इनग्लोरीयस बास्टर्ड या चित्रपटाने कुठली गोष्ट केली असेल तर क्रिस्टोफ वॉल्ट्ज. एकेक प्रसंग त्याने असे उभे केले की अंगावर काटा येतो, हिसेपेक्षाही हिंसा होनार ही भिती किती मोठी असते हे तो दाखवून देतो. मग तो सुरवातीचा प्रसंग असो की रेस्टॉरंट चा प्रसंग असो, की इटालियन बोलून समोरचा इटालियन नाही हे पकडने असो. अप्रतिम.
दिल चाहता है मधला सिडनीच्या रेल्वे स्टेशनचा प्रसंग भारी आवडला होता.प्रिटा झिंटा स्टेशनवर मागे राहते, एक भिकारी तिचा पाठलाग करतो. अमीर तिकडन येतो. वाटल आता नेहमीची मारामारी. तो चक्क त्याला मिठी मारतो. जबरदस्त. अमीरच्या पात्राशी पुर्णपणे सुसंगत.
एक छोटासा पण उत्तम प्रसंग कहानी या चित्रपटातला. दुसऱ्यांदा बघितला तेंव्हा लक्षात आला. विद्या बालन एका टपरीवर चहा प्यायला थांबले असतात. इन्सपेक्टर तिला काहीतरी मुलांविषयी बोलतो तुझा मुलगा खूप सुंदर असेल असले काहीतरी. ती पाण्याचा एक घूट घेते कुठेतरी शून्यात बघते. बाकी बॉब बिश्वास हे पात्र आणि त्याची खून करण्याची पद्धत अफलातून. लक्षात राहीले ते बिद्या नही विद्या.
ब्लॅक हॉक डाउन मधला सीन (शेवटचा)
मोगादिशु रेड्स मधे शहीद झालेल्या आपल्याच कनिष्ठ अन जवळच्या मित्राच्या मृतदेहावर हात ठेऊन बोललेला सार्जंट एवर्समन (जॉश हार्टनेट) चा अप्रतिम मोनोलॉग
At the time when we were leaving right when we were being shipped a buddy of mine asked me
"Y r u going to someone else's war? Someone else's problem? Do u think of urself as a hero?"
I Neva knew what to tell him at that time but today I know
Nobody asks to be a hero, it just sometimes turns out that way.
I'll speak to your Ma' n Pa' when I reach home
त्या नंतर ग्लोबमास्टर मधे बॉडी कास्केट्स लोड होताना सल्यूट करतानाची सार्जंट ची प्रतिमा
निव्वळ अप्रतिम
बाग़बान मध्ये अमिताभला घरी जेवायला कांहीच नसतं
पण हेमा मालिनीला मी यंव खातोय त्यंव खातोय असं फोनवरन खोटंच सांगतो,
त्यावेळी हेमा मालिनी त्याला म्हणते,तुम्हें झूठा बोलना भी नहीं आता तो प्रसंग
आणि शेवटचं त्या च्या सत्काराच्या वेळंचं त्याचं भाषण
कमल हसनच्याच 'हिंदुस्तानी' चित्रपटातील 'प्यारे पंछी बाहोंमे' या गाण्यामधील दोन प्रसंग लक्षात राहिले आहेत .
१. गाण्याच्या सुरुवातीला एक ज्येष्ठ संगीत शिक्षिका कमल हसनच्या ( सेनापती ) मुलीला संगीत शिकविते आहे . त्यावेळी गायलेली 'तंदनानी तानानी आनंदमे ,तंदनानी तानानी आनंदमे ' हि आलापी व तेव्हा आपल्या मुलीकडे , परिवाराकडे कौतुकाने बघणारा कमल हसन. याचे काहि श्रेय दिग्दर्शक शंकर व संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांचेहि आहे .
