात मिसळपाव वर खूप बदल अपेक्षीत आहेत. तांत्रिक दृष्ट्या तसेच संकेतस्थळाच्या मांडणीच्या अनुषंगाने हे बदल केले जातील. मिसळपाव अधिकाधिक सहज आणि सोपे करण्यास प्राधान्य असेल.
मिसळपाव हे एक सामुदायिक संकेतस्थळ आहे. अनेक विचारांची लोक येथे येत असतात, एखाद्या विषयावर प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असू शकतात. मात्र एक बाब येथे स्पष्ट करावीशी वाटते की मिसळपाव व्यवस्थापन मंडळ हे आपल्या अन्य कामांतून वेळ काढून उरलेल्या वेळात मिसळपावचे काम करते त्यामुळे, मिसळपावर वर हे नाहीये... त्याबद्दल स्पष्टीकरण द्या... खुलासा करा... वगैरे गोष्टी शक्य होत नाहीत. मिसळपावच्या मागची भूमिका लक्षात घेऊनच अश्या(काही) सदस्यांनी यापुढे अश्या प्रतिक्रिया द्याव्यात ही विनंती.
मिसळपाव वरच्या प्रेमाखातर लोकांनी हक्काने दिलेली सूचना मी आदेशाप्रमाणेच मानतो मात्र याचा अर्थ हा मुळीच नाही की कुणीही यावं कुठल्याही नव्या आयडीने काहीही लिहावं आणि व्यवस्थापनाने ते गपगुमान ऐकून घ्यावं. झाल्या प्रकारामुळे लोकांचा राग मला मान्य आहे मात्र यात मिसळपाव.कॉम हे संकेतस्थळ कुठेच नाहीये, किंवा त्याच्या संपादन किंवा व्यवस्थापनाचा कुठेच काही संबंध नाहीये. त्यामुळे मिसळपाव वर प्रेम करणार्या सदस्यांनी गोंधळून जाऊ नये.
झाल्या प्रकारातून लवकरच सर्वांनी सुखरूप बाहेर पडावं ज्यांचं नुकसान झालंय त्यांचं नुकसान भरून निघावं अशीच अपेक्षा आहे. बाकी सर्व बदलांचे परिणाम हळू हळू दिसतीलच. थोडा धीर धरा. आणि हो निश्चिंत होऊन मिसळपाव वर येत राहा. मिसळपाव सक्षम आहे.
तुमच्या कुठल्याही सूचना, तक्रारींचं नेहमीच स्वागत आहे.
- नीलकांत
वाचने
27311
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
योग्य वेळी
धन्यवाद निलकांत.....
निलकांत धन्यवाद . .
भूमिका
धन्यवाद
"पॉझिटीव्हली" कार्यरत
आभार
लवकरच ह्या
+१
In reply to लवकरच ह्या by परिकथेतील राजकुमार
अंशता सहमत
In reply to लवकरच ह्या by परिकथेतील राजकुमार
नीलकांतला
धन्यवाद
झाल्या
सहमत.
In reply to झाल्या by गणपा
माहितीबद्
निवेदन
असू द्या हो
In reply to निवेदन by नरेन
@नीलकांत
असंच पाहिजे...
In reply to @नीलकांत by मी-सौरभ
निवेदनाबद
प्रतिसाद काढून टाकला आहे
धन्यवाद, नीलकांत-जी!
स्तुत्य बदल
कोणते मोठे बदल?
In reply to स्तुत्य बदल by धनंजय
खुलाश्याब
बरे वाटले!
मी प वर कोणते विषय मांडावे कि मांडू नये काही मदत मिळेल काय
स्वगृह पानाच्या सर्वात खाली
In reply to मी प वर कोणते विषय मांडावे कि मांडू नये काही मदत मिळेल काय by सतोश ताइतवाले