Skip to main content

तंत्र

१२३.४

लेखक गवि यांनी गुरुवार, 13/01/2011 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लाईंग शिकणं हा माझ्या एरव्हीच्या लाईफपेक्षा भलताच जास्त झापडिंग काळ होता.. त्यात मी जाम मजा केली..जाम लोचे केले आणि जाम झगडा केला..भीतीशी, निराशेशी,अभ्यासाशी, आकाशाशी, हवेशी आणि व्हॉट नॉट..!! हवेत उडताना एका एरियाताली सर्व विमानं एकाच फ्रिक्वेन्सीवर बोलत असतात..तरट फाटल्यागत आवाजात घोगरं घोगरं बोलून पायलट कोणावर स्टाईल मारतात कोण जाणे.. पण त्यामुळे होतं काय की सर्वांचं बोलणं सगळेच ऐकत असतात..आणि एकजण बोलायला लागला की त्याने माईक सोडेपर्यंत बाकी सगळ्यांची बोलती बंद.. म्हणून अत्यंत मुद्द्याचं तथा थोडक्यातच बोलायचं असतं.. मोठ्या विमानात पायलट आणि को-पायलट एकमेकांशी टी.पी.

क्षणभर विश्रांती

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 11/01/2011 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
परवा 'क्षणभर विश्रांती' हा एक सुंदर मराठी चित्रपट बघण्यात आला. चित्रपटाला खरेतर खूप आकर्षक कथा वगैरे आहे अशातला भाग नाही, उलट ह्या चित्रपटाची कथा साधी सरळ आणि सहज उलगडत जाणारी आहे.

व्याख्याच व्याख्या

लेखक स्पा यांनी मंगळवार, 11/01/2011 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का? अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर

'फेसबुक' वर आहेस का?

लेखक दैत्य यांनी गुरुवार, 06/01/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुक........फेसबुक चा तो निळा रंग बघूनच कंटाळा येतो... कधी ह्या कंटाळ्याचा डोंगर पार करून समजा बघितलं तर पुलंनी वर्णन केलेल्या पानवाल्याच्या ठेल्याची आठवण येते...हेच पहा ना.... सगळ्या मित्रांचे ठराविक फोटोज ( गळ्यात हात टाकून 'ये दोस्ती नही छोडेंगे' वगैरे)........काही मित्रांचा ग्रुप ---ज्यांचे नेहेमी दारू पिताना फोटोज ( टायटल: 'इश्कने दर्दी बनाया' किंवा 'आज थोडी पी ली है' ).... ....मग अजून एक मित्रांचा समूह ज्यांचे नेहेमी कुठल्या तरी गोऱ्या मुलीबरोबर किंवा मेणाचा पुतळा असलेल्या गोऱ्या अभिनेत्री-बरोबर (उदा. शकिरा वगैरे) फोटोज...

मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी

लेखक देवदत्त यांनी शनिवार, 11/12/2010 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण २००६ पासून ऐकण्यात असलेली ’मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी’ सुविधा अखेर २५ नोव्हें २०१० पासून हरियाणामध्ये सुरू झाली. इतर भागांत ती २० जाने २०११ पासून सुरू होईल अशा बातम्या आहेत. मी ह्या ४ वर्षांत ३ क्रमांक बदलले. पण ह्या सुविधेचा मला फायदा झाला नसता, कारण माझे शहर आणि मोबाईलचे क्षेत्र ह्यांतच बदल होत गेला. आणि सध्यातरी ह्या सेवादात्याकडून एकदम बदलूनच टाकावे अशी काही वाईट सेवा नाही. तरीही ही सुविधा नेमकी कशाप्रकारे वापरता येईल हे पहायचा प्रयत्न केला.

कोअर (आणि त्यामुळे निघालेला पसारा)

लेखक यकु यांनी मंगळवार, 07/12/2010 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
२००३ साली येऊन गेलेला हॉलीवूडचा दि कोअर हा सी-फि सिनेमा नुकताच नजरेवेगळा केला. या कोअरमधूनच बराच पसारा निघाला, तोच आता इथं मांडणार आहे. कोणताही सी-फि म्हटले की त्यात डायरेक्ट पृथ्वीचाच नाश होताना पाहाणे आणि मध्येच कुणीतरी (विशेषत: व्हाईट हाऊस किंवा पेंटागॉनच्या जाली सेटवर बसलेल्या लुंग्यासुंग्यांनी, किंवा कुठल्यातरी वाळवंटात, कबाडखान्यात किंवा जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात संशोधन करणार्‍या झक्की लोकांनी) तो थांबवणे अटळ असते. या सिनेमातही हेच होते; एकापेक्षा एक छप्परफाड (खरं म्हणजे पृथ्वीफाड, आकाशफाड किंवा ग्रहगोल-तारे-आकाशगंगा-विश्व-फाड असं म्हणायला हवं) कल्पना यात अगदी ठासून भरलेल्या आहेत.

माईंड मॅप

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 03/12/2010 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
गेली ४ वर्षे मी "फ्री माईंड" नावाचे साधन (सॉफ्ट्वेअर टूल) माझ्या कार्यक्षेत्रात वापरते आहे. हे साधन माईंड मॅप या प्रकारात मोडते. याचा उपयोग मेंदूतील विचार अतिशय सुसंगत आणि सुस्पष्ट तसेच आकर्षक रीतीने कागदावर उतरविण्यात होतो. विचार आपले आपल्याला खरोखर खूप स्पष्ट होतात. विचारांची दिशा आणि विचारसमूह ओळखू येऊ लागतात. एखाद्या ठीकाणी विचारसाखळी तुटली असेल (गॅप) तर लगेच लक्षात येते.

महा भारत

लेखक तिमा यांनी सोमवार, 22/11/2010 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
सन २०५१. नोव्हेंबरचा महिना. भारताची अभूतपूर्व प्रगती करुन दाखवणार्‍या महानेत्याचा सत्कार व प्रगट मुलाखत होती. वार्ताहरांचे थवे व्यासपीठाभोवती जमले होते. त्यांच्यामागे अफाट जनसागर पसरला होता. तो ट्रकने आणला नव्हता, तर उस्फूर्तपणे आला होता. प्रारंभी दोन चार नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर प्रमुख विरोधी नेत्यातर्फे महानेत्याला नोटांचा हार घालण्यात आला. महानेत्याने सत्काराचा स्वीकार केला आणि तो भाषण द्यायला उभा राहिला. मित्रहो, तुमच्या प्रेमाने मला भरुन आले आहे. अल्पवर्षात या देशाची झालेली प्रगती पाहून मला देखील आश्चर्य वाटत आहे. पण या सर्वाचे श्रेय आमच्या गुरुंचे आहे.