मागणं
प्रेम कर माझ्यावर
किंवा माझा द्वेष कर
मागणं मात्र एक मान्य कर
जे करशील ते मनापासून कर
तुझ्या प्रेमाने मला मढव
आणि प्रीतिने जडव
अथवा रस्त्यात अडव
आणि सँडलने तुझ्या बडव
कॄपा मात्र एक माझ्यावर कर
जे करशील ते मनापासून कर
हात तुझा दे माझ्या हातात
अथवा दे श्रीमुखात
आयुष्यात दे मला साथ
अथवा पेकाटात घाल लाथ
धन्य होईल प्रेम माझं ऐकलंस तू जर
जे करशील ते मनापासून कर
लेखनविषय:
याद्या
1791
प्रतिक्रिया
7
काव्यरस
मिसळपाव
कविता चांगली वाटली...!
मार खायची एव्हढीच हौस असेल तर....
बसला वेताळ मानगुटीवर..
मना पासुन
मस्तय
ह्म्म .....
खरं असावं
In reply to ह्म्म ..... by शुचि