Skip to main content

समाज

हिंदुत्ववादी आणि उजवे

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 10/09/2025 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात. आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय? १) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात. २) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात. ३) त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा परंपरा , हिंदू धार्मिक ग्रंथ हे मान्य असतात. ते त्यांची चिकित्सा करत बसत नाहीत.

माझ्या पुण्याचा माझा गणेशोत्सव

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 05/09/2025 या दिवशी प्रकाशित केले.
सात- आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. गणपतीचे दिवस होते. एरवी पुण्यात असताना कधी घरी गणपती बसवले नाहीत; पण दिल्लीत पांडे, गुप्ता, अरोडा, ब्रार, यादव, खान, मोइत्रा, रेड्डी, अय्यर अशा शेजार्‍यांच्या आग्रहामुळे दाही दिवस रोज घरी गणपतीची तबला - पेटी - ढोलकच्या साथीत जोरदार आरती व्ह्यायची. रोज एका घरातून बाप्पांसाठी प्रसाद यायचा. आमच्या घरी गेल्या दोन पिढ्यांत बनले नसतील इतके उकडीचे मोदक त्या एका आठवड्यात बनवले गेले होते. एकंदर धमाल होती. पण पुण्यातला गणेशोत्सव अर्थातच मिस करत होतो. असाच एक दिवस लवकर निघायच्या तयारीत असतानाच ऑफिसच्या डेस्कवरचा फोन वाजला. Long ring म्हणजे बाहेरचा फोन.

बैलपोळ्या निमित्ताने

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 22/08/2025 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर bull आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे.

स्वातंत्र्यदिन झाला, पण नागरीकांना स्वातंत्र्य आहे का?

लेखक स्वधर्म यांनी रविवार, 17/08/2025 या दिवशी प्रकाशित केले.
आधी पत्रकार राहूल कुलकर्णी यांचा हा रिपोर्ट पहा: ”पळून गेलेल्या बायकोसाठी आंदोलन… डीवायएसपीची पेकाटात लाथ! पोलिसांना असा अधिकार आहे का?“ जालनाचे पोलिस उपधिक्षक अनंत कुलकर्णी यांनी आपल्या मागणीसाठी उपोषण आंदोलन करणार्‍या नागरिकाला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ज्या त्वेषाने लाथ मारली ते पाहून एक नागरीक म्हणून रक्त उसळले. त्या कुटुंबातील छोटी मुलगी पण आपल्या काकांना पोलीस धरून नेत असताना असाहाय्यपणे मागे जात असलेली दिसते. तिच्या समोरच कुलकर्णी यांनी हा प्रकार केला.

चांगल्या बातम्या - १

लेखक राघव यांनी शनिवार, 16/08/2025 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! येथील चर्चेप्रमाणे हा धागा सुरु करत आहे. आपण सगळ्यांनी देखील जमेल तसा हातभार लावावा. Sowgood Foundation च्या संचालिका प्रगती चास्वाल यांनी आजतोवर दिल्लीमधील सरकारी आणि खाजगी अशा विविध शाळांमधून, ७२००० मुलांपर्यंत शेती आणि त्याविषयक जाणीव पोहोचवलेली आहे. आपल्या मुलाच्या भाज्यांविषयी असलेल्या नावडी वरून त्यांना मुलांना मातीसमवेत जोडण्याची गरज जाणवली आणि त्यातून त्यांनी हा उपक्रम सुरु झालाय.

चांगल्या बातम्या - एक उपक्रम!

लेखक राघव यांनी सोमवार, 11/08/2025 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स! खूप दिवसांपासून मनात एक विचार घोळतोय. येथे त्याबद्दल थोडी चर्चा कराविशी वाटली. आपल्याकडील मिडिया अट्टाहासानं नकारात्मक बातम्या देतांना आढळतो. टीव्ही पाहणं बंद करून टाकावं इतकं ते नकारात्मक असतं, मनांवर वाईट परिणाम करणारं असतं. खासकरून जेव्हा आपण आपल्या परिवारासमवेत टीव्ही पाहत असतो त्यावेळेस हे ठळकपणे जाणवतं. अगदी वर्तमानपत्रातून देखील एखादी सकारात्मक, सर्जनशील बातमी शोधून काढावी लागते. आणि बर्‍याचशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत हेही तेवढंच खरं. म्हणून एक उपक्रम सुरु करावासा वाटला. चांगल्या, सकारत्मक, सर्जनशील बातम्या/माहिती पुढे आणण्याचा.

शाप की आशीर्वाद?

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 04/08/2025 या दिवशी प्रकाशित केले.
शाप की आशीर्वाद? ========== -राजीव उपाध्ये ...हा मला मिळालेला शाप की आशीर्वाद माहित नाही, पण त्यामुळे टॉक्सिक लोकांच्याकडून माझ्या प्रगतीत अडथळे खुपच निर्माण झाले आहेत. मला मी विठ्ठल सीताराम गुर्जरांचा पणतू आहे (गुर्जरांची सख्खी बहिण माझी सख्खी पणजी) याचं शाळेत असल्यापासून खुप भारी वाटत असे. ९वीत असतांना मी शाळेच्या वार्षिकात त्यांच्यावर लेख लिहायचे ठरवले आणि आजोबांना (आईच्या वडिलांना) सांगितले. आजोबांनी टुणकन उडी मारून मला सर्व मदत करायचे ठरवले.

हम किसी भी हद तक जा सकते है|

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 25/07/2025 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=Dt8FOiyA72E वरील एका प्रकरणात न्यायाधीशांनी स्वतः सर्वासमक्ष चालू कोर्टात संबंधित अधिकार्‍याला फोन लावला आणि प्रकरण समजाऊन घेतले आणि समस्या सोडवली. ही तत्परता खालच्या कोर्टात दिसली तर जनतेचा न्यायालयांवरचा विश्वास वाढेल. अल्पोळी धाग्याबद्दल क्षमस्व!

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

लेखक आर्या१२३ यांनी बुधवार, 23/07/2025 या दिवशी प्रकाशित केले.
मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक "हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर!

रेकमेंडेशन लेटर

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 23/07/2025 या दिवशी प्रकाशित केले.
रेकमेंडेशन लेटर ========== पूर्वप्रसिद्धी - फेबु, ऑगस्ट २०२४ माझ्या आईवडीलांनी मला बरंच काही दिलं, पण त्यात काही गुण द्यायचे ते विसरले. ते जन्मत: मिळाले असते तर आतापर्यंतचे आयुष्य जास्त सोपं गेलं असतं... हे गुण कोणते? - कोडगेपणा, गेंड्याची कातडी आणि हलकटपणा हे तीन गुण तुमच्यामध्ये असतील तर नैतिक प्रश्नांचे त्रांगडं सोडविणे फारसे त्रासदायक होत नाही. अनेक वर्षांपूर्वी माझ्या एका अत्यंत बुद्धीमान मित्रामुळे आलेला एक गमतीदार अनुभव आजही स्मृतीमध्ये ताजा आहे. तर झालं असं की हा माझा मित्र आय० आय० टी० मध्ये राष्ट्रपतींचे सुवर्णपदक विजेता होता.