आणखीन एक इडियट
आणखीन एक इडियट...
माझा जन्म झाल्यानंतर पहिलं मिनिटभर आमच्या पिताश्रींनी कौतुकाने स्वत:च्या काळ्याभोर, गुबगुबीत मिशांवर ताव मारला. त्या मिनिटभरांत माझा चेहेरा न्याहाळण्याऐवजी प्रथम मी मुलगा असल्याचा पुरावा न्याहाळला. खरं तर सोनोग्राफी व गर्भजल चिकित्सेनंतर त्यांनी नर्सला मिठाईच्या पुड्यातून दिलेल्या गांधीजींची चित्रं छापलेल्या कागदांमुळे 'पुढची अपॉईंटमेंट कधी, मंडेला की फ्रायडेला?' या प्रश्नाला खणखणीत, 'नक्की मंडेला या साहेब. मंडेलाच.' असं उत्तर मिळालं होतं. पण आमचे पिताश्री म्हणजे पक्के चार्वाकवादी. त्यात वकील. त्यांना शब्दप्रमाण मान्य नव्हतं.
मिसळपाव
६० च्या दशकात जमशेदपुरला आपल्या देशातील पहिला प्रकल्प ईटलीच्या तंत्रज्ञानांच्या मदतीने उभा राहिला.