Skip to main content

संस्कृती

दमलेला बाबा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 19/06/2011 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रत्येक घराच्या दारात एक दमलेला बाबा आपल्या चिमण्यांची वाट पाहतांना दिसून येतो. घरच्या होममिनिस्टर त्यांच्याच तोऱ्यात असतात. त्या अन् त्यांचं ऑफिस यातच गुरफटलेल्या असतात. त्यांचं करिअर इतकं मोठ्ठं की सर्व भार बाबाच्या खांद्यावर येऊन तो धापाच टाकीत राहतो. वाणसामान, दुधबील, लाईटबील असे किरकोळ खर्च बाईसाहेबांच्या पेमेंट मधून तर फ्लॅटचा हप्ता, गाडीचा इ.एम्.आय. असे आकडे बाबाच्या खात्यातून परस्पर परागंदा होण्याची तरतूद बाबाने स्वीकारलेली असते. आणि मग तरीही त्याला वाढदिवसाची साडी, दिवाळीचा रत्नहार, मकरसंक्रांतीचा नेकलेस अशाची जुळवाजुळव आपल्याच खात्यातून करण्याची गोडगुलाबी सक्ती केली जाते.

मोहोर

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 19/06/2011 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
नियतीच्या सहस्त्रभुजांत अजस्त्र विक्राळ जोर आहे विधीलिखितावर अटळपणाची उमटलेली मोहोर आहे टेबलाशी, खुर्चीत एकेक खिडकीशी बसला चोर आहे उपोषणांवर वांझपणाची उमटलेली मोहोर आहे आग्रा कधी अमृतसर कधी मोहाली कधी लाहोर आहे मूक थडग्यांवर अहिंसेची उमटलेली मोहोर आहे जन्मानंतर तोडती नाळ जणू कापलेला दोर आहे अंतापर्यंतच्या भटकण्यावर उमटलेली मोहोर आहे भरल्या पोटी गातो गाणे निरंजन भाव विभोर आहे झगड्यावरती रोज लाखोंच्या उमटलेली मोहोर आहे

(वडा म्हणे मढ्याला)

लेखक प्रभो यांनी शनिवार, 18/06/2011 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा : कोणत्याही जातीवर चिखलफेक करण्याचा इरादा नाही. इनो घेऊन विडंबन वाचावे ही विनंती. प्रेरणा , वडा म्हणे मढ्याला, 'भलताच खास आहे' भात आहे बासमती, त्याचीच रास आहे. केले आहे पिंड, ठेवले आहे नदीकाठी अगं म्हशी, पण त्याला शिवणार कावळाच आहे. करे कधी सव्य अन कधी अपसव्य असे ते जानवे त्याला नेहमी हवेच आहे. दानं, फळे, सुपार्‍या अन् दक्षिणा भटाला, (जाणारे)पैसेच फक्त माझे? हा शुद्ध माज आहे!

***काळाराम मंदिर / श्री स्वामी समर्थ *** गिरगाव भटकंती.१

लेखक मदनबाण यांनी गुरुवार, 16/06/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
१) आत्माराम बुवांची समाधी (काळाराम मंदीर -गिरगाव) २) श्री दत्तात्रय (काळाराम मंदीर -गिरगाव) ३) श्री दत्तात्रय (काळाराम म

यू टू, क्रान्तिताई?

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 16/06/2011 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
शत्रूंच्या तलवारींना मी कधीच नाही भ्यालो मित्रांच्या टपल्यांनी पण मी अनन्वीत टेंगुळलो असं एका थोर कवीने म्हणून ठेवलेलंच आहे. तशीच काहीशी टेंगुळलेली अवस्था तुमची 'वड बोलला यमाला' ही कविता वाचून झाली. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली, स्वतःला कलाकार म्हणवून घेणाऱ्यांची जी मनमानी चाललेली आहे ती पाहून वीट यायला लागला आहे. सर्वसामान्य ज्यांना वंदनीय समजतात त्या व्यक्ती, संकल्पना, विभूती, परंपरा यांच्यावर हल्ला केल्याशिवाय आपलं श्रेष्ठत्व सिद्धच होत नाही असं यांना वाटत असावं. अशा विचारजंतांची यादी मोठी आहे.

धमाल मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 16/06/2011 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव खरडसम्राट, आमचे निकटचे स्नेही व आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर धमाल मुलगा, श्री. कैवल्य देशमुख यांचा आज, १६ जुन हा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या खरडवहीला असेच उधाण येत राहो, व त्यांनी आपल्या जालीय व जालाबाहेरील आयुष्यात यशाची नवनवीन शिखरे सर करावीत, हिच श्री गणेशाचरणी प्रार्थना. :) हॅपी बर्थडे धमाल, कीप रॉकिंग! :)

विक्रम आणि वेताळः अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि समभाव

लेखक नगरीनिरंजन यांनी सोमवार, 13/06/2011 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. पुन्हा चालत ज्या झाडावर ते प्रेत लटकत होते तिथे तो गेला आणि झाडावरून प्रेत काढून ते खांद्यावर घेत तो चालू लागला. दहा-बारा पावले चालला नसेल तोच प्रेतात बसलेला वेताळ खदाखदा हसू लागला. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून निग्रहाने विक्रम चालत राहिला. कसंबसं आपलं हसू आवरत वेताळ विक्रमाला म्हणाला, "विक्रमा, मला तुझं अत्यंतिक कौतुक वाटतं. ज्याचा आपल्याला यत्किंचितही फायदा नाही अशा गोष्टीत उठाठेव करण्याचा तुझा हा दुर्दम्य उत्साह खरोखरच कौतुकास पात्र आहे. आणि याचे कौतुक म्हणून तुला त्याबद्दल काहीतरी पारितोषिकही दिलेच पाहिजे.