हैदराबाद येथे झालेले मराठी बालनाट्य : 'राजकन्येची बाहुली'
हैदराबाद येथील रंगधारा नाट्यसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ पोट्टी श्रीरामलु तेलुगु युनिव्हर्सिटीच्या एन्.टी. रामाराव कलामंदिरात दि. २२ जून २००८ रोजी संपन्न झाला. यावेळी 'राजकन्येची बाहुली' हे बालनाट्य आणि 'ओले,ओले, टीव्ही बोले' हे लघुनाट्य सादर करण्यात आले. दोन्ही बालनाट्ये अत्यंत उत्कृष्टरित्या सादर झाली.
शिंपीणिचं घरटं
गावाचं तेव्हा शहर व्हायचं होतं.वाड्याला लागून वाडे होते . छेडा-गाला-ठक्कर नावाची माणसं फिरकत नव्हती. गावाला गुजराथ्यांचं वावडं नव्हतं.गावात गुजराथी कुटुंब बरीच होती. त्यांना गुज्जर म्हणायचे. धारीया ,सेठ , शहा अशी नेमकीच आडनावं होती. गुज्जरांची मोजणी वेगळी नसायची. हळूहळू बदल येत गेला.भाडोत्री नावाची कुटुंब वाड्यात रहायला आली.त्यांना गावाबद्दल कधीच प्रेम नव्हतं.त्यांना त्यांचंच गाव आवडायचं .पण पोट भरायला बिचारी आमच्या गावात आली होती.पण हळूहळू बदल येत होता. पंचायतीची इमारत उभी राहीली.टेलीफोनच्या लायनी रस्त्यावरून लोंबायला लागल्या. शाळा मोठी झाली.
त्या गुर्जरनगरी: प्रथम तुज पाहता
भाग १त्या गुर्जरनगरी: ओळख वरून पुढे...
पहिल्या दिवशी सरळ ऑफिसाला जायचे होते व तेथून संध्याकाळी हॉटेलवर. प्रीपेड टॅक्सी केली. एकटाच असल्याचे पुढेच बसलो. गाडी विमानतळाच्या आवारातून बाहेर पडली आणि एका हमरस्त्याला लागली. अहमदाबाद विरळ होत गेलं आणि गांधीगरच्या रस्त्याला लागलो होतो. इथे माझं लक्ष वेधलं ते इथल्या रस्त्यांनी... अहाहा! रस्ते असावेत तर असे.. तेही भारतात.. संपूर्ण प्रवासात कुठेही खड्डा दिसलाच नाही.
स्वयंपाकी देता का हो कोणी ??
स्वयंपाकी देता का हो कोणी ??
।। श्री अन्नपुर्णा देवी प्रसन्न ।।
बंग़ळूर
ज्येष्ठ कृष्ण १
पोटासाठी दाही दिशा म्हणत अनेक मिपाकरांप्रमाणे आम्ही
बेन्गळुरी चाकरी पत्करली त्याला आता जवळपास दोन वर्षे होत आली.
आता रोज हाटेलातले चापायला मिळणार म्हणुन झालेला आनन्द अजुनही आठवतो.
नव्याच्या नवलाईने पहिला महिना पनिर अमृतसरी, दाल साग, दहीवाले आलु वगैरे मनसोक्त ओरपले. पुण्यात असताना ही मन्डळी फ़ारशी चाखली नव्हती.
तसे हे प्रकार बरेच आवडले अजुनही आवडतात. पण फ़ुल्ल मिल्स
अर्थात पूर्ण जेवणाची सर यापैकी कशालाच नव्हती.
भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास
'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्यभारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता. विविध विद्यात पारंगत होता.
अमराठी मुलखात अस्सल मराठी बालनाट्य
हैदराबाद:
येथील 'रंगधारा' या नाट्यसंस्थेच्या वतीने दि. १२ मे २००८ पासून बालनाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. यात भाग घेणारी सर्व मुले अमराठी शाळेत शिकतात. त्यांना मराठी नीटसे बोलताही येत नाही. कारण घराबाहेर (क्वचित घरातही) असलेले अमराठी वातावरण. (मराठी वाचण्याची तर बातच सोडा. ) परंतु तरीही ती ८ ते १३ वर्षे वयाची मुले एक अस्सल मराठी बालनाट्य सादर करणार आहेत. ते आहे -"राजकन्येची बाहुली".
म. टा. मधे सुरु झालेले नवीन सदर , सेक्स न्यूज : नवं सेग्मेंट
म. टा. मधे सुरु झालेले नवीन सदर
सेक्स न्यूज : नवं सेग्मेंट
http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/3103033.cms
आपली प्रतीक्रीया ?
बीबी का मकबरा
नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.

मिसळपाव