मानस पूजेबद्धल कोणाला माहिती आहे का ? या पूजेला बहुधा कोणतीच पथ्ये लागत नसावीत...
मदनबाण.....
जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
एका शाहीराने (बहुदा एका फटक्यात )पूजेच्या संदर्भात म्हण्टलेले आहे :
"दंड" "कमंडलु" बंड माजवुनि मुंड मुंडिशी वृथा तथापि न होय हरिची कृपा !
तस्मात, पूजेच्या पथ्यावर एकंदर श्रेयाचे (ज्याला आउट-कम असे म्हणतात) प्रमाण ठरत नाही असे म्हणावेसे वाटते.
विचार करण्यासारखा मुद्दा अन त्याच अनुशंगाने काही प्रश्न. पुजेच्या सफलतेत इतर काही बाबींचाही हात असावा असे वाटते. जसें, तुम्ही आराधना करीत असलेल्या देव-देवतेला कुणी दुसराच पसन्न करण्याच्या प्रक्रियेत असेल तर ती (देवता) तुमच्या पुजेत अडथळा होतो का? यावर उपाय काय?
पथ्यं फार उपयोगी असतात महाराज...
दंड कमंडलु द्वंद्व माजता आवर्तन चुकता आचमन जाई स्खलुनि व्यथा
रस्ता हेच ध्येय आहे. रस्ता चुकला की संपलं. तो दाखवण्यासाठी सत्गुरूच पाहिजे.
राजेश
जयपालजी पुत्रकामेष्टी यज्ञ कोणी केला होता बरं ? ;)
मदनबाण.....
जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
हो,अजुन बर्याच राजांनी या देशात अशा प्रकारचे यज्ञ केल्याचे दाखले उपलब्ध आहेत...
उदा:--- http://bit.ly/9J2j06
मदनबाण.....
जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
पण दषरथाने १ नाही , २ नाही ३-३ बायका केल्या पण मुल नाही. दोष कुणाचा?
कुठलासा यज्ञ केला आणि कुठलीशी खीर दिली. लगेच सगळ्या राण्या गरभार रहील्या की?
हे यज्ञ,खीर लपवा-लपवी कशाला? महाभारताप्रमाणे सगळ सरळ कबुल करावं. पंडु राजा संतती निर्माण करु शकत नव्ह्ता म्हणुन राज्याला वारस लाभावा हेतुने कोणत्या क्रुशींना बोलावल माहीत आहे ना?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
या पैकी कोणाचेही दोष काढण्याची माझी पात्रता नाही... मी फक्त संदर्भ दिला.
मदनबाण.....
जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
तो काथ्याकूट चर्चा पुरेशी न भरकटल्याबद्दल होता.
मात्र या चर्चेविषयी ती मुद्याला धरून राहिली तर आमची काही ना नाही. उलट पूजेसारखे काही फार थोडे मुद्दे असे असतात जिथे चित्त एकाग्र असणंच चांगलं असतं.
राजेश
संतती होण्यासाठी पूजा करायची असेल तर
-बहुतेक पूजा विधीपूर्वक व योग्य क्रमाने कराव्यात
- पूजा ठरवताना पैशाच्या गणितात कोतेपणा असू नये
- पूजेत गडबडगुंडा करून काम आटपू नये
- पूजेत स्वच्छता पाळावी
त्यावरून साग्रसंगीत पूजेचे माहात्म्य पटले. एरवी आम्ही आम्हाला जमेल तशी, जमेल तेव्हा पूजा करत आलेलो आहोत पण आता आम्ही खबरदारी घेऊ. अधिक विचार करता मला काही इतर पथ्ये सुचली
- पत्नी नसताना एकट्यानेच पूजा करू नये.
- पूजा करताना एकमेकांचा विचार न करता आपल्या प्रिय देवदेवता डोळ्यासमोर आणाव्यात
- पवित्र आचमनांनी पूजाविधी सुकर होतो
- पूजा करताना योग्य आसन वापरणे अनिवार्य आहे. आपल्या पूर्वजांनी अशा आसनांचे वर्णन केलेले आहे.
वरील सर्व वाक्यात पूजा ऐवजी *भोग हा शब्द चपखल बसतो
बघा विचार करून .....अर्थ फारसा बदलत नाही.
ही पवित्र पूजेची चर्चा चालू आहे आणि त्यात आपण या असल्या सूचना करत आहात? आणि ते सुद्धा एवढी चर्चा त्यावर करून झाल्यावर?
तुम्ही आधीचे प्रतिसाद जर वाचण्याचे कष्ट घेतलेत तर आम्ही नक्की कुठचा शब्द वापरतो आहोत हे स्पष्ट होईल. :-)
राजेश
चांगलीच रंगात आलीये चर्चा... चालू दे.... चालू दे. आज पूजा होऊंनच जाऊ दे.....
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
पुजा करण्यापुर्वी पवित्रजल सिंचन हे पंचमहाभुतांना तृप्त करण्यासाठी केले पाहिजे. अन्यथा ते अतृप्त आत्मे हे पुजा विधीत काही दुरिते आणतात. कधी कधी ते आत्मे आपल्या आप्त स्वकीयांच्या शरीरात प्रवेश करतात. अशा वेळी त्यांच्या उदरात पवित्र जल जाण्यासाठी त्यांना विधिवत बोलावुन सामुहिक आचमन करणे सोयीचे ठरते असा संकेत आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
कुलदेवतेच्या पुजेस इतके सायास केल्यास पुजेची वारंवारता धोक्यात येवु शकते, विशिष्ट व दुश्प्राप्य देवतेस प्रसन्न करण्याचा हा योग्य मार्ग आहे.
कुलदेवतेच्या पुजेस शांत व घट्ट दरवाजाचे पुजाघर व मंत्रोच्चाराची संयमीत लय इतके पुरेसे आहे...
कुलदेवतेच्या पुजेस शांत व घट्ट दरवाजाचे पुजाघर व मंत्रोच्चाराची संयमीत लय इतके पुरेसे आहे...
आम्हाला एक शंका आहे.लष्करात सैनिक जेव्हा मार्च करित जातात व वाटेत जेव्हा एखादा तकलादु पुल येतो त्यावेळी कदमताल लयीमुळे निर्माण झालेला रेझोनन्स हा तो पुल कोसळवु शकतो , त्यामुळे पुलाचे वेळी ते विस्कळीत होतात व मार्गक्रमणा करतात. मंत्रोच्चाराची संयमित लय ही जर अशाच प्रकारची आपत्ती आणणार असेल तर? विशिष्ट ध्वनी उच्चार करण्यापेक्षा त्यात दडलेल्या अर्थाची कृती अधिक पुजनीय ठरणार नाही का?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
खरेतर कुलदेवतेची पुजा ही देवतेशी असलेल्या जवळीकीमुळे, तांत्रिक न होता भावीक होत असते असे अनुभवी पुजारी म्हणतात. राहीला मंत्रोच्चाराचा भाग, तर तो फक्त अत्रुप्त आत्मे आसपास असताना टाळावा अथवा संयमीत करावा. आणी घट्ट दरवाजाचे पुजाघर हा ध्वनी आतच ठेवते.
कुलदेवतेच्या पुजेस इतके सायास केल्यास पुजेची वारंवारता धोक्यात येवु शकते, विशिष्ट व दुश्प्राप्य देवतेस प्रसन्न करण्याचा हा योग्य मार्ग आहे.
कुलदेवतेच्या पुजेस शांत व घट्ट दरवाजाचे पुजाघर व मंत्रोच्चाराची संयमीत लय इतके पुरेसे आहे...
पूजेसमयी यजमान दक्षिणाभिमुखी तर इष्टदेवता उत्तराभिमुखी असल्यासच अपेक्षित फलप्राप्ती होते, असे शास्त्र सांगते.
(महामहोपाध्याय) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
दोघेही दक्षिणाभिमुखी असल्याचे चित्र डोळ्यासमोर आणा. ते अधिक कष्टप्रद असावे, असे वाटत नाही काय?
अवांतर - दक्षिण ऐवजी अधर आणि उत्तर ऐवजी उर्ध्व असा शब्दप्रयोग अधिक उचित ठरेल काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
श्री सुनील आणि श्री राजेश,
आंतरजालावर शोध केला असता तुम्ही बोलत असलेल्यापैकी काही आसनांची थोडीफार माहिती मिळाली. ज्यांना कठोर आराधना करायची आहे ते अशा प्रकारच्या आसनांचा आधार घेतात असे कळते. या अवस्थेत पुजा अवघड नाही पण आहुती देणे दुरापास्त होते असे काहींचे म्हणणे पडल्याचे वाचनात आले.
आमच्या पवित्र श्रध्दास्थानांविषयीची ही वक्तव्ये वाचवाचून एव्हाना आमच्या भावना भडकून भडकून त्यांचा अगदी अहिताग्नी झाला आहे. या धाग्यावरच्या दुष्कर्मी इसमांची एक यादी करून ती कतारच्या राणीकडे धाडत आहे.
- (भडकलेला) चिं. जंतू X(
आम्ही लहान आहोत व स्लो लर्नर आहोत. त्यामुळे तुम्हा ज्येष्ठ मंडळीची चर्चा चटकन कळली नाही. असो बेटर लेट दॅन नेव्हर. इथे अनेक अनुभवी पुजारी आहेत असं दिसतंय. तरी आमच्यासारख्या होतकरुंना मार्गदर्शन करावे. आम्ही कायमच 'आपला हात जगन्नाथ' या तत्त्वास अनुसरुन पूजापाठ केले आहेत. परंतु आता त्याचा वीट आला आहे. तरी विवाहितांनी आणि जे पूजा सांगण्यासाठी बाहेर जातात त्यांनी आमच्यासारख्या 'लिंबूटिंबूंना' मोलाचे मार्गदर्शन करावे.
आत्तापर्यंतच्या चर्चेत घंटामाहात्याबद्दल कोणीच कसे बोलले नाही?
घंटेचे माहात्य फार! प्रत्यक्ष पूजा सुरू करण्यापूर्वी घंटेला गंध-पुष्प वहावे लागते!
आत गाभार्यात पूजेत रममाण झालेल्यास, बाहेर दुसरा इच्छूक दर्शनार्थी आल्याची सुचना घंटाच देते! याउप्परही तिचे काही माहात्म्य असल्यास सांगणे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सुनीलजी,
तुम्ही आत्तापर्यंत पूजेच्या चर्चेत न आलेल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या शब्दांना, संकल्पनांना इथे स्थान दिलंत याबद्दल धन्यवाद.
आपण म्हटल्याप्रमाणे घंटेचे पूजाकर्मात दोन भिन्न उपयोग आहेत. एक गाभाऱ्यात वाजणारी घंटा व एक बाहेर ठणाणा बोंब मारणारी.
पैकी गाभाऱ्यातली ही आवर्तनांत वाजते, व मंत्रोच्चरणाचा ध्वनी व लय यांच्याशी एकरूप होते. व योग्य आचमनांनंतर थांबते.
बाहेर वाजणारी, ही प्रसंगानुरूप बदलते. सार्वजनिक प्रार्थनामंदिरात ती नव्या पूजेच्या वेळेची सूचना असू शकते. तर वैयक्तिक पूजेत ती केवळ गाभाऱ्यात प्रवेश नाही म्हणून मानसपूजेचं प्रतीक म्हणून येते.
राजेश
ही चर्चा श्री घासकडवी व अक्षय यांच्यातली "जुगलबंदी" असून बाकीचे लोक मुख्य कलाकार दमले म्हणजे मागे बसून एकादी तान मारणारे वाटताहेत. (उदा. "मधुबनमें राधिका नाचे रे" या 'कोहिनूर'मधल्या गाण्यात मुक्रीवर चित्रित करण्यात आलेल्या दोन ताना!)
