जुलूस
सहावी संज्ञा, Intuition किंवा आतला आवाज या प्रकाराला काही शास्त्रीय आधार आहे की नाही, कोण जाणे? आजकाल तंत्रज्ञानाने इतकी मोठी झेप घेतलेली आहे आणि ते इतक्या प्रकारे, इतक्या वेळा मनावर आदळले जाते की कधीकधी स्वत:चा आतला आवाज खोटा वाटायला लागतो. इतकी भरभराट होत असतानाही चुकचुकणारी माणसं नैराश्याची बळी वाटायला लागतात, काहीतरी जुन्याच्या आठवणींनी उसासणार्यांना सरसकट वायफळ नॉस्टॅल्जियाचे रोगी समजले जाते आणि इतक्या मोठमोठ्या गोष्टी बोलणार्यांसमोर साध्या-साध्या शंका विचारण्याची लाज वाटू लागते.
मुळात माझ्यासारख्याच अनेक लोकांना स्वतंत्र विचार करण्याचं शिक्षण मिळालेलंच नाहीय.
मिसळपाव
पुस्तकाचे नावः प्रे (सावज)
मूळ लेखकः मायकल क्रायटन
अनुवादकः प्रमोद जोगळेकर
प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत : रु. ३००/-
मायकल क्रायटन हे नाव आता मराठी वाचकांना अपरिचित राहिलेले नाहिये.
जुरासिक पार्क, लॉस्ट वर्ल्ड, डिस्क्लोजर, काँगो अशा कित्येक कादंबर्या मायकेल क्रायटनने लिहिल्या आहेत व त्याच्या कादंबर्यांवर बेतलेले हॉलिवूड मधील हे इंग्रजी चित्रपटही अतिशय गाजलेले आहेत. अतिशय थरारक अशी कथानकाची रचना करणारा लेखक म्हणून मायकल क्रायटन सर्वांना परिचित आहेच.
अश्याच एका कोणत्या तरी दिवशी 'बघुया काय आहे ते' या विचारानी मी ते पुस्तक उघडलं आणि मग मात्र त्यात गुंगून गेलो.
'अनुराग कश्यप डोक्यावर पडला आहे' इथपासून ते 'येवढा चित्रपट लोकांनी का नाकारला?' अशा दुसर्या टोकाच्या प्रतिक्रियेपर्यंतच्या गप्पा 'गँग्ज ऑफ वासेपुर' ह्या चित्रपटाबद्दल ऐकत होतो. स्वतः अनुराग कश्यप आणि ज्यांना चित्रपटातले नक्की कळते (आसे आम्हाला वाटते) अशा दोन चार समीक्षकांनी देखील वासेपुरचे कौतुक केल्याने, आता नक्की भानगड आहे तरी काय हे बघणे आलेच होते. काल मग एकदाचा हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची कथा म्हणाल तर एका वाक्यात संपणारी आहे.
विकांताला मेंदूला झालेला त्रास बघता ह्या वेळी मेंदूचा वापरच करावा लागणार नाही असा एखादा मसालापट बघायचे ठरवले आणि पावले चालली 'शांघाय'ची वाट.
'पोलिटिकल थ्रिलर' असा गाजावाजा झालेला हा चित्रपट ना पोलिटिकल थ्रिलरच्या अपेक्षा पूर्ण करतो ना नुसत्या थ्रिलरच्या. हान काही काही प्रसंगात थिल्लर वाटण्यात मात्र तो यशस्वी झाला आहे हे नक्की.