Skip to main content

मागणं

मागणं

Published on मंगळवार, 20/04/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रेम कर माझ्यावर किंवा माझा द्वेष कर मागणं मात्र एक मान्य कर जे करशील ते मनापासून कर तुझ्या प्रेमाने मला मढव आणि प्रीतिने जडव अथवा रस्त्यात अडव आणि सँडलने तुझ्या बडव कॄपा मात्र एक माझ्यावर कर जे करशील ते मनापासून कर हात तुझा दे माझ्या हातात अथवा दे श्रीमुखात आयुष्यात दे मला साथ अथवा पेकाटात घाल लाथ धन्य होईल प्रेम माझं ऐकलंस तू जर जे करशील ते मनापासून कर
लेखनविषय:

याद्या 1791
प्रतिक्रिया 7
काव्यरस

मना पासुन कर म्हणा ... उगा एक्स्ट्रा एफर्ट्स लाऊन .. कुंथुन कुंथुन करण्यात काहीही हाशिल नाही :) - प्रेमेश जोडेबडवी

मस्तय आवडली..... :*

ह्म्म ..... पराकोटीचा द्वेष व्हायलाही ऋणानुबंधाच्या गाठी असाव्या लागतात. हिरण्यकश्यपूची विपरीत भक्ती होती श्रीविष्णूंवरती म्हणून त्याला मोक्ष प्राप्ती झाली. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.

In reply to by शुचि

खरं असावं बहुतेक.... कविता आवडली की नाही काय माहीत... पण प्रतीसाद आवडला.... :) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. тельца имени индиго :D