✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अगत्यार जीव नाडी कथा भाग ६वा

श
शशिकांत ओक यांनी
Sat, 03/27/2010 - 17:20  ·  लेख
लेख

Book traversal links for अगत्यार जीव नाडी कथा भाग ६वा

  • ‹ अगत्यार जीव नाडी भाग ५ वा ....कहाणी एका पुर्वजन्मातील भावाबहिणीची....
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8964 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

झालो बुवा थक्क...

चित्रगुप्त
Sat, 03/27/2010 - 17:30 नवीन
झालो बुवा थक्क... येउद्या आणखी अशी कथने...... या अगत्यार नाडी विषयी मुळातील माहिती कुठे वाचायची?
  • Log in or register to post comments

"दिनतंती" नावाच्या तमिळ साप्ताहिकातून

शशिकांत ओक
Sat, 03/27/2010 - 19:16 नवीन
अगत्यार किंवा (अगस्त्य) जीव नाडीचे वाचन श्री.हनुमत दासन वडपळणी भागातील केंद्रातून करत असतात. त्यांच्या जीव नाडीवाचनात आलेले काही अनुभव, किस्से "दिनतंती" नावाच्या तमिळ साप्ताहिकातून वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. त्याचे स्वैर भाषांतर श्री.विश्वनाथ गोपी करतात. मराठी वाचकांना त्यातील काही अनुभवांची ओळख करून देणे हा य़ा लेखाचा उद्देश आहे. त्या अनुरोधाने नाडी ग्रंथ भविष्याची सामान्य ओळख करून देऊन नाडी लेखनकर्त्या महर्षींचा भविष्य लेखनामागील उद्देश स्पष्ट करण्याचे कार्यही घडेल. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

>>वाचकांची

II विकास II
Sat, 03/27/2010 - 17:45 नवीन
>>वाचकांची इच्छा असेल तर थक्क करणारी आणखी कथने सादर करता येतील. येउद्या अजुन, वाचतो आहे. ---- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments

लई ब्येष्ट

नंदू
Sat, 03/27/2010 - 19:22 नवीन
ही ष्टोरी पण लई ब्येष्ट. तुमच्या प्रतिभेला सलाम...!! अजुन येउद्या. नाडीकथा प्रेमी, नंदू When rape is inevitable, enjoy it.
  • Log in or register to post comments

