Skip to main content

तंत्र

नाईट शिफ्ट

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 24/01/2012 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
आयटीमधली नोकरी म्हणजे डोक्याला ताप असतो. आयटीशिवाय असलेल्या व्यक्तिंना तर ही नोकरी म्हणजे स्वर्ग वाटतो. त्यांना असे वाटते की नुसते बसून तर काम असते. अन सोई सुविधा, तगडा पगार आदींबाबत तर फारच मोठे गैरसमज पसरले आहेत. मान्य आहे की इतर इंडस्ट्रीजपेक्षा येथे जास्त पगारपाणी असतो, पण तो काही सर्व आयटी प्रोफेशनल्सला असू शकत नाही, किंवा सर्व प्रोफेशनल्सची कंपनीदेखील जास्त पगार देणारी नसते. अन हा जास्त पगार म्हणजे फुकट असत नाही. त्या बदल्यात कंपन्या कामेदेखील करवून घेतात. सर्व ठिकाणी कामाची परिस्थिती आनंददायक असतेच असे नाही. असो. असो अशासाठी की माझी गोष्ट भलतीकडेच वाहवत चालली होती.

हस्ताक्षरातील अक्षर...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 24/01/2012 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे.

जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी.... एल. आय. सी. चे घोषवाक्य कि निव्वळ फसवेगिरी..???

लेखक जमीर इब्राहीम 'आझाद' यांनी गुरुवार, 29/12/2011 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी.... हे आहे एल. आय. सी. चे प्रसिद्ध घोषवाक्य..!!! .... खरेच एल. आय. सी. या घोषवाक्याप्रमाणे सर्वच बाबतीत प्रामाणिक आहे का..? की निव्वळ फसवेगिरी आहे..??? चला पाहू..! पण त्या आधी काही इतर खरी माहिती घेऊयात..!!!! जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ओर्गनायझेशन) ने सांगितल्यानुसार जगातील एकूण हृदयरुग्णांपैकी ६०% लोक हे भारतात आहेत..

मी ऑफिसमध्ये कामचुकार पणा का करतो..?

लेखक जमीर इब्राहीम 'आझाद' यांनी गुरुवार, 15/12/2011 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
दार वाजू लागले.. पण दिसत तर कुणीच नव्हते... दुकानदाराला वाटले भास झाला असावा.. दार पुन्हा वाजले .. मग त्याने खिडकीतून वाकून पाहिले तर एक धिप्पाड, मोठ्ठा, अल्सेशियन कुत्रा त्याच्या दुकानाचे दार ठोठावत होता.. त्याने त्याला लगेच हुसकून लावले....तरी पुन्हा तोच सीन.. कुत्रा त्याच्या दुकानाचे दार वाजवत होता.. मग त्याने नीट पहिले तर त्या कुत्र्याच्या तोंडात एक पिशवी होती..

पुस्तक परिचयः संगणकावर मराठीत कसे लिहाल? लेखक प्रसाद ताम्हनकर

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 12/12/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
एकूण पृष्ठसंख्या: ६४ किंमतः ६० रू. फक्त. नवता प्रकाशन मिपावर येण्यापूर्वी मराठीत काही लिहायचं तर मला फक्त iLeap हे एकच सॉफ्टवेअर माहित होतं. पण त्यात सगळी अक्षरं ऑनस्क्रीन कीबोर्डावर लिहायची असल्यानं टंकाळा यायचा. मराठी आंतरजालाशी ओळख झाली तरी मी वाचनमात्रच होते. एकदा कधीतरी एक चार ओळींचा प्रतिसाद लिहिला, त्यानेही चांगली पंधरा-वीस मिनिटे खाल्ली. मद्रासच्या सफरीचा पहिला भाग लिहिताना जी दमछाक झाली ती तर अजूनही लक्षात आहे.

मराठी ज्ञानसागरात मोलाची भर आणि मिनी कट्टा अर्थात परीकथेतील राजकुमार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन १० डिसेंबर २०११

लेखक नितिन थत्ते यांनी रविवार, 11/12/2011 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपले लाडके मिपाकर परिकथेतील राजकुमार (परा) ऊर्फ प्रसाद ताम्हनकर यांच्या 'संगणकावर मराठी कसे लिहावे' या पुस्तकाचे प्रकाशन काल संपन्न झाले. मनसेचे स्थानिक नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी 'महाराष्ट्र धर्म' हे प्रदर्शन आयोजित केले होते, त्यात पुस्तक प्रदर्शन, बोधनकरांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन स्टॉल होते. कार्यक्रमाला कोणकोण येणार याची फोनाफोनी ३-४ दिवसांपासून चालू होती. कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता ठरला होता पण तेव्हा गर्दी असेल म्हणून ६ वाजताच जमायचे ठरले होते.