महेश लंच होम..
महेश लंच होम हा मुंबईतला एक बर्यापैकी जुना ब्रँड आहे. मुंबईत फोर्टात ७७ साली पहिलं महेश लंच होम निघालं आणि तेव्हापासून जुहू सेंटॉरला लागून, अंधेरीला साकीनाक्याजवळ, ठाणे आणि पुणे अशा अजून चार ब्रांचेस त्यांनी काढल्या.
एकदोनवेळा यातल्या ठाणे ब्रांचमधे गेलो होतो. पण तब्ब्येतीत नीट खाण्याचा योग आला नव्हता. म्हणून मग पाचसात मित्रलोकांनी कुठे जायचं असा चॉईस आला तेव्हा मी "महेश लंच होम" असं नाव घेतलं.
आता "महेश लंच होम" या नावावरुन साधारण एक खानावळवजा थाळी हॉटेल डोळ्यासमोर येईल की नाही? पण हे त्याच्या अगदी विरुद्ध आहे. एकदम हाय-फाय.
मिसळपाव