करड्या अक्षरातल्या साहेबांनी

शशिकांत ओक
Sat, 03/27/2010 - 19:10 नवीन
--- सनल एडामारुकु यांचा एका टीव्ही चॅनेलवर ज्योतिषांची परीक्षा घेण्याचा कार्यक्रम झाला होता. त्यावर अन्य ठिकाणी उत्पन्न धाग्या वर काही प्रतिक्रिया आल्या. पैकी एक होती...
तिकडे करड्या अक्षरातल्या साहेबांची यथेच्छ थट्टा चालू आहे. (मालक त्यांना चावी मारतात). पण त्यांचे दळण चालू असते. नवीन नवीन सुरस आणि चमत्कारिक गोष्टींचे.
.... प्रियालींनी तेथे आपले मत प्रदर्शित केले की .... केवळ हिप्नोटिझममुळे (जसा) हा पुनर्जन्म आहे असे सिद्ध होत नाही असे वाटते. त्यासाठी केस बाय केस अधिक संशोधन करावे लागेल. ही केस पर्सनॅलिटी डिसऑर्डरची आहे का हे तपासणेही योग्य ठरेल. मुख्य म्हणजे केवळ एका तज्ज्ञाच्या तपासणीवरून निष्कर्ष काढणे घाईचे वाटते आणि तसेही, असे प्रयोग सिद्धतेची पातळी कधीच गाठत नाहीत कारण मग हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न बनतो. विश्वास ठेवणारे लहानशा प्रयोगावरून ठेवतील आणि न ठेवणारे अनेक प्रयोगांनंतरही ठेवणार नाहीत. अशा प्रयोगांत खुसपटे काढून दोन्ही बाजू आपापले मुद्दे रेटत राहतात. तेव्हा, आपल्याला पटत असल्यास विश्वास ठेवावा हेच खरे. त्या पुढे लिहितात... अशाच प्रकारचा (पुनर्जन्माचा - कंस माझे) किस्सा उत्तरा हुद्दार यांचा होता. पक्ष आणि प्रतिपक्ष यांनी इतके ढोबळ मुद्दे मांडले की मूळ व्यक्तिची त्यात उगीच होरपळ झाली असावी असे वाटते. या केसमध्येही मुद्दे खोडून काढणारे स्वतः उठून काहीच संशोधन करत नव्हते परंतु आपली श्रद्धा अबाधित राखण्यासाठी "छट! असे काही घडतच नाही." असे म्हटले की झाले. प्रियालींचे त्या धाग्याच्या बाबतचे मत नाडी ग्रंथांना ही तितकेच चपखलपणे फिट होते. म्हणून ते ओढून इथे डकवले आहे. जसे प्रा. उत्तरा हुद्दारांच्या क्लासिक पुनर्जन्माच्या केसमधे मुद्दे खोडून काढणारे (बुद्धिवादी) स्वतः उठून काहीच संशोधन करत नव्हते मात्र (आपली नाडी ग्रंथांवरील)श्रद्धा अबाधित राखण्यासाठी "छट! असे काही घडतच नाही." असे म्हटले की झाले. असे मत झाडून मोकळे होतात.
करड्या अक्षरातल्या (विंग कमांडर)साहेबांनी कोणत्याही संस्थेचे / व्यक्तीचे आव्हान घेतल्याचे माझ्या ऐकण्यात अगर वाचनात नाहि (खर्रेखुर्रे बरं का त्यांच्याच गोष्टीतले नव्हे ;) ) असल्यास निकाल जाणण्यास उत्सुक आहे
साहेबांनी अंनिसला आव्हान देण्याचा वा घेण्याचा प्रश्न पुर्वी नव्हता व आज ही नाही. नाडी ग्रंथ थोतांड आहेत असे म्हणणाऱ्यांनी ते कसे थोतांड आहेत हे सिद्ध करायचे आहे. त्यांनी आधी जे पुरावे सादर केले होते त्यांना समर्पक उत्तरे देऊन ते सर्व आक्षेप खोटे व बिनबुडाचे असल्याने तो निकाल नाडी ग्रंथांच्या बाजूने आधीच लागला आहे. आता त्याला संबंधित लोक दुर्लक्षुन टाळतात "छट! असे काही घडतच नाही." असे मत झाडून मोकळे होतात वा तेच तेच जुने आक्षेप उगाळत बसतात इतकेच. संदर्भासाठी वाचा - नाडीग्रंथ भविष्याने केला अंनिसचा पराभव - उर्फ बोध अंध श्रद्धेचा हा ग्रंथ. प्रियालींचा हा प्रतिसाद नाडीला उद्देशून नसला तरी तो नाडीग्रंथांना ही तितकाच लागू ठरतो म्हणून वापरला. मिपा मालकांचा उल्लेख आला म्हणून इथे डकवला इतकेच. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
  • Log in or register to post comments

करड्या अक्षरातले

नितिन थत्ते
Sun, 03/28/2010 - 10:11 नवीन
लोकांना करड्या अक्षरातील साहेब म्हणजे काहीच कळणार नाही म्हणून हा संदर्भ. नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

माननीय

संजा
Sat, 03/27/2010 - 20:07 नवीन
माननीय शशीकांत ओक साहेब, आपला लेख वाचला आणि खरच भारावुन गेलो. आपणास प्रार्थना आहे की कोणत्याही टीके कडे दुर्लक्श करून लीहीत रहा त्यामूळे आम्हासारख्याच्या ज्ञानात खुप चांगली भर पडेल. पूढील लेखासाठी शुभेच्छा. संजा
  • Log in or register to post comments

येऊ द्या ओकसाहेब.