२. कुंभारवाड्यामध्ये असलेला ओल्या मातीचा एक मोठा ढिगारा .या ओल्या मातीमध्ये तोल सांभाळुन नाचण्याचा प्रयत्न करणारे कुंभार , तरुण कमल हासन व त्याची बहिण . पण तिघेही तोल जाउन पडतात. तेव्हा मिस्किलपणे हसत आपल्या चपला काढुन ज्येष्ठ कमल हासन त्या ओल्या मातीमध्ये शिरतो व सर्वांना खास ग्रामिण शैलीतील नाच करुन दाखवितो . त्या वेळेस त्याची पत्नी त्याच्या बाजुला उभी राहुन आपल्या नवरयाकडे कौतुकाने बघत त्याला नृत्यात साथ करते .
वोह सात दिन - नायक म्हणून अनिल कपूरचा पहिला चित्रपट. गरिबीचे चित्रण कुठलाही भडकपणा न वापरता कसे करावे याचे चांगले उदाहरण म्हणता येईल असा एक चित्रपट. यातील एका प्रसंगात अनिल कपूर नदीच्या पाण्यात कापड भिजवून पोटाभोवती बांधत असतो. यावर त्याचा चेला नायिकेला (पद्मिनी कोल्हपुरे) स्पष्टीकरण देतो की, ओले कापड करकचून पोटाला बांधले की भूक लागत नाही. अपना गुरू दिन मे तीन बार ऐसेही खाना खाता है. या प्रसंगात पडद्यावरील तिघांचाही अभिनय मनाला चटका लावून जाणारा.
द पेट्रियट - युद्ध व सत्ताधाऱ्यांबरोबरचा संघर्ष यातील फोलपणा कळून चुकलेला एक थोर सेनानि (बेंजामीन फ्रँकलिन) मेल गिब्सन ने या चित्रपटात जोरदार रंगवला होता. या चित्रपटात मला सर्वाधिक भावलेला एक प्रसंग. बेंजामीन च्या ७ अपत्यांपैकी सर्वात धाकटी मुलगी जी जन्मापासून कधीच बोललेली नसते, नंतर बोलणे सुरू झाल्यानंतरही पित्याबरोबर कधीच बोलत नसते. एका प्रसंगात बेंजामीन लढाईवर निघताना सर्व कुटूंबियांचा निरोप घेत असतो. तिलाही बोलते करण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्नांना यश येत नाहीये हे पाहून खिन्न मनाने निघालेला असताना ती आयुष्यात प्रथमच त्याला बाबा म्हणून हाक मारते. हा फारच हृद्य प्रसंग आहे. आताही इथे टंकताना डोळ्याच्या कडा ओलसर झाल्या आहेत.
श्रीरंग जी
पॅट्रीयट ची लिंक दिली तर आनंद होइल.
सिनेमा बघितला नसेल तर तुटक प्रसंग नुसत्या वर्णनाने समजायला अवघड जातो.
जस डांगेनी सीन दाखवल्यावर त्यातला भाव पोहोचला तस.
श्रीरंग जी
पॅट्रीयट ची लिंक दिली तर आनंद होइल.
सिनेमा बघितला नसेल तर तुटक प्रसंग नुसत्या वर्णनाने समजायला अवघड जातो.
जस डांगेनी सीन दाखवल्यावर त्यातला भाव पोहोचला तस.
