Skip to main content

संस्कृती

पेठकरशेठ यांचे अभिनंदन

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 25/04/2011 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपले चविष्ट मिपाकर मा. श्री. प्रभाकर पेठकर यांचे कौतुक करणार लेख आज ओमान ट्रिब्युनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. पेठकरशेठ यांचे हार्दिक अभिनंदन! लेख येथे वाचा

"भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-८ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 24/04/2011 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
"भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-८ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय" मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे © सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने) या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत

एका व्यथित सॉफ्टवेअर इंजिनियरचे मनोगत!

लेखक विनीत संखे यांनी गुरुवार, 21/04/2011 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
शैशव, बाल्य, पौगंड, तारूण्य, गृहस्थ अन वार्धक्य अशा षटजीवनावस्थांमध्ये कैचर्य (असा शब्द कदाचित मराठीत सापडतो) किंवा कचेरीगिरी (साध्या भाषेत ऑफिसमनशिप) अंतर्भूत करावी असे माझ्यासारख्या नोकरमाणसाला वाटते. नवतारूण्याअंती, गृहस्थांगी अन वार्धक्यापूर्वी आपण आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा कालखंड खेचर म्हणून एका मळ्यात ओझं वाहत सोसतो. हे मळं म्हणजे ऑफिस होय. इंग्रज जाता जाता भारताला हा नोकरपणा आंदण देऊन गेले. तारुण्यसुलभ "जग जिंकायची इच्छा" ही उपजतच सगळ्यांत असते.

सुंदर माझा गाव !!!

लेखक परदेश् वासी तरिहि घाटी यांनी गुरुवार, 21/04/2011 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपा कर, मी एक नवीन मिपा कर आहे. सध्या व्हर्जिनिया टेक या अमेरिकन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हे विद्यापीठ वॉशिंगटन डीसी पासून ३०० मैलावर ब्लॅकस्‍बर्ग या छोट्याश्या गावात आहे. विद्यापीठाचा परिसर खूपच सुंदर आहे. नुकतेच मी काही फोटो घेतलेत. ते इथे सादर करत आहे. आशा करतो कि मिपा कर चांगला प्रतिसाद देतील. फोटोंवर प्रतिक्रिया दिल्यास अति उत्तम.

मुंबई विरुध्द पुणे ( आयपील क्रिकेट सामना)

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 20/04/2011 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत मुंबई विरुध्द पुणे अशा चर्चा/ भांडणे आपण अनेक ठिकाणी, अनेक वेगवेगळ्या संदर्भाने पाहिल्यात , रंगवल्यात या दोन्ही शहरांच्या नावापुढे 'कर' जोडून दोन्ही संस्कृतीतील फरक, स्वभावपैलू विविध ठिकाणी, अगदी संकेतस्थळांवरही विक्रमी चर्चा आपण केल्या आहेत. आज आयपील सामन्याच्या निमित्याने आज ही दोन्ही शहरे एकमेकांविरुध्द लढण्यास सज्ज झाली आहेत.

निमंत्रण - इंक्रेडीबल फोर्टस ऑफ इंडिया !

लेखक मालोजीराव यांनी मंगळवार, 19/04/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गअभ्यासक प्रमोद मांडे यांनी टिपलेल्या देशभरातील दुर्गांच्या छायाचित्र प्रदर्शनाला शुक्रवारपासून बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात सुरवात होत आहे. येत्या २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. सर्व दुर्गप्रेमी,शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील दुर्गम किल्ल्यांच्या छायाचित्रांसह कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, केरळ अशा विविध राज्यांतील किल्ल्यांची चारशेहून अधिक छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

कोल्हापुर वारी...

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 18/04/2011 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, नुकतीच पार पडलेली ज्योतिबाची यात्रा आणि महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात स्त्रियांना मिळालेला प्रवेश..... या निमित्ताने काही फोटूरूपी आठवणी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. ३१ डिसेंबर ...... नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण मुंबई नगरी पार्ट्या झोडण्यात आणि नविन वर्षाचे संकल्प करण्यात (की मोडण्यात) दंग होती आणि त्याच वेळेला कोणतीही पूर्वनियोजित तयारी नसताना कोल्हापूरला जाण्यासाठी आम्ही मुंबापुरीचा निरोप घेतला.