आजच एका मिपाकराचा फोन आला..
"काय तात्या, कसा आहेस? मीही एक मिपाकर आहे पण फक्त वाचनस्वरुपात."
बर्यापैकी वयस्कर माणसाचा आवाज वाटत होता..
"बरं. बोला साहेब.."
"तात्या तुझ्या मिपाची खरी शोभा काय सांग पाहू?"
"मिपावर मनापासून लिहिणारे/वाचणारे मिपाकर!" मी.
"च्च.. ते झालंच रे. पण खरी शोभा काय ते सांग ना साल्या!"
हा म्हातारा एकदम शिव्यांवर आलेला पाहून मला बरं वाटलं! :)
"म्हणजे मिपाचं खरं बलस्थान काय? असं विचारतोय मी. छ्या! साल्या तुझं हे संकेतस्थळ आणि तुलाच ह्याचं उत्तर माहीत नाही?"
"हम्म..! येथे लिहिले जाणारे उत्तम लेख, हसीमजाक, कम्पूबाजी वगैरे..!" पुन्हा मी.
"च्च.. ते झालंच रे. अरे पण मी मिपाच्या खर्या शोभेबद्दल विचारतोय रे! हां, आता तू त्या खादाडीसोबत रोज नव्या नव्या दाक्षिणात्य नट्यांची चित्रं टाकतोस ती खरी शोभा!' असं उत्तर नको देऊस बॉ!"
असं म्हणून तो मोठ्ठ्यांने हसला.
त्याचं ते च ला च जोडणं आता मला आवडू लागलं होतं!
बाय द वे, दाक्षिणात्य नट्यांच्या बाबतीत बाकी तुझी डॉक्टरेट हो! अरे मला तर कित्येक नट्या तुझ्यामुळे माहीत झाल्या. आजच्या खादाडीतली ही 'ममता मोहनदास कुठे शोधलीस बाबा? काय फक्कड आहे रे!" ;)
म्हातारबुवा आता हळूहळू रंगात येऊ लागले होते! :)
"बरं ते जाऊ दे. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे..!"
बुढ्ढा पुन्हा पूर्वपदावर. मला वाटलं होतं ममता मोहनदास या विषयावरच आमचं संभाषण संपेल.
"नाय माहीत! आजोबा, आता तुम्हीच उत्तर द्या!"
आणि एकदम म्हातार्याचा आवाज सिरीयस झाला..
"तात्या, नो डाऊट, तुझं मिपा छानच आहे. इथे मायमराठी खुलते आहे, फुलते आहे. पण तिचं खरं बलस्थान काय आहे तुला माहित्ये? आज कशामुळे मिपा एवढे बहरतं आहे तुला माहित्ये?"
म्हातारा जास्तच गम्भीर!
"नाही माहीत. तुम्ही बोला आजोबा."
"त्या कोपर्यातल्या त्या जोडगोळीचा तो फोटो आहे ना? त्यामुळेच केवळ आज मिपाला यश आहे रे. अरे ज्या दिमाखाने ग्यानबा-तुकारामाची तिथे तू जी कायमस्वरूपी प्रतिष्ठापना केली आहेस ना म्हणूनच तुझं मिपा मोठं होत आहे रे!"
आता म्हातारा एकदम हळवेपणाने बोलत होता, मनापासून बोलत होता.
"तुला खरं सांगू? अरे जितक्या वेळेला तो फोटो पाहावा ना, तितक्या वेळेला तो तेवढाच नवा वाटतो रे! अरे जेव्हा जेव्हा मी 'हजर सभासदांची' यादी पाहतो ना, तेव्हा त्या यादीत मला ती दोन अदृष्य नावं सर्वप्रथम दिसतात!"
"जो पर्यंत ते दोघं मिपावर लॉगईन करताहेत ना तात्या, तोवर तुझ्या मिपाला मरण नाही! बरं चल, ठेवतो फोन. पुन्हा बोलू!"
सुरवतीस केवळ ममता मोहनदास या विषयावरच वाहवत जाईल की काय असं वाटणारा तो म्हातारा, कुठलंही प्रवचन न देता इतक्या साध्या रितीने, साध्या शब्दात मला खूप मोठी गोष्ट सांगून गेला होता, एक वारी केल्याचं पुण्य माझ्या पदरी देऊन गेला होता!
-- तात्या अभ्यंकर.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
11014
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
:)
मी पण मिपा चा वारकरी
:)
मालक...
व्वा
:)
च्च !
दाक्षिणात
+१
In reply to दाक्षिणात by पर्नल नेने मराठे
+२
In reply to +१ by गणपा
मी माझ्या
In reply to दाक्षिणात by पर्नल नेने मराठे
(विषय दिलेला नाही)
बाकी
स्त्री"दाक्षिण्य"
अफाट आहात
In reply to स्त्री"दाक्षिण्य" by सुनील
हॅहॅहॅ ..
In reply to अफाट आहात by भोचक
हाहाहा
In reply to हॅहॅहॅ .. by टारझन
अरे ज्या
छान...
नट्या
त्यामूळे
In reply to नट्या by पाषाणभेद
भारतीय
In reply to नट्या by पाषाणभेद
आव विजूभौ,
In reply to भारतीय by विजुभाऊ
`
In reply to आव विजूभौ, by पाषाणभेद
(हजर)प्रभो --
१००%
ज्ञानबा-तुकाराम
हे ज्ञानबा-तुकाराम
डावे-उजवे
In reply to हे ज्ञानबा-तुकाराम by मिसळभोक्ता
१ नंबर !!
In reply to हे ज्ञानबा-तुकाराम by मिसळभोक्ता
(विषय दिलेला नाही)
निखळ सत्य..
छान!!
वारी-बारी
आवडले.
सुंदर!!!! तात
छान
छान लेख
वारी