काय रंगवला आहे बेंजामिन मार्टिन मेल गिब्सन ने! अत्युच्च आहे राव ! सोबत हीथ लेजर सारखा कसलेला अभिनेता दोन सीन अक्षरशः डोळ्यात पाणी आणतात माझ्या
१. शेवटच्या युद्धात उभा असताना रांगेतला एक गोरा नागरिक शिपाई एका ऑकम नावे ब्लॅक माणसाला सांगतो की त्याची सक्तिची मिलिट्री सर्विस संपली आहे व तो आता स्वतंत्र नागरिक आहे ह्यावर तो कृष्णवर्णीय माणुस त्याच्याकडे पाहुन म्हणतो की त्याला तो स्वतंत्र असल्याचे माहिती आहे पण तो आज युद्धात स्वयंस्फूर्ति ने आलाय, तेव्हा तो गोरा म्हणतो की "मला अभिमान वाटतो की आज आमच्यासोबत इथे आहेस" बॉस अमेरिका नामे रसायन कसले बनले असेल अन किती विशाल दृष्टीचे फाउंडिंग फादर्स असतील त्याचे हे लगेच स्ट्राइक होते त्या सीन मधुन
२. बेंजामिन मार्टिन युद्धात मोड़कळीला आलेली फळी सांधायला जेव्हा पळणाऱ्या एका सैनिकाच्या हातातला झेंडा घेऊन परत पुढे कूच करतो तो क्षण
या चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत जे खूप खोलवर परिणाम करतात. चित्रपटाच्या सुरुवातीला स्वतःच्या डोळ्यांसमोर ब्रिटिश सेनेतील अधिकार्याकडून स्वतःचा किशोरवयीन मुलगा मारला जातो तेव्हा त्याक्षणी संयम न ढळू देता बेंजामिन प्रथम इतर मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेतो. नंतर दोन लहानग्या मुलांच्या मदतीने ब्रिटिश तुकडीने अटक केलेल्या मोठ्या मुलाची सुटका करवतो.
या चित्रपटाचे कुणा ताकदीच्या माणसाने मिपावर रसग्रहण करावे.
श्रीरंगदादा... अगदी हेच्च टाईप करणार होतो.
कुणाचीही शप्पथ!
वा! अजबच प्रकार झाला हा! (तशी चित्रपटांची माझी यादी बरीच लांबलचक आहे!)
"पेट्रीयट" तर पारायणे केल्यासारखा पाहिला आहे! मेल गिब्सन याच चित्रपटामुळे आवडायला लागला. नंतर ॲपोकॅलिप्समुळे तर हात जोडले त्याला!
तर....
'वो सात दिन'बद्दल सांगायचं म्हणजे हा माझा अनिल कपूरच्या चित्रपटांपैकी सगळ्यात आवडता चित्रपट. चमेली की शादी, साहेब, मेरी जंग, नायक अशी रत्ने यानंतर!
वा! मजा आ गया!
धन्यवाद!
बना चे गुंड इन्स्पेक्टरला धरुन आणतात त्याला भाटी समोर उभ करतात तो म्हणतो
ठीक है मारो लेकीन एक लास्ट ये वर्दी उतार लो ... बहोत प्यार करता हु इसक...........
दोन गोळ्या वाक्य पुरे होण्याआधीच भाटी त्याला मारतो
आणि दुसर्या सहकार्याला सांगतो
" वर्दी उतार के गाड दे इसको. "
मग आतुन बना येतो व त्याचा तो निळा साथीदार
बना म्हणतो
ये तो उड गई हम भी उडे
आणि ते दोन्ही बाहेर जाऊ लागतात तितक्यात भाटी समोर येऊन त्याला अडवतो
बना भाटीला म्हणतो " जाने दे ना यार "
"बाहर कितना कुछ चल रहा होगा "
भाटी म्हणतो "बना मना किया था ना आपको बाहर जाने के लीए "
बना = "मुझे मालुम है मै भुल गया था "
बना परत बाहेर च्या दिशेने जाऊ लागतो भाटी एक गोळी चालवुन त्याला सांगतो बाहेर नाही
"कमरा उधर है "
आत घरात जाता जाता बना पुटपुटतो
"मै अकेला नही हु इस घर मे जो रास्ता भुल गया"
आयुष्यभरासाठी घरात कोंडलेला बना (जॉन लेनन च देशी अवतारातल लॉकेट गळ्यात घालणारा ) एकदाच फ़क्त एकदाच बाहेर जाण्याचा क्षीण प्रयत्न करतो
त्याच ते बाहर कितना कुछ चल रहा होगा बोलतांना चे हावभाव हातवारे ह्रद्य चिरुन जातात ते शब्द संवाद
सिनेमा बघितला असेल तर त्या पात्रा मध्ये काय जान ओतलेली आहे ते तत्काळ कळेल आणि त्या संवादाची इन्टेसीटी पण समजेल.
