Skip to main content

समाज

वाट !!

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 30/11/2011 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
वाटा तश्या अनेक असतात. प्रत्येकाची आपापली वेगळी असते. वाटा फ़ुटतात, वाटा हरवतात, वाट मिळते, वाट सापडते. वाट पाहिली जाते, वाट दावली जाते, अन वाट लावलीही जाते. कधी कधी आपल्याआपण वाट लागतेही. वाटा चोखाळल्या जातात, जोखल्या जातात. वाट वळणाची असते, वाट निसरडी असते, कधी वाटा वेगळ्या होतात, कधी वाट वाकडी करुन येण होत, अन कधी वाकड्या वाटेला जाण ही होत. कुणी आपापल्या वाटेने जात असतो, कुणास वाट दाखविणारा भेटतो, कुणी वाट अडविणारा असतो. कुणी वाट राखतो, कुणी वाट मारी करतो. कधी कधी वाटेला जायच नसत.गप आपापली वाट धरायची असते. वाटेला धरुन चालायच असत. तश्या वाटा तुम्ही आम्ही खुप पाहिलेल्या असतात.

क्रांतीतै चे अभिनंदन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 28/11/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील सदस्या क्रांतीतै हिला विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक साहित्य पुरस्कारांत नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार 'असेही-तसेही' या गझलसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. पुरस्कार दि. १४ जानेवारी २०१२ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी वर्धा इथे प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु. ५०००/- आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

मी मराठी.नेट लेखन स्पर्धा २०१२

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 25/11/2011 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी मराठी.नेटवर नेहमी नवनवीन योजना राबवल्या जातात, त्यातील एक लेखन स्पर्धा. मागील वर्षी घेतलेल्या लेखन स्पर्धेला व कविता स्पर्धेला सर्वांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी मराठी सर्वांचा ऋणी आहेच. या वर्षी देखील आपण एक लेखन स्पर्धा घेत आहोत लेखन स्पर्धा २०१२ यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा आणि लेखन स्पर्धेत भाग घेऊन भाषा समृद्धीच्या प्रयत्नात आपला वाटा उचलावा ही विनंती. स्पर्धा १० डिसेंबर २०११ सकाळी १० वा.