Skip to main content

रातराणी

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 08/03/2010 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
रातराणी सूर्य अस्ताला गेल्यावर, अंधाराच्या साम्राज्यात, प्राणिमात्र विसावतात आपापल्या खुराड्यात ! राऊळे होतात रीती, अस्तित्व नाकारुन परमेशाचे. तुझ्या लालदिव्याच्या माडीचा आसमंत मात्र उजळतो लख्ख, अन रस्ते ओसंडून वाहू लागतात अंधाराचे साम्राज्य नाकारुन ! रात्र मंदावतांना, अंधाराच्या साम्राज्यात, तू घेतला असतो वसा. अखंड सौभाग्यवतिचा, रातराणीचा , अनुभवण्या बलात्कार हक्कांचे, टिचभर पोटाच्या खळग्यासाठी ! असहाय्य वृद्ध मायबाप, अन तान्हुल्याचा आक्रोश, आदळत असतो कानावर, करकरत्या खाटेवरच्या कोंदट सम्भोगात ! ! ! निरंजन वहालेकर अलीबाग
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2021
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

तू घेतला असतो वसा. अखंड सौभाग्यवतिचा, रातराणीचा , अनुभवन्या बलात्कार हक्कांचे, टिचभर पोटाच्या खलग्यासाठी !
रौशनीची चाळ आठवली..!
आसहाय वृध्ह मायबाप, अन तान्हुल्याचा आक्रोश, आदलत असतो कानावर, करकरत्या खाटेवरच्या कोंदट सम्भोगात ! ! !
जबरा कविता..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पहिलाच प्रयत्न होता मिपा वर लिहिण्याचा. पण तात्या तुम्ही जी दाद दिली त्यात सर्व काही अभिप्रेत आहे. धन्यवाद् तात्या . जबरा ! ! !. फ़क्त तीनच शब्द.पण पानभर अभिप्राय वाचून जे मिळाले नसते त्यापेक्षा जास्त आनंद व समाधान ह्या तीनच अर्थांनी ओतप्रोत भरलेल्या शब्दानी मिळाले. जबरा धन्यवाद् तात्या ! ! ह्या शब्दांची उचलेगिरी करून चारोल्यांचे संपादन करण्याची सम्मति असावी पुन्हा एकदा आभार. निरन्जन .

जबरदस्त!! -- मेघवेडा भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! मेघवेड्याचे वेडे विचार!!

राउले होतात रीती, अस्तित्व नाकारुन परमेशाचे.
तू घेतला असतो वसा. अखंड सौभाग्यवतिचा,
करकरत्या खाटेवरच्या
यातलं परमेश नाकारणं, वसा (स्वीकारणं), आणि करकरत्या खाटेवर (अंधार नाकारणाऱ्याकडून) सहन करणं....सगळे नाकारणारे व हीच सनातन स्वीकारणारी... प्रभावी आहे. रातराणीचं रूपक अजून खुलवता आलं असतं असं वाटलं. रोज रात्री फुलणाऱ्या नववधूच्या बेगडी शृंगाराचा सुगंध वगैरे... राजेश