नंतर ही अनेक प्रसंगात डुगी बना च्या बेबंद तथाकथित क्रांती ला त्यातल्या फ़ोलपणाला ज्या तीव्र संवादाने बना काउंटर करत असतो
ते सर्व विलक्षणच आहे हिंदी चित्रपटाने इतकी उंची क्वचितच गाठलीय.
द परस्युएट ऑफ़ हॅपीनेस मधला अखेरचा प्रसंग ज्यात जीवघेण्या कठोर संघर्षानंतर अखेर विल स्मीथ ( क्रीस गार्डनर च्या सत्यकथेवर आधारीत चित्रपट ) यशस्वी होतो. जेव्हा त्याला अखेर कामं मिळत आणी बॉस त्याला गुडलक म्हणुन हात मिळवतात एक नोट देतो मग तो जेव्हा बाहेर अत्यंत आत्मविश्वासाने बाहेर पडतो व म्हणतो " धिस पार्ट ऒफ़ माय लाइफ़..... इज लिटल पार्ट.... इज कॉल्ड हॅपीनेस.. ऑफ़ीस बाहेर पडुन अत्यंत आत्मविश्वासाने ... तो गर्दीतुन चालु लागतो.... त्यावेळेस त्याच्या चेहर्यावरील ते आनंदाचे भाव ती एक्साइटमेंट त्याचं ते डोळे भरुन येणं काय अभिनय तिथुन तो पाळणाघरात जाऊन तीथे असलेल्या आपल्या मुलाला उचलुन घेतो आणि कवटाळतो. ते बॅकग्राउंड मधल संगीत ते सर्व सर्व फ़ारच सुंदर प्रसंग
"परिचय" या चित्रपटातील "बिते ना बिताई रैना" या गीतातील एक प्रसंग लक्षात राहतो .
जया भादुरी "बिते ना बिताई रैना" हे गीत म्हणत असते . मध्येच तिला गाण्यातील पुढील ओळ आठवत नाही . तेव्हा पाठीमागुन तिचे आजारी वडील (संजीवकुमार) येतात . व गाण्यातील ती ओळ पुर्ण करतात .
सिल्वेस्टर स्टेलोन कढून अभिनयाची अपेक्षा करणे चुकीचे पण तरिही त्याने Oskar व् over the top मधे केलेला अभिनय दाद घेऊन जातो.
Over the top मधे स्टेलोन आपल्या गड़गंज श्रीमंत असलेल्या सासऱ्याला भेटायला जातो. बोलणी फिसकटतात. स्टेलोन जायला निघतो. नकार ऐकन्याची सवय नसलेला स्टेलोनचा सासरा आपल्या गुंडाकरवी स्टेलोनचा रस्ता अडवतो. स्टेलोन शांतपणे सांगतो " talk is over" तरिही तो गुंड हात आडवा ठेऊन स्टेलोनला अडवतो. बस्स स्टेलोन त्याला पूर्ण ताकदिनीशि एक ठोसा ठेऊन देतो. तो गुंड तो उभी असलेली चौकट घेऊन खाली कोसळतो. एक बापच त्या ठोशाचि ताकत समझु शकतो. स्टेलोन पुढे स्पर्धेत काय करणार आहे याची कल्पना येते
हॉलीवूड मधील बाप माणूस!
The terminal . एक जबरदस्त सिनेमा . ज्या अमेरिकेत जायला लोक आकाशपाताळ एक करतात त्या अमेरिकेत फक्त आपल्या बापाची इच्छा म्हणून येणारा व् प्रतिकुल परिस्थितित देखील सर्व जुळवून घेणारा माणूस टॉम ने जबरदस्त रंगवला आहे. किंबहुना टॉम हैंक्सने भूमिका केलेला कोणताही सिनेमा मला रटाळ वाटलेला नाही.
