Skip to main content

आरसा तिच्या शयन गृहाचा !

आरसा तिच्या शयन गृहाचा !

Published on सोमवार, 26/04/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
आरसा तिच्या शयन गृहाचा ! ! ! तुझ्या शयन गृहाच्या आरशाची असूया मला न्याहळत असतो तो जरा जास्तच तुला. तूहि तितकीच निलाजरी. नेत्रपल्लवी होता त्यासवे खुदकन गोड गाली हसते, होता नजरा-नजर माझ्यासंगे मात्र लाज वदनी अन नजर तुझी खाली असते. “ तासनतास काय चालते ग हितगुज तुमचे “ ? आजतागत नाही कळले मला माझ्यापरी सखा प्यारा तुझा अन सख्खा वैरी माझा ! ! ! आसुसलेली नजर त्याची जाण कशी नाही तुला ? न्याहाळतो अंतरंग न अंतरंग तुझे म्हणूनच त्याची असूया मला वाटतं, “ मीच व्हाव आरसा तुझ्या शयन गृहाचा. करावं जतन तुझ्या छबिचं हृदयांत, प्राषावं अमृत तुझ्या अधरांच, विसावावं गर्द केशसंभारांत, होऊन कुमकुम तुझ्या ललाटाचं ” ! ! ! निरंजन वहाळेकर
लेखनविषय:

याद्या 2167
प्रतिक्रिया 5

माझ्यापरी सखा प्यारा तुझा अन सख्खा वैरी माझा ! ! ! वाह उस्ताद वाह!!

“ तासनतास काय चालते ग हितगुज तुमचे “ ? न्याहळत असतो तो जरा जास्तच तुला. निर्जिव वस्तुंवर सजीव्तेचा आरोप.....खुपच छान जुळुन ........आलीये रचना.. पुलेशु... "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

प्रतिसादा साठी धन्यवाद ! ! उत्साह वाढला ! !