प्रमोद देव
Sat, 03/27/2010 - 20:56 नवीन
मस्त वाटतंय वाचतांना...विश्वास असो अथवा नसो....कथा मात्र खूप रंजक आहेत.
  • Log in or register to post comments

ओक साहेब

विसोबा खेचर
Sun, 03/28/2010 - 09:34 नवीन
ओक साहेब जिंदाबाद.. ओकसाहेब, तुम्ही तुमच्या नाड्यांनी सार्‍या विरोधकांचे गळे साफ आवळलेत! :) तात्या.
  • Log in or register to post comments

नाडी

तिमा
Sun, 03/28/2010 - 16:54 नवीन
नाडीच काय, अशा अनेक पंथाचे लोक आपल्या प्रसिध्दीसाठी अशा कथा प्रसूत करतच असतात. त्यावर विश्वास ठेवायचा का नाही हा तुमच्या स्वतःच्या बुध्दीवर तुमचा विश्वास आहे की नाही यावर अवलंबून आहे. तोपर्यंत नाडी, धागे, कफन्या यांनी तुमचे गळे आवळून घ्यावे! आ बैल मुझे मार! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अनेक

संजा
Mon, 03/29/2010 - 14:53 नवीन
अनेक पंथाचे लोक आपल्या प्रसिध्दीसाठी अशा कथा प्रसूत करतच असतात अपप्रचारी व अविवेकी विधान. ज्यांना विश्वास ठेवायचा आहे ते ठेवतीलच यात शंका नाही. इतरांच्या योग्यते बाबत आपण शंका न घेणे ऊचित ठरेल. संजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

मिसळपावचा दुरूपयोग

ऋषिकेश
Sun, 03/28/2010 - 11:20 नवीन
वाचकांची इच्छा असेल तर थक्क करणारी आणखी कथने सादर करता येतील.
माझी अजिबात इच्छा नाहि. अश्या अफवा पसरविण्यासाठी मिसळपावचा दुरूपयोग होऊ नये असे वाटते. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

अरे त्या

विसोबा खेचर
Sun, 03/28/2010 - 11:52 नवीन
अरे त्या 'अफवा' म्हणूनच वाचायच्या! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

आता कसं वाटताय?

तिमा
Sun, 03/28/2010 - 16:59 नवीन
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा. इथे दुसर्‍यांच्या अफवांची जाहिरात करुन मिळेल. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

अफवा

तिमा
Sun, 03/28/2010 - 16:56 नवीन
तात्या, अफवा हा शब्द अफू वरुन आला आहे का ? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

नाडी विषयी माहिती

चित्रगुप्त
Sun, 03/28/2010 - 17:22 नवीन
अगदी नवीन वाचकांसाठी नाडी विषयी प्राथमिक माहिती आपल्या मायभाषेत द्यावीत, असे वाटते. उदाहरणार्थः १. नाडी म्हणजे काय? याचे किती प्रकार आहेत? २. भारतात कुठकुठे उपलब्ध आहेत? ३. प्राचीन ग्रंथ, वेद, पुराणे, महाभारत वगैरेत याबद्दल काय उल्लेख आहेत? ४. भारताबाहेरील इतर संस्कृतींमध्ये याप्रकारचे काही ग्रंथ आहेत का? कोणते? ५. जगातील प्रत्येक व्यक्तीची नाडी पट्टी असते का? नसल्यास कुणाकुणाच्या असतात? ६. कुंडली द्वारे सांगितले जाणारे भविष्य आणि नाडी द्वारे सांगितले जाणारे भविष्य, यात कोणते फरक वा साम्ये असतात?
  • Log in or register to post comments

अनुमोदन.

बहिरुपी
Wed, 06/18/2014 - 13:13 नवीन
ओकसाहेब, नाडी विषयी प्राथमिक माहिती जरुर येवु द्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

या विषयावर

शशिकांत ओक
Wed, 06/18/2014 - 20:29 नवीन
अनेक धागे उपस्थित आहेत ते धुंडाळावेत या क्लिपमधून प्राथमिक माहिती समजून घेता येईल. पुर्वाचे धागे सापडत नसतील तर नंतर देता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहिरुपी

मी वाचते आहे.

