Skip to main content

वाङ्मय

'खास' पुस्तकलेखकांचे अंतरंग

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 10/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या साठ वर्षात मराठी साहित्यात अनेक प्रकारची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्रे आणि संकीर्ण अशा साहित्यप्रकारांचा समावेश आहे. प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके काही वाचकांना आवडली व भावली. त्यातली काही खऱ्या अर्थाने गाजली, काही गाजवली गेली तर अन्य काही दुर्लक्षित राहिली. या कालखंडात अनेक लेखकांनी सातत्याने लेखन केले. त्यापैकी काही लेखक खरोखर वाचकप्रिय झाले. अशा लेखकांच्या काही पुस्तकांनी एक साहित्यिक मानदंड निर्माण केला.

पुस्तक परिचय: कोल्हाट्याचं पोर - लेखक: किशोर काळे

लेखक सुजित जाधव यांनी सोमवार, 09/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षी वाचनालयात पुस्तक शोधत असताना माझ्या हाती किशोर शांताबाईं काळे यांचं कोल्हाट्याचं पोर नावाचं पुस्तक लागलं. पुस्तकाच्या मलपृष्टावरील ओळी वाचल्यानंतर दुःख झालं आणि किशोर काळे व त्यांच्या आईबद्दल मनात उत्सुकता निर्माण झाली. त्याच दिवशी हे पुस्तक मी घरी नेलं आणि एका बैठकीत मी ते वाचून काढलं होत.. काही दिवसांपूर्वी मी ते दुसऱ्यांदा वाचलं आणि त्याबद्दल लिहण्याचा मोह आवरला नाही… कथेची सुरुवात होते जिजीपासून.. जिजींच खर नाव ताराबाई, त्यांचा जन्म साळी समाजात होतो. जिजींची आई लक्ष्मीबाई व वडील महादेव सोलापूरला राहत असतात. महादेव हा थोडा वेडसर असतो.

पुस्तक परिचय: लॉक ग्रिफिन --लेखक -वसंत वसंत लिमये

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 01/12/2022 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसांनी एक पुस्तक हाती आले आणि अतिशय रंजक असल्याने आठवड्याभरात वाचूनही झाले. त्याचीच ही ओळख. पुस्तकाचे लेखक वसंत लिमये हे माझ्यामते काही पेशाने लेखक नव्हेत. ते आय आय टी मुंबईचे मेकॅनिकल इंजिनीयर आहेत आणि पुण्यात हाय प्लेसेस नावाची ट्रेकिंग संदर्भातील एक कंपनी चालवतात. ताम्हिणी घाटात गरुड माची नावाची कॅम्प साईटही त्यांनी बनवली आहे जिथे कॉर्पोरेट ट्रेनिंग वगैरे दिली जातात.

शरत्काल

लेखक नूतन यांनी गुरुवार, 17/11/2022 या दिवशी प्रकाशित केले.
शरदाचे चांदणे, मधुवनी फुलला निशिगंध नाचतो गोपी जनवृंद, वाजवी पावा गोविंद माणिक वर्माच्या गोड आवाजात हे गाणं ऐकताना मन हरवून गेलं पण पुन्हा पुन्हा शरदाचं चांदणं शब्दाशी घुटमळत राहिलं. 'शरदाचं चांदणं' हा वाक्प्रचार आपण सहसा विशेष गोष्टींसाठीच वापरतो. त्याच्या उच्चारानेदेखील मन आनंदात न्हाऊन निघतं. अशा या शरद ऋतू विषयी मला उत्सुकता वाटली आणि त्या अनुषंगाने काही काही वाचत गेले.

मुक्त चिंतन

लेखक अन्या बुद्धे यांनी शुक्रवार, 16/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्त चिंतन काळा कभिन्न कातळ. कणखर, खडबडीत, बऱ्यापैकी तापलेला. मधेच वाळकं गवत. खडकातल्या बारक्या कडा, भेगा यात बोटं खुपसून, पावलांच्या कडा आधारासाठी वापरत आपण रॉकला भिडतो. हळूहळू उंची गाठली जात असते. आणि अचानक सावकाश नकळत आपल्या नजरेचा पसारा आकुंचित होतो. अर्धा इंच रुंदीच्या क्रॅक स्पष्ट दिसू लागतात. बोटं दाबलेल्या खडकाच्या आतली धडधड आपल्या छातीतल्या धडधडीशी जोडली जाते आणि क्षणात तो भरवशाचा नाही म्हणून दुसऱ्या कंगोऱ्याकडे हात सरकतो. पावलाच्या बोटापासून ताणलेल्या हातापर्यंत एक हवा-नको-हवासा ताण येतो. आपली पुढली हालचाल 2 फूट अधिक उंची की खाली कोसळत जाणं यातला फरक सांगणार असतात.

ऐक..दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 12/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक.. दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा) सायंकाळचा संधिप्रकाश आता, गडद जाणवायला लागला होता. अंधाराच्या छटा आता, अवतीभोवती विखुरल्या जात होत्या. त्या अंधाराच्या गडद छायेत एक एक वस्तू, अदृश्य होत होती. शेवटच्या गल्लीतला सगळ्यात पाठीमागचा तेरा नंबरचा बंगला, जो गल्लीच्या एकदम मागच्या टोकाला होता, तोही आता या अंधारात दिसेनासा झाला होता. जसा जसा अंधार वर चढू लागला, तसतशी भीती संथ गतीने माझ्या अंतर्मनात शिरत होती. या अशा बंगल्यात मी एकटीच होते.अगदी एकटीच.

सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली

लेखक अनुनाद यांनी रविवार, 04/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं. कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले... X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.

इलाज नसलेला फीव्हर

लेखक भागो यांनी मंगळवार, 26/07/2022 या दिवशी प्रकाशित केले.
इलाज नसलेला फीव्हर मी संध्याकाळचा चहा पीत बसलो होतो. तेवढ्यात माझा फोन थरथरायला लागला. बघतो तर काय पुष्पा वहीनींचा फोन! बहुतेक गरम गरम कांदापोहे तयार आहेत. या खायला असा निरोप असणार किंवा रात्रीचे जेवण इकडेच करा, अस आग्रहाचे निमंत्रण असणार. म्हणून मी उत्साहाने फोन उचलला. “हॅलो, वहिनी कांदा पोहे...” मला पुढे बोलू न देता वहिनी बोलू लागल्या, “अहो बंड्या भावोजी, तुम्ही ताबडतोब इकडे निघून या पाहू. तुमचे मित्र पहा कसं वेड्यासारखे करताहेत.

पुस्तक परिचय -पार्टनर: लेखक व. पु. काळे

लेखक सुजित जाधव यांनी बुधवार, 01/06/2022 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक 'पार्टनर' असतो..ज्याच्यासोबत/जिच्यासोबत आपण आपले सुख-दुःख Share करतो... ती व्यक्ती आपल्याला संकटसमयी मार्गदर्शन करते, आपल्या सुखदुःखाचा भागीदार बनते…वपुंची 'पार्टनर' ही कथा पण आपल्याला अश्याच एका पार्टनरची ओळख करून देते…तशी पार्टनर ही एक प्रेमकथाच आहे पण ती वपुंनी लिहली आहे हे तिचं वैशिष्ट्य…

हे वाचा: शेष प्रश्न

लेखक अनुस्वार यांनी मंगळवार, 15/03/2022 या दिवशी प्रकाशित केले.
कटाक्ष: भाषा- हिंदी (मूळ बंगाली) लेखक- शरच्चंद्र चट्टोपाध्याय प्रकाशन- डायमंड बुक्स प्रथमावृत्ती- १९३१ पृष्ठसंख्या- २०८ किंमत- ₹१५० ISBN : 978-81-7182-917-1 ओळख: कहाणीचा काळ स्वातंत्र्यपूर्व, वीसाव्या शतकाचा पूर्वार्ध. सगळे कथानक आग्र्यातल्या बंगाली वस्तीत घडते. आशु बाबु, अविनाश, हरेन्द्र, अक्षय आणि इतर ही बंगाली भद्र मंडळी. संस्कृतीचे पाईक आणि पूजक अशा या मंडळींची गाठ पडते कथेची नायिका कमल हिच्याशी (कथेला नायक नाही!). कमल आणि तिचा गायक पती शिवनाथ यांच्या विवाहाची वैधता ते कमलचे कुळ, जात इ.