अगत्यार जीव नाडी कथा भाग ६वा
जीव नाडी वाचक हनुमत दासन यांची परीक्षा
मी तर तुला माझा पुत्र मानतो आणि तू माझ्यावर अविश्वास दाखवतोस?.एकदा एक बाई आपल्या बहिणीला बरोबर घेऊन आली. तिला मूत्रपिंडाचा त्रास होता. दोन्ही किडन्या बाद झाल्या होत्या. २६ वर्षांची ती बारीक वाळूनकोळ १२ वर्षांची वाटत होती. म्हणाली, 'सर्व उपाय झाले. आता माझी बहीण वाचेल का हे विचारायला आलो आहोत'. हनुमत दासननी विचारले, 'किती वर्षे झाली त्रास व्हायला लागून? ती म्हणाली, 'दीड वर्ष. ती विवाहित आहे. हा आजार झाल्यापासून नवऱ्याने सोडून दिले आमच्या घरी, माहेरी ती राहाते. तो एकदाही घरी भेटायला आला नाही. ती कॉलेजात होती तेंव्हापासून प्रेम झाले. आम्ही विवाह करून दिला. आता मात्र त्याने तोंड फिरवले. अगदी मंगळसूत्रासकट सर्व विकून तिची सेवा चालू आहे. आम्ही तरी किती सहन करणार? आमचे संसार आहेत. काही उपाय आहे का?' दासननी जीव नाडी वाचून सांगितले, ‘तिला एका अनोळखी व्यक्तीची किडनी मिळून ती बरी होईल. काळजी नको. ती जीवंत राहील.’ जीव नाडीतील उल्लेख त्रोटक होता. म्हणून त्यांनी तो तीन-तीनदा वाचून पाहिला. त्यांनाही बुचकळ्यात पडायला झाले की त्या बाईची परिस्थिती इतकी वाईट होती की आता दगते की मरता असे वाटत होते. तिला सांगावे तरी कसे कि ती वाचेल म्हणून. कारण अगत्यार फक्त म्हणतात की ती वाचेल पण तिला कोणाची किडनी मिळेल हे ते सांगत नाहीत. त्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतील की ती कोण दान करेल याबद्दल बोलत नाहीत. हे सर्व मनात चालले असताना ते त्या बायकांना वरवर बोलायचे म्हणून म्हणाले, 'काळजी नको. किडनी ट्रान्सप्लांटेशनसाठी मिळेल.' त्या बायकांना ही यामुळे दिलासा मिळाला व त्या अगत्यारांचे आभार मानून निघून गेल्या. चार महिन्यांनी.... त्या दिवशी हनुमत दासनना काही विचित्र वाटत होते. कारण त्या दिवशी जी वाचने झाली त्यातून त्यांचे समाधान होत नव्हते. असेच वाचन चालू करणार अशा वेळी पुर्वीच्या त्या दोघी बहिणीपैकी एकीचे आगमन झाले. त्यांची विचारपूस करताना कळले की दोन महिन्यापूर्वी तिचे किडनीचे ऑपरेशन झाले. ते सांगायला त्या आली होती. म्हणाली, 'तिच्यासाठी किडनी मिळावी म्हणून आम्ही वर्तमानपत्रात जाहिरात द्यायला जात असताना तिच्या पतीची बहीण गाठ पडली. तिला सर्व सांगितले. तिने गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधे नेले. तेथील डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन लवकरच करू, मात्र जुळणाऱ्या किडनी साठी थांबावे लागेल म्हणून सांगितले. दिवस पुढे सरकत होते. आम्ही अगस्त्य महर्षींची प्रार्थना करता होतो. आमची खात्री होती की महर्षींचा शब्द चुकणार नाही. सहाव्यादिवशी एका अपघाती मृत्यूच्या पेशंटला आणले गेले. त्याची किडनी बरोबर जुळणारी होती. त्याच्या नातेवाईकांच्या संमतीने ते ऑपरेशन यशस्वी झाले. आता ती हळूहळू पुर्ण बरी झाली आहे. तेच सांगायला आलेय की अगत्यारांचे शब्द अगदी सत्य ठरले.' त्या गेल्या.... सर्व ऐकून दासनी जीव नाडी वाचायला सुरवात केली. त्यात मजकूर होता... ‘अरे, मी एक वेळ दुःखाच्या काळात आवेगाने कोणी कोणी मला दूषणे देतात. झटपट बरे वाटणारे काही उपाय मी सुचवले नाहीत तर रागावतात, रुसतात, अशा लोकांचे वागणे समजू शकतो. कारण त्यांच्या मनस्थितीचा तो भाग असतो.’ ‘पण मी तुला क्षमा करु शकत नाही. कारण अजूनही तुझ्या मनात मी जे म्हणतो ते कसे शक्य आहे या शंकेची पाल चुकचुकते? आज इतक्या काळानंतर तू असे कसे समजतोस? मी तर तुला माझा पुत्र मानतो आणि तू माझ्यावर अविश्वास दाखवतोस?.... लक्षात ठेव आज पासून २७ दिवस हे वाचन बंद राहील. ताडपट्टीतील मजकूर तुझ्यापासून अदृष्य राहील. ... जर कार्तिकेयाच्या सहा मंदिरांतील (अरिपाडई वीडू - मुरुगेशाची सहा घरे) ज्या माझ्या मूर्ती स्थापित आहेत त्या प्रत्येकांना १०८ वेळा साष्टांग नमस्कार घालून आला नाहीस तर मी तुला पुन्हा भेटणार नाही. मी या ताडपट्ट्यातून कायमचा अदृष्य झालेला असेन…’ या शब्दात दासनना अगत्यारांनी शिक्षा सुनावली. मात्र त्यामुळे हनुमान दासनांचा श्रद्धाभाव व्दिगुणित झाला. सांगितलेल्या मंदिरात त्यांनी १०८ साष्टांग नमस्कार घालून कान पकडून क्षमायाचना केली. पुढे २७ दिवसांनी ताडपत्रातील मजकूर पुन्हा दृष्टीला पडू लागला. तो आज तागायत चालू आहे.... वाचकांची इच्छा असेल तर थक्क करणारी आणखी कथने सादर करता येतील. (क्रमशः) -----------------
वाचने
9105
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
झालो बुवा थक्क...
"दिनतंती" नावाच्या तमिळ साप्ताहिकातून
In reply to झालो बुवा थक्क... by चित्रगुप्त
>>वाचकांची
लई ब्येष्ट
करड्या अक्षरातल्या साहेबांनी
करड्या अक्षरातले
In reply to करड्या अक्षरातल्या साहेबांनी by शशिकांत ओक
माननीय
येऊ द्या ओकसाहेब.
ओक साहेब
नाडी
In reply to ओक साहेब by विसोबा खेचर
अनेक
In reply to नाडी by तिमा
मिसळपावचा दुरूपयोग
अरे त्या
In reply to मिसळपावचा दुरूपयोग by ऋषिकेश
आता कसं वाटताय?
In reply to मिसळपावचा दुरूपयोग by ऋषिकेश
अफवा
नाडी विषयी माहिती
अनुमोदन.
In reply to नाडी विषयी माहिती by चित्रगुप्त
या विषयावर
In reply to अनुमोदन. by बहिरुपी
मी वाचते आहे.
नवा धागा
नाही
गरजू मिपाकरांसाठी आधीच्या भागांची लिंक...
धन्यवाद
दादा..
In reply to धन्यवाद by शशिकांत ओक
कोणी काही म्हणोत मला तर आवडले