मीनल
Sun, 03/28/2010 - 18:53 नवीन
मी वाचते आहे. पण स्वतः अनुभव घेतल्यावर विश्वास ठेवयचा की नाही ती मी ठरवेन. अनुभव घ्यायला आवडेल. मजा म्हणून नाही किंवा खरे खोटे पडताळून पहाण्यासाठी ही नाही. तर गत/भविष्यजन्मा विषयी जाणून घेण्यासाठी. माग एक दोन वेळा गतजन्मा विषयी स्वप्म पडली होती. मी ती स्वप्नच मानते तरी हे ती लक्षात मात्र अचूक राहिली आहेत. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

नवा धागा

चित्रगुप्त
Tue, 06/17/2014 - 23:58 नवीन
थक्क करणारी आणखी कथने सादर करता येतील.
अलिकडील हा नवा धागा यापैकीच म्हणायचा का ?
  • Log in or register to post comments

नाही

शशिकांत ओक
Wed, 06/18/2014 - 00:35 नवीन
नातेवाईकांच्या संमतीने ते ऑपरेशन यशस्वी झाले. आता ती हळूहळू पुर्ण बरी झाली आहे. तेच सांगायला आलेय की अगत्यारांचे शब्द अगदी सत्य ठरले.' त्या गेल्या.... सर्व ऐकून दासनी जीव नाडी वाचायला सुरवात केली. त्यात मजकूर होता... ‘अरे, मी एक वेळ दुःखाच्या काळात आवेगाने कोणी कोणी मला दूषणे देतात. झटपट बरे वाटणारे काही उपाय मी सुचवले नाहीत तर रागावतात, रुसतात, अशा लोकांचे वागणे समजू शकतो. कारण त्यांच्या मनस्थितीचा तो भाग असतो.’ ‘पण मी तुला क्षमा करु शकत नाही. कारण अजूनही तुझ्या मनात मी जे म्हणतो ते कसे शक्य आहे या शंकेची पाल चुकचुकते? आज इतक्या काळानंतर तू असे कसे समजतोस? मी तर तुला माझा पुत्र मानतो आणि तू माझ्यावर अविश्वास दाखवतोस?.... लक्षात ठेव आज पासून २७ दिवस हे वाचन बंद राहील. ताडपट्टीतील मजकूर तुझ्यापासून अदृष्य राहील. ... जर कार्तिकेयाच्या सहा मंदिरांतील (अरिपाडई वीडू - मुरुगेशाची सहा घरे) ज्या माझ्या मूर्ती स्थापित आहेत त्या प्रत्येकांना १०८ वेळा साष्टांग नमस्कार घालून आला नाहीस तर मी तुला पुन्हा भेटणार नाही. मी या ताडपट्ट्यातून कायमचा अदृष्य झालेला असेन…’ या शब्दात दासनना अगत्यारांनी शिक्षा सुनावली. मात्र त्यामुळे हनुमान दासनांचा श्रद्धाभाव व्दिगुणित झाला. सांगितलेल्या मंदिरात त्यांनी १०८ साष्टांग नमस्कार घालून कान पकडून क्षमायाचना केली. पुढे २७ दिवसांनी ताडपत्रातील मजकूर पुन्हा दृष्टीला पडू लागला. तो आज तागायत चालू आहे....
कथन थक्क करणारे असेले तरी सा. तांदळेची केस वरील धाग्याच्या बाबतीतील नाडी ग्रंथावर आधारित नाही.( सा तादळे च्या भेटीच्या अनेक महिन्यांच्या अंतरालाने माझी नाडी ग्रंथांची ओळख झाली)हनुमत दासन जींना त्या कथनात महर्षींचा रोष ओढवून घ्यावा लागला होता. शिवाय किडनीचे ऑपरेशन करून पेशंट बरा झाला दैवी उपायांनी नाही...
  • Log in or register to post comments

गरजू मिपाकरांसाठी आधीच्या भागांची लिंक...

मुक्त विहारि
Wed, 06/18/2014 - 23:45 नवीन
भाग १ http://www.misalpav.com/node/11167 भाग २ http://www.misalpav.com/node/11173 भाग ३ http://misalpav.com/node/11346 भाग ४ http://misalpav.com/node/11357 भाग ५ http://misalpav.com/node/11606
  • Log in or register to post comments

धन्यवाद

शशिकांत ओक
गुरुवार, 06/19/2014 - 01:46 नवीन
मुक्त विहारिजी आपले...
  • Log in or register to post comments

दादा..

मुक्त विहारि
गुरुवार, 06/19/2014 - 09:20 नवीन
पुढचे भाग कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

कोणी काही म्हणोत मला तर आवडले

खटपट्या
गुरुवार, 06/19/2014 - 05:02 नवीन
कोणी काही म्हणोत मला तर आवडले सर्व लेख.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा