खरंतरं आपण केवळ कुलदेवतेचाच ऊल्लेख करुन वस्तुस्थीतिची एकच बाजु समोर ठेवतोय असे नाही का वाटत? काही भिन्नलींगि पुजारी कुलदैवताचीही तसेच वागतात जसे आपण कुलदेवतेशी वागतो. किंबहुना ग्रामदेवतांपेक्षा ग्रामदेवांची संख्या फार जास्त आहे. तसेच हे ग्रामदेव स्वःताच आशिर्वाद देण्यास तत्पर असल्याने त्यांच्या पुजार्यांस विनासायास पुण्य प्राप्त होते.
या पूजापथ्यांबद्दल प्रा.गळतग्यांचे मत न सांगितल्याबद्दल श्री. घासकडवी यांना संमंतर्फे समज दिली जावी.
तदुपरि वरती पोर्नोग्राफी या शब्दाच्या मराठी प्रतिशब्दाबद्दल खल पाहिला आणि मिपाकरांच्या अज्ञानाने अं.ह. झालो. अहो, तो शब्दच मुळात आपल्याकडून (सर्व भाषांची जननी संस्कृतकडून) घेतलेला आहे.
झाडांआड, पानांआड जे केले जायचे ते पर्णग्रासी. पुढे पानांच्या सळसळीआड फकारी शब्द ऐकू आल्याने त्याचे पर्णग्राफी झाले. हा शब्द बंगाली अॅक्सेंटमध्ये उचारल्यावर त्याचे "पोर्णोग्राफी" झाले आणि ब्रिटिशांचे राज्य पहिल्यांदा बंगालवर झाल्याने त्याचे पुढे "पोर्नोग्राफी" झाले.
दुसरी व्युत्पत्तीही सांगितली जाते त्यातही भारताचाच मुख्य वाटा आहे.. ज्या प्रकारची चित्रे आपल्या पुण्यभू भारतातील पोरे काढीत नसत त्याला म्हणत पोर-न-ग्राफी, त्यावरून शब्द रूढ झाला.
पूजेसारख्या पवित्र विषयावर पॉर्नोग्राफीसारख्या विषयावर चर्चा व्हावी हे काही आवडलं नाही. मात्र चर्चा शब्दाच्या व्युत्पत्तीबाबतच असल्यामुळे बॅटमॅन यांचा केवळ निषेध करून थांबतो.
अवांतरच करायचं तर, पर्ण या शब्दाचा पॉर्न शी लावलेला संबंध फारच गहन सत्य सांगून जातो. मात्र त्याची व्युत्पत्ती कदाचित पाश्चात्त्य इतिहासातच सापडू शकेल. अनेक चित्रांमध्ये चित्र काढतानाच अंजीराचं पान गळून नेमकं काही विशिष्ट गोष्टी झाकण्याचं काम करतं. त्यामुळे पान किंवा पर्ण हे महत्त्वाचं ठरलं असावं. बाकी संस्कृतातूनच सगळ्या भाषा निर्माण झाल्या असल्यामुळे तो शब्द पर्णवरूनच आला असावा याबाबत शंका नाही.
तुम्ही हा एक नवीनच मुद्दा उपस्थित केला आहे. 'यतो धूम्रस्ततो वन्हि' अशी म्हणच आहे. पण हा नियम सरसकट लावण्याबद्दल किंचित काळजीपूर्वक असण्याची गरज आहे. 'वन्ही तो चेतवावा रे' असं म्हणत सतत वन्हीचेतन करत राहिलं तर सरपण लवकर संपून जाण्याचा धोका असतो. लाकडं जळून राख होऊन ती मऊ पडतात असंही ऐकिवात आहे.
तसंच आपल्या पूज्य संस्कृतीत धूम्राचे व धू्म्रपानाचे विविध प्रकार सांगितले आहेत. काही विशिष्ट वल्लींच्या धूम्राचं सेवन केल्यास ब्रह्मानंदाची प्राप्ती होते, आणि त्या धूपदीपनातून पूजाविधीचं पुण्य शतगुणित होतं असं काही साधकांचं म्हणणं आहे. मात्र हा मार्ग नवख्यांसाठी नव्हे, इतकीच सूचना देऊन तुमच्या पूजासिद्धीला सुयश चिंतितो.
पूजेच्या वातावरणनिर्मितीसाठी पवित्र धूम्राच्या उदबत्त्या कामी येतात. मात्र त्या बाजारात जशाच्या तशा मिळत नाहीत. अशा मंगल धुरकामाविषयी बरंच लिहिता येईल पण ते या धाग्यावर प्रस्तुत ठरणार नाही.
धागा ज्या सेन्सॉर नियमांच्या चौकटीच्या कक्षेत खेळवलेला आहे ते ग्रेटच
एक किस्सा आठवला एक नाटक तेंडुलकरांच गिधाडे बहुधा ( चुकभुल देणे घेणे ) त्यात एक सीन होता त्यात रक्ताचा डाग दिसत असे त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर यांनी अशी शक्कल लढवली होती. लाल डागा ऐवजी निळा रंग डागाचा कपड्यावर द्यायचा आणि एक घोषणा नाटकापुर्वी करायची. की तो रंग लाल आहे असे प्रेक्षकांनी समजुन पाहावे.
व्हायच अस की मुळ रंगापेक्षाही अधिक तीव्रतेने प्रेक्षकांच लक्ष त्या प्रसंगाकडे त्या बाबी कडे वेधल जायच आणि तेही नियमांच्या चौकटीतच.
ही पण एक मजा आहे एक केशव पंडित नावाच कॅरेक्टर इंटरेस्टींग पात्र वेद प्रकाश शर्मा च्या हिन्दी उपन्यास मध्ये एकेकाळी गाजवल होत जो केवळ कायद्याचा आधार घेऊन कुठलीही हिंसा न करता अस काहीस मोठ मोठी कामगिरी पार पाडत असतो त्यावर एक चित्रपटही बनला होता बहुधा. आठवत नाही नीट पण वेद प्रकाश शर्मा म्हणजे त्या ए एक व्हीलर च्या हिंदी क्राइम मेरठ मेड उपन्यासांमधल एक त्यातल्या त्यात दर्जेदार नाव होत त्यांची एक गाजलेली म्हणजे
वर्दी वाला गुंडा
मिपाकर एवढे देवभोळे असतील असे वाटले नव्हते.
नुसते वर्णन वाचून त्या प्रकारे आसन घालुन पूजा करणार्या साधकांच्या कधीकधी ते आसन अंगलट येऊ शकते. अर्धवट माहितीच्या आधारे अंदाजपंचे आसने करुन केलेल्या पूजाविधी मुळे क्वचित प्रसंगी देवता प्रसन्न होण्या ऐवजी तिचा कोपही होऊ शकतो. या कारणास्तव नुसती वर्णने करण्या पेक्षा पूजेच्या वेळी करायच्या आसनांचे जर काही फोटो दिले असते तर नवोदित साधकांची चांगली सोय झाली असती.
या शिवाय मुख्य पूजा सुरु करण्याआधी स्थल देवता, ग्राम देवता, कुलदेवता, नवग्रह इत्यादिंना आवाहान केले जाते त्या वेळी कोणती पथ्ये पाळावी, कोणत्या देवतेला काय अर्पण केले की ती लवकर प्रसन्न होते, या विषयी सुध्दा मिपा महर्षी मार्गदर्शन करतील का?
गुरु वीण नाही दूजा आधार
पैजारबुवा,
हे पाहा पैजारबुवा, मिपाकरांच्या धार्मिकतेबद्दल आणि पूजाप्रेमाबद्दल असे वावगे बोल काढण्याची गरज नाही. असे प्रश्न विचारण्याबद्दल मी तुम्हाला या संदर्भात उलट प्रश्न विचारू इच्छितो 'तुम्ही नास्तिक तर नाही ना?' किंवा 'हाय कंबख्त, तूने पूजा कीही नही' असं म्हणावं का?
अर्धवट माहितीच्या आधारे अंदाजपंचे आसने करुन केलेल्या पूजाविधी मुळे क्वचित प्रसंगी देवता प्रसन्न होण्या ऐवजी तिचा कोपही होऊ शकतो.
हे आपण अगदी खरे बोललात. आसने ही तपस्येनेच साध्य होतात. त्यासाठी सुरूवात सोप्या आसनांनी करून मगच पुढची कठीण आसने करावीत एवढेच आम्ही म्हणू शकतो.
या कारणास्तव नुसती वर्णने करण्या पेक्षा पूजेच्या वेळी करायच्या आसनांचे जर काही फोटो दिले असते तर नवोदित साधकांची चांगली सोय झाली असती.
आधुनिक पिढी ही चित्रांवर फार अवलंबून राहायला लागली आहे हे आमचे स्पष्ट मत आहे. मनश्चक्षुंसमोर प्रतिमा उभी करता यायची पूर्वीच्या जमान्यातल्या लोकांना. आता काय, आधी प्रतिमा असल्याशिवाय प्रत्यक्ष काही उभंच राहात नाही...
गुर्जी अबोध बालकाचा एखादा शब्द चुकला तर त्याला मोठ्या मनाने माफ करा. मी माझे वाक्य सुधारतो.
इथे मिपावर, माझ्यासारखेच देवभोळे, इतके जण भेटतील असे वाटले नव्हते.
माझ्या त्या दुसर्या प्रश्नाचे उत्तर पण जमले तर द्या ना. स्थल देवता, ग्राम देवता, नवग्रह यांची पूजा न करता मुख्य पूजा केली तर तशी पूजा ही चटावरच्या श्राध्दा सारखी पटकन उरकल्यासारखी वाटते. पण इतर देवतांकडे जास्त लक्ष पुरवले तरी मुख्य देवता नाराज व्हायची शक्यता असते. या सर्व पूजांमधे समन्वय कसा साधावा?
पैजारबुवा
तुम्ही चांगला मुद्दा मांडला आहे. पूजा हे आयुष्यभर चालणाऱ्या तपस्येचे एक अंग आहे. या तपस्येसाठी सर्वच देव-देवतांचे पूजन करण्याचा योग येऊ शकतो. मात्र इतरांनाही पूजल्यास एका देवीचा - विशेषतः कुलदैवताचा कोप होऊ शकतो. त्यामुळे तपस्या परिपूर्ण करण्यात अडचणी येतात. 'माझी भक्ती फक्त तुझ्याठायी आहे' असं प्रत्येक दैवताला समजावून देता आलं तर तुम्हाला पुण्य महत्कृत म्हणजे आधुनिक मराठीत ज्याला मॅक्सिमाइझ असे म्हणतात, तसे करता येईल. यासाठी देवळं लांबच असलेली बरी.
फोटो सुद्धा चालू शकेल, किंवा पूजेची यथासाग माहीती सांगणारी चलचित्रे हल्ली ऑनलाईन उपलब्ध असतात. त्याआधारे पूजा उरकता येऊ शकते. मूर्तीपूजेचा घाट घालायचा की नाही हा व्यक्तिगत प्रश्न आहे.
अंनिस म्हणते पूजेत समर्पणभाव हा केवळ पूजकाकडून असून चालत नाही तर देवतेकडूनही हवा, अन्यथा पूजा फलदायी होउ शकेल पण आनंददायी होउ शकणार नाही..
म्हणजे पूजा करून देवतेला प्रसन्न करणे हे अर्ध सत्य आहे. देवता प्रसन्न असेल तरच पूजेला पाचारण करता येइल व पूजा आनंददायी होइल..
बाळ सप्रे,
या विधानाशी लाखवेळा सहमत. ही अक्कल जर धागालेखकाला असती तर हा धागा काढायची वेळच आली नसती. साधनांमध्ये गुंतून पडल्याने ध्येयाचा विसर पडला आहे.
आ.न.,
-गा.पै.
पूजेचा विषय असल्यामुळे का काय, हा धागा सतत तुकोबाच्या गाथेसारखा वर येतो. वर येण्याच्या तुलनेसाठी इतरही काही कल्पनाचित्रं सुचली होती, पण पूजेची वेळ झाल्यामुळे आवरतं घेते.
आमचेकडे पुजाविधीची सर्व साधने व पोथ्या (सप्तरंगीत चित्रांकीत) मिळतील. आसनांना लागणारे फर्निचर, कपडे आदीदेखील पुरवितो.
वाजवी दर, योग्य व आनंदी सेवा ही आमची वैशिष्ठ्ये. परदेशातही सेवा देतो. (जास्त साधने घेतल्यास टपालखर्च माफ.) घरी येवून पुजाविधीसाठी भटजी उपलब्ध. सर्व कामे मालकच करतात. (आधीच अपॉइंटमेंट घेणे)
(कृपया ओळख दाखवून कमी पैसे देवू नयेत. कोणतीही कुपने चालत नाहीत. सर्व प्रकारची क्रेडीट कार्डांची सोय. आमची दुसरी कोठेही शाखा नाही.
- (जाहिरात)
प्रतिक्रिया
खरंतरं आपण
१००
हॅहॅहॅ
हे साले जुणेजाणते मिपाकर
वा मस्त पुजा !!
असलाच, स्वयंपाकाच्या पथ्यांचा
:)
या पूजापथ्यांबद्दल प्रा
अवांतर
.
धूम्रपानामुळे धार्मिक भावना
तुम्ही हा एक नवीनच मुद्दा
विशिष्ट वल्लींच्या धूम्राचं
पूजेच्या वातावरणनिर्मितीसाठी
रतिचित्रण
कोणाकडे पूजेची चीत्रफीत
अहो कित्ती तरी लिंका मिळतील
बबौ!
लोक्स उदया पासुन पुढिल काहि दिवस मिपा वर येणे बहुधा
आहाहा काय ते दिवस होते.. पूजा
धागा ब्रिलीयंट खेळ नियमांच्या काटेकोर चौकटीत खेळण्याच कसब ग्रेट
अगदी सहमत...
अरे काय भयाण धागा आणि कहर
साधू साधू.....
मिपाकर एवढे देवभोळे असतील असे
असे क्रोधीत होऊ नका...
तुम्ही चांगला मुद्दा मांडला
पूजा फक्त देवळातच करावी असे
आता काय, आधी प्रतिमा
_()_ मूकं करोति
पूजे साठी मूर्ती योग्य का
इतके रामायण होउन रामाची सीता
फोटो सुद्धा चालू शकेल, किंवा
अरे पूजेची पथ्ये सूक्ष्म च
हो हो
ही टनाटनी पुजेची पथ्य वाटतायत
अंनिस म्हणते पूजेत समर्पणभाव
सहमत आहे.
पूजा, गाथा, आणखी काही
बेटा, तुझसे ना हो पायेगा!
आमचेकडे पुजाविधीची सर्व साधने
पूजा
ह ह पु वा!
(No subject)
पुनःप्रत्ययाचा आनंद
हो खरंच...
होय