Skip to main content

समाज

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १० इस मोड़ से जाते हैं . . (अंतिम)

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 23/10/2015 05:44 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

बायपास...

लेखक आनंद कांबीकर यांनी शुक्रवार, 23/10/2015 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
खुप मजा यायाची गावांत. पूर्वी एवढा पैसा कधीच दिसायचाच नाही. व्यवहार ज्वारी, बाजरी आणि गहु यांवर चालायचे. आठाभर बाजारी घातली कि हप्ताभरच्या चहाची सोय व्हायची. लोकं कष्टाळु होती तशीच प्रेमळ ही खुप होती. कुना एकाच्या दुःखावर अख्खी गल्लीच काय तर गांव गोळा व्हायचा. हाड़ाचं वैर असलं तरि दवाखाना म्हटलं कि उतरंडीत ठेवालेले पै पैसे निघायचे. अडल्या बाळंतनीला तालुक्याला नेयाला निम्म्यारातिला गाड्या जूपायच्या. पण ती अडदंड सड़क गावाला घासुन गेली अणि गांव बदलला. गावाचा भूगोल बदलला तसेच मानसशास्त्र हि बदलले. लोकांना पैस्याचा हव्यास जड़ला. कारखाने आले, मोठ मोठी दुकानं थाटली. लांडगी वाढली.

मूठभर खजूर [पूर्वार्ध]

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 22/10/2015 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
मूठभर खजूर [पूर्वार्ध] (El Tayeb Salih यांच्या 'A Handful of Dates' या कथेचा स्वैर अनुवाद. ही कथा मूळ अरेबिक मध्ये लिहिली गेली, नंतर तिचे इंग्रजीत भाषांतर झाले.) नेमके वय नाही आठवत आता, पण खूप लहान होतो. आजोबांबरोबर बाहेर पडलो, कि गावातले लोक प्रेमाने माझे गालगुच्चे घ्यायचे, डोक्यावर हळूच टपली मारायचे.... आता हे असलं काही, ते माझ्या आजोबांबरोबर करायचे नाहीत! वडील कधीच नाही, पण आजोबा मात्र मला नेहमी त्यांच्या बरोबर बाहेर घेऊन जात. दररोज भल्या सकाळी मी कुराणपठनासाठी मशिदीत जाई. ती मशीद, ती शेते, ती नदी.....आमच्या जगण्याचे आधार! माझ्या वयाची इतर मुले मात्र मशिदीत जायला,कुराणपठन करायला कुरकुरत.

फेर..

लेखक आनंद कांबीकर यांनी गुरुवार, 22/10/2015 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
एस टी तुन उतरलें तेव्हा बरीच रात्र झालेली. पाऊस थांबला असला तरी ढगांचा निचरा झाला नव्हता. पुन्हाकधी बरसायला सुरुवