आरसा तिच्या शयन गृहाचा !
आरसा तिच्या शयन गृहाचा ! ! !
तुझ्या शयन गृहाच्या आरशाची असूया मला
न्याहळत असतो तो जरा जास्तच तुला.
तूहि तितकीच निलाजरी.
नेत्रपल्लवी होता त्यासवे
खुदकन गोड गाली हसते,
होता नजरा-नजर माझ्यासंगे मात्र
लाज वदनी अन नजर तुझी खाली असते.
“ तासनतास काय चालते ग हितगुज तुमचे “ ?
आजतागत नाही कळले मला
माझ्यापरी सखा प्यारा तुझा
अन सख्खा वैरी माझा ! ! !
आसुसलेली नजर त्याची
जाण कशी नाही तुला ?
न्याहाळतो अंतरंग न अंतरंग तुझे
म्हणूनच त्याची असूया मला
वाटतं,
“ मीच व्हाव आरसा तुझ्या शयन गृहाचा.
करावं जतन तुझ्या छबिचं हृदयांत,
प्राषावं अमृत तुझ्या अधरांच,
विसावावं गर्द केशसंभारांत,
होऊन कुमकुम तुझ्या ललाटाचं ” ! ! !
निरंजन वहाळेकर
लेखनविषय:
याद्या
2167
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
माझ्यापरी
“ तासनतास
“ तासनतास
झक्कास
धन्यवाद ! !