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
या ठिकाणी सामुदायीक रित्या केल्या जाणार्या पुजेचा उल्लेख न आल्याने खटकले. सामुदायीक केली जाणारी पुजा ही यजमान समुहाने असतांना करायची की ईष्टदेवता सामुदायीक असतांना करायची किंवा दोन्ही समुहाने असले तर चालते हे काही मला नेहमी एकट्याने पुजाविधी करणार्याला समजले नाही.
मला वाटते आदिवासी समुहात अजुनही या प्रथेचे पालन केले जाते. टारझन हा आफ्रिकेत राहून आलेला असल्याने त्याला जे अनुभव आले, ते महत्वपुर्ण असतील. तसेच काही पुजाविधी हिरव्या देशात अगदी सर्रास चालतात हेही ऐकून आहे. हिरवट देशात हिरवा१, हिरवा२ इ. परवाना घेतलेल्या सदस्यांचा (त्या गाभार्यातील सदस्यांचा नव्हे हो येथील सदस्यांचा) काय अनुभव आहे ते देखील समजले तर अत्यंत आनंद होईल.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
सामुदायीक पुजा ही केवल आनंदासाठी केली जात असल्याने व घट कण चुकीचे आहेत असे शास्त्रात सांगितलेले असल्याने ती सर्वमान्य नाही, तसेच, सामुदायीक पुजा करताना फलप्राप्ती झाल्यास ते श्रेयस कोणाचे हे ठरवने कठीण जाते.
काही जाणकार सामुदायीक पुजेस जाताना कुलदेवतेस न नेता ग्रामदेवतेस नेतात व इतरांच्या कुलदेवतेच्या पुजनाचे लाभ घेतात.
घट कण चुकीचे असल्याने कुलदेवतेची वस्त्रे ग्रामदेवतेला घातली जातात . चंदनाची वस्त्रगाळ उटी लावताना थंडपणा महत्वाचा असतो. कुलदेवता महिषासुर मर्दिनी असल्यास पुजा बाधित होते. पुजेचे सामुदायिक महत्व लक्षात घेता ग्रामदेवतेचा तो मान आहे. त्यामुळे फलप्राप्ती ही ग्रामदेवता पुजनाचीच होती
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
धन्य आहे बुवा तुम्हा लोकांची ! मी इथे भर दुपारी हापिसात (स्वतःचंच) पोट धरून खो खो हसतोय.... गाल दुखायला लागलेत.... माझा स्पॅनिश सहकारी डॉक्टरला बोलवायच्या तयारीत आहे... आमच्या जवळपासच्या काही इष्ट आणि काही अनिष्ट देवता माझ्याकडे "जेवणापर्यंत तर बरा होता" अश्या नजरेनी बघताहेत........ वाट लावलीत राव !
इयत्ता ९वी नंतर "अश्या" चर्चा विशेष झाल्या नव्हत्या. (आम्ही विचार 'मंथनापेक्षा' कृतीवर भर देणारे !)..... राजेश पासून सगळ्यांनीच जी काही कल्पनाशक्ती लढवली आहे.... मान गये !
वैयक्तिक मत असं की फलप्राप्तीसाठी पूजा हा पूजेमागचा हेतू असू नये ! मनोभावे षोडशोपचारे पूजा करावी आणि पूजा झाल्यावर हातावरून पाणी सोडून "इदं न मम" म्हणून पुढच्या इष्टदेवतेच्या आराधनेला लागावे ! सुदैवानी आपल्याकडे इष्टदेवतांची वाण नाही.
असो.. मला ह्या विषयावर लिहायला इतकाच वेळ आहे ! तुमची पूजा अर्चा चालूदे ! ;)
संपूर्ण चर्चेत, पूजा ठरवताना पैशाच्या गणितात कोतेपणा असू नये ह्या पथ्याबाबत फारसा उहापोह झालेला आढळला नाही.
हेही पथ्य फार महत्वाचे आहे. अर्थात, नित्यनेमानी होणार्या घरगुती स्नान-संध्येला हे जरी फारसे लागू होत नसले तरी, तीर्थक्षेत्री जाऊन काही अभिषेक्-अनुष्ठाने करायची झाल्यास, ह्याकडे फार लक्ष पुरवावे लागते. अन्यथा मनाजोगते कार्य झाल्याचे समाधान मिळत नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
>>>>"तीर्थक्षेत्री जाऊन काही अभिषेक्-अनुष्ठाने करायची झाल्यास"
तसेच या वेळी सोवळे नेसून, पितांबर घालून पुजा करावी असा शासकीय नियमाच्या जाहीरातीही आजकाल बर्याच वेळा दिसू लागलेल्या आहेत. त्या मागची कारणे काय आहेत? की आताच्या विज्ञानयुगातही आपण सोवळे ओवळे, अस्पृष्य स्पर्श अशा प्रतिगामी चालीरीती पाळतच आहोत? असल्या पुजेच्या वेळी खरे तर अंग(वरची)वस्त्रे काढून ठेवण्याची प्रथा पुराणकालापासून चालत आलेली आहे.
त्याचप्रमाणे असल्या सार्वजनिक ठिकाणी पुजाविधी करण्याच्या जाहिरातीदेखील आजकाल पुजारी व्यवसायातील व्यक्ती करीत असतात. एकुणच हा व्यवसाय फारच मोठ्याप्रमाणात फोफावला आहे.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
शासनाने या पवित्र कार्याच्या आचारसंहितेत दखल घ्यावा हे आम्हांस बिलकुल पटलेले नाही. संततीप्राप्ती हा जो मूळ उद्देश होता तो नाहीसा होऊन सोवळे नेसा व गंमत म्हणून पूजा करा अशी नव्या पिढीत धारणा होत चाललेली आहे.
असो. काळ बदलला आहे, दुसरे काय. सोवळे नेसल्याने अनिष्ट असुरांच्या 'मदतीं'ची बाधा टळते यात तथ्य आहे हे आम्हास नाईलाजाने का होईना मान्य करावे लागते. तेव्हा जनहितासाठी आम्ही ते स्वीकारतो, व लोकांनाही स्वीकारावे सांगतो - विशेषत: ग्रामदेवतांची पूजा करताना. यात पूजापाठ वाढल्याने आम्हा आचारसंहिता-रक्षकांचा स्वार्थच आहे असे कोणी म्हणाल्यास दुर्लक्ष करावे.
आमच्या मते जितक्या पूजा अधिक होतील तितका मनुष्यजमातीचा पुण्यसंचय वाढेलच. त्यामुळे आम्ही सार्वजनिक, वैयक्तिक असा भेद करत नाही. केवळ कुलदेवतेचा कोप होऊ नये अशी काळजी घेतली की झालं.
राजेश
प्रतिक्रिया
-घासकडवी साहेब
मानस
हो, मानस
हो, मानस
अवडंबर शास्त्रींस उपदेश
विचार
नवा फटका
संत गाडगेबाबांनी
मम
जयपालजी
दषरथाने
हो,अजुन
आरे बाणा
या पैकी
अरे
साफ चूक
अहो
पुत्रकामेष्टी
संतती
विजुभाऊ, काय हे?
विजुभाउ हे
झाली का रे
चालू द्या...
चांगलीच
पुजा
कुलदेवतेच
रेझोनन्स
खरेतर
कुलदेवतेच
दिशा
काहीतरी चुकते आहे...
कष्टप्रद
पण मग
पुन्हा तेच
राजेशजी
कसे?
श्री सुनील
अहिताग्नी
पेन्सिल तयार आहे परंतु शार्पनर सापडत नाही.
घंटामाहात्म्य
घंटा व गाभारा
नकार घंटा
झकास जुगलबंदी!
या ठिकाणी
सामुदायीक
घट
अगागागागागागा.........
पैशाचे पथ्य
>>>>"तीर्थक्ष
भेदक मुद्दा