किंबहुना टॉम हैंक्सने भूमिका केलेला कोणताही सिनेमा मला रटाळ वाटलेला नाही.
कास्ट अवे मधला तो फुटबॉल कंपॅनियन बोटीवरुन पडुन त्याच्या नजरेसमोर ह्ळुहळु वाहत जातो. तेव्हाचा त्याचा आकांत
क्या बोलते बाबाजी ?
1997 इटालियन चित्रपट
बाप मुलाला सांगतो की नाझी छळछावणीत दिलेले काम(task) पुर्ण करणे आवश्यक आहे जे एक खेळ आहे.
आणि जिकंणार्याला रणगाडा बक्षिस म्हणुन देणार आहेत.
छावणीत छळ , रोगराई व मृत्यू ने वेढला असूनही मुलगा स्वत:च्या निरागसपणामुळे बापच्या कल्पनाविलासावर शंका घेत नाही.
बाप शेवट होईपर्यंत नाटक चालू ठेवतो. तो मुलाला एका कपाटात लपवतो आणि सांगतो हे शेवटचे काम(task)आहे. हे पुर्ण केल्यावर रणगाडा बक्षिस म्हणुन तुलाच मिळेल.
दरम्यान बाप त्याच्या बायकोला शोधण्यासाठी जाताना एक जर्मन सैनिकला सापडतो आणि मारला जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मुलागा कपाटाबाहेर येतो,तेथे रणगाडाच्या नेतृत्वाखालील अमेरिकन सैन्य येते.
आणि तो खुष होतो, खेळ आणि बक्षिस जिंकला असल्याची त्याला खात्री पटते.
एका दुकानात राखी व अमिताभ बच्चन भेटतात आणि बोलत असतात तेवढ्यात पूनम धिल्लन तिथे येते, राखी अमिताभची ओळख करून देते "ये है आर. के. गुप्ताजी की बेटी..." त्या क्षणी अमिताभच्या चेहर्यावरचे बदललेले भाव, एका अर्थाने ही आपली बहीण...!!! निव्वळ अप्रतिम.
प्रतिक्रिया
रॉय शानदार
आवडलेले प्रसंग
ब्लॅक हॉक डाउन मधला सीन
बाग़बान मध्ये अमिताभला घरी
कमल हसन ( मुळ नाव कमलाहासन )
अपनी चौखट का दिया... गिविंग
संदिप जी एलाबोरेट प्लीज
स्वदेस.
माझी थोडी भर
वोह सात दिन मधला तो प्रसंग
श्रीरंग जी पॅट्रीयट ची लिंक दिली तर आनंद होइल
श्रीरंग जी पॅट्रीयट ची लिंक दिली तर आनंद होइल
द पेट्रियट मधले दृश्य
काय रंगवला आहे बेंजामिन
अप्रतिम चित्रपट आहे
आयला...
गुलाल मधला पियुष मिश्रा चा तो प्रसंग
परस्युएट ऑफ हॅपीनेस मधला क्लायमॅक्स चा तो प्रसंग
परस्युएट ऑफ हॅपीनेस च्या प्रसंगाची लिंक
परिचय
दिलीप कुमारचा अभिनय छान
दुनियादारी
दुनियादारी
Over the top
टॉम हैंक्स
बाबाजी फिर कास्ट अवे के बारे मे क्या खयाल है ?
किंबहुना टॉम हैंक्सने भूमिका केलेला कोणताही सिनेमा मला रटाळ वाटलेला नाही.कास्ट अवे मधला तो फुटबॉल कंपॅनियन बोटीवरुन पडुन त्याच्या नजरेसमोर ह्ळुहळु वाहत जातो. तेव्हाचा त्याचा आकांत क्या बोलते बाबाजी ?तुमच आमच जमणार राव
लै वेळा सहमत..
अरे तलाश राहिलाच कि? तलाश मधे
Life Is Beautiful
पुन्हा त्रिशूल!