वृत्ती-प्रवृत्ती..
प्रसंग पहिला
औरंगाबादमध्ये ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो. तिथल्या टिव्ही सेंटर नावाच्या भागात होतो. हा भाग मुख्य गावापासून तसा बराच दूर आहे. पुन्हा गावात यायचं होतं. डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये काम होतं. जवळच्याच रिक्षा स्टॅंडवर गेलो. तीन-चार जणांच्या कोंडाळ्यातून पन्नाशीच्या वयाचा एक बापुडवाणा चेहरा पुढे आला आणि 'चला साहेब' मी घेऊन जातो म्हणाला. रिक्षात बसलो. रिक्षा आंबेडकर कॉलेजच्या दिशेने निघाली.
वाटेत थोडं फार बोलणं झालं, त्यात रिक्षाचालक मुसलमान असल्याचे जाणवले. आंबेडकर कॉलेज म्हणून सुरवातीला या रिक्षावाल्याने चुकून मराठवाडा विद्यापीठात रिक्षा घुसवली. मला आत शिरतानाच जाणवलं काही तरी चुकतंय.
मिसळपाव
गंध अलौकिक याचा
क्षणभंगूर जीवन जरी
शुभ्र पाकळ्या कोमल
नाजूक नाभी शेंदरी
छंद समर्पाणाचा आगळा
वेड्याने त्या जोपासताना
मातीलाही गंध दिला
फांदीवरूनी ओघळताना
मैत्री व्हावी ऐसी
जिवाला जीव देणारी
जीवन ऐसे सार्थ व्हावे
पारिजात फुला परी...
- प्राजु