Skip to main content

आरसा तिच्या शयन गृहाचा !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 26/04/2010 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
आरसा तिच्या शयन गृहाचा ! ! ! तुझ्या शयन गृहाच्या आरशाची असूया मला न्याहळत असतो तो जरा जास्तच तुला. तूहि तितकीच निलाजरी. नेत्रपल्लवी होता त्यासवे खुदकन गोड गाली हसते, होता नजरा-नजर माझ्यासंगे मात्र लाज वदनी अन नजर तुझी खाली असते. “ तासनतास काय चालते ग हितगुज तुमचे “ ? आजतागत नाही कळले मला माझ्यापरी सखा प्यारा तुझा अन सख्खा वैरी माझा ! ! ! आसुसलेली नजर त्याची जाण कशी नाही तुला ? न्याहाळतो अंतरंग न अंतरंग तुझे म्हणूनच त्याची असूया मला वाटतं, “ मीच व्हाव आरसा तुझ्या शयन गृहाचा. करावं जतन तुझ्या छबिचं हृदयांत, प्राषावं अमृत तुझ्या अधरांच, विसावावं गर्द केशसंभारांत, होऊन कुमकुम तुझ्या ललाटाचं ” ! ! ! निरंजन वहाळेकर
लेखनविषय:

वाचने 2169
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

माझ्यापरी सखा प्यारा तुझा अन सख्खा वैरी माझा ! ! ! वाह उस्ताद वाह!!

“ तासनतास काय चालते ग हितगुज तुमचे “ ? न्याहळत असतो तो जरा जास्तच तुला. निर्जिव वस्तुंवर सजीव्तेचा आरोप.....खुपच छान जुळुन ........आलीये रचना.. पुलेशु... "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!" http://lh3.ggpht.com/_v6NwzplyHY8/S9QIEXKNwGI/AAAAAAAAAQg/71viaq8d1Gg/s…" width="

“ तासनतास काय चालते ग हितगुज तुमचे “ ? मस्तच ,... binarybandya™

प्रतिसादा साठी धन्यवाद ! ! उत्साह वाढला ! !