Skip to main content

वारीचं पुण्य!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 14/11/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजच एका मिपाकराचा फोन आला.. "काय तात्या, कसा आहेस? मीही एक मिपाकर आहे पण फक्त वाचनस्वरुपात." बर्‍यापैकी वयस्कर माणसाचा आवाज वाटत होता.. "बरं. बोला साहेब.." "तात्या तुझ्या मिपाची खरी शोभा काय सांग पाहू?" "मिपावर मनापासून लिहिणारे/वाचणारे मिपाकर!" मी. "च्च.. ते झालंच रे. पण खरी शोभा काय ते सांग ना साल्या!" हा म्हातारा एकदम शिव्यांवर आलेला पाहून मला बरं वाटलं! :) "म्हणजे मिपाचं खरं बलस्थान काय? असं विचारतोय मी. छ्या! साल्या तुझं हे संकेतस्थळ आणि तुलाच ह्याचं उत्तर माहीत नाही?" "हम्म..! येथे लिहिले जाणारे उत्तम लेख, हसीमजाक, कम्पूबाजी वगैरे..!" पुन्हा मी. "च्च.. ते झालंच रे. अरे पण मी मिपाच्या खर्‍या शोभेबद्दल विचारतोय रे! हां, आता तू त्या खादाडीसोबत रोज नव्या नव्या दाक्षिणात्य नट्यांची चित्रं टाकतोस ती खरी शोभा!' असं उत्तर नको देऊस बॉ!" असं म्हणून तो मोठ्ठ्यांने हसला. त्याचं ते च ला च जोडणं आता मला आवडू लागलं होतं! बाय द वे, दाक्षिणात्य नट्यांच्या बाबतीत बाकी तुझी डॉक्टरेट हो! अरे मला तर कित्येक नट्या तुझ्यामुळे माहीत झाल्या. आजच्या खादाडीतली ही 'ममता मोहनदास कुठे शोधलीस बाबा? काय फक्कड आहे रे!" ;) म्हातारबुवा आता हळूहळू रंगात येऊ लागले होते! :) "बरं ते जाऊ दे. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे..!" बुढ्ढा पुन्हा पूर्वपदावर. मला वाटलं होतं ममता मोहनदास या विषयावरच आमचं संभाषण संपेल. "नाय माहीत! आजोबा, आता तुम्हीच उत्तर द्या!" आणि एकदम म्हातार्‍याचा आवाज सिरीयस झाला.. "तात्या, नो डाऊट, तुझं मिपा छानच आहे. इथे मायमराठी खुलते आहे, फुलते आहे. पण तिचं खरं बलस्थान काय आहे तुला माहित्ये? आज कशामुळे मिपा एवढे बहरतं आहे तुला माहित्ये?" म्हातारा जास्तच गम्भीर! "नाही माहीत. तुम्ही बोला आजोबा." "त्या कोपर्‍यातल्या त्या जोडगोळीचा तो फोटो आहे ना? त्यामुळेच केवळ आज मिपाला यश आहे रे. अरे ज्या दिमाखाने ग्यानबा-तुकारामाची तिथे तू जी कायमस्वरूपी प्रतिष्ठापना केली आहेस ना म्हणूनच तुझं मिपा मोठं होत आहे रे!" आता म्हातारा एकदम हळवेपणाने बोलत होता, मनापासून बोलत होता. "तुला खरं सांगू? अरे जितक्या वेळेला तो फोटो पाहावा ना, तितक्या वेळेला तो तेवढाच नवा वाटतो रे! अरे जेव्हा जेव्हा मी 'हजर सभासदांची' यादी पाहतो ना, तेव्हा त्या यादीत मला ती दोन अदृष्य नावं सर्वप्रथम दिसतात!" "जो पर्यंत ते दोघं मिपावर लॉगईन करताहेत ना तात्या, तोवर तुझ्या मिपाला मरण नाही! बरं चल, ठेवतो फोन. पुन्हा बोलू!" सुरवतीस केवळ ममता मोहनदास या विषयावरच वाहवत जाईल की काय असं वाटणारा तो म्हातारा, कुठलंही प्रवचन न देता इतक्या साध्या रितीने, साध्या शब्दात मला खूप मोठी गोष्ट सांगून गेला होता, एक वारी केल्याचं पुण्य माझ्या पदरी देऊन गेला होता! -- तात्या अभ्यंकर.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11014
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

:) ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

तात्या (अ)भंयकर सुंदर लेख हो. जय हरी जय हरी *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्रकटन छान, आवडले. :) बिपिन कार्यकर्ते

व्वा तात्यासाहेब, व्वा! हे वाक्य तुमचं असेल तर तुम्हाला सलाम! पण जर खरोखार 'त्या' आजोबांचे असेल तर त्यांना मानाचा कुर्निसात! "अरे जेव्हा जेव्हा मी 'हजर सभासदांची' यादी पाहतो ना, तेव्हा त्या यादीत मला ती दोन अदृष्य नावं सर्वप्रथम दिसतात!" जय हो! सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

:) मदनबाण..... The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.

:) --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

:| दाक्षिणात्य नट्यान्चे का महाराश्ट्रियन नट्यान्चे टाकत चला. स्वतला मनसेकर म्हणवता ना? 8| चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

सहमत. अधुन मधुन मराठी नट्यांचे पण फोटु टाकत चला तात्या.

In reply to by गणपा

थोड्या पाश्चिमात्य आणि सिंगापुर इंडोनेशिया साईडच्या पण येवुद्या. तेवढेच आमचे पिडाकाका, काळेकाका खुश ! आणि हो आमच्यावर नाराज असलेले काका पण आहेत त्या ठिकाणी. ते पण खुश !! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

In reply to by पर्नल नेने मराठे

मी माझ्या खरडवहीत मराठी नटीचा फोटू लावला होता. आनि लिहिल होतं- हीच्यावर आमचा भारी जीव! ;) :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

बाकी मिपाची रसोई कितीही समृद्ध असली तरीही दाक्षिणात्य नट्या तीमधून कशा बाहेर येतात कोण जाणे! अदिती

In reply to by भोचक

हॅहॅहॅ .. अगदी !! तात्या मस्त लिवतो कधीकधी :) बाकी कॉल केलेला म्हातारा रजनिशांचा शिष्य का हो ? अगदी सम-भोगातून समाधीकडे विषय वळवलान् ? ;) (टोचक) बुधवार पेठ आणि कधीही लेट हे आहे आमचं मन

In reply to by टारझन

मनापासुन हसू आले... (लोचट) सदाशिव पेठ..मटन खाउन वढलय वेट

अरे ज्या दिमाखाने ग्यानबा-तुकारामाची तिथे तू जी कायमस्वरूपी प्रतिष्ठापना केली आहेस ना म्हणूनच तुझं मिपा मोठं होत आहे रे!" म्हातार्‍याशी सहमत -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

छान प्रकटन..! :)

नट्या कूठल्याही असल्या तरी त्यांचे मुळ उच्चारांचे वर्णध्वनी मराठीतच असतात. त्यामूळे जगातल्या कूठल्याही नट्या मिपावर आल्यातर ठिकच की तात्या. (पण भारतीय तोंडवळा ज्या नट्यांचा असतो त्या नट्या जगातल्या कूठल्याही नट्यांच्या तोंडात मारतात, काय खरे की नाही?) जय मनसे प्रवृत्ती ! -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

In reply to by पाषाणभेद

त्यामूळे जगातल्या कूठल्याही नट्या मिपावर आल्यातर ठिकच की तात्या.
करेक्ट.. :) आपला, (ममता मोहनदासवर विलक्षण जीव असणारा) तात्या.

In reply to by पाषाणभेद

भारतीय तोंडवळा ज्या नट्यांचा असतो त्या नट्या जगातल्या कूठल्याही नट्यांच्या तोंडात मारतात काय कळ्ळं नाय बॉ....या मारामार्‍या कुठे होतात ;) जय महाराष्ट्र.....

In reply to by विजुभाऊ

आव विजूभौ, तुमी चेश्टा तर नाय ना करूंन र्‍हायलेय? म्या काय मारामारीची गोश्ट नाय करूंन र्‍हायलो. तोंडात मारत्यात हा वाकप्रचार हाये. म्हंजी आस की आपल्या नट्यांची तोंडं लई भारी आसत्यात. त्या फारीनच्या नट्यांपेक्शा भारी दिसत्यात आस म्हनायचं हाये माला. बाकी शि. द. फडणीसांचे कार्टून म्हणजे शब्दांचे कामच नाही. जुन्या गणिताच्या पुस्तकातही त्यांनी काढलेली चित्रे असत. मला वाटते बालभारतीने ते एक चांगले काम केले असावे. -------------------- काय? घरात वॉल टू वॉल कारपेट टाकायचे नाही? मग घरात स्लीपर वापरा. पासानभेद बिहारी (महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|

:) (हजर)प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

"त्या कोपर्‍यातल्या त्या जोडगोळीचा तो फोटो आहे ना? त्यामुळेच केवळ आज मिपाला यश आहे रे. अरे ज्या दिमाखाने ग्यानबा-तुकारामाची तिथे तू जी कायमस्वरूपी प्रतिष्ठापना केली आहेस ना म्हणूनच तुझं मिपा मोठं होत आहे रे!"
१००% खरं.. - कोकणी फणस

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भांचोत", आणि "बाझवला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे! धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भांचोत", आणि "बाझवला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे! डावीकडे पाहिले असता वारीचे तर उजवीकडे पाहिले असता बारीचे पुण्य मिळते!! ;) किर्तनी बसता नेत्र लाभविले, मन माझे गुंतले विषयसुख. (तिरळा) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ज्ञानोबा-तुकारामांचे अस्तित्व जो वरी आहे तो वरी मायमराठी आणी मिपा असतील.. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

छान... :) काहीच वाद नाही.

सुंदर!!!! तात्या मला हा लेख खूप आवडला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

छान लेख. -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

वारी चागंलीच दारी आलेली दिसतेय! ******************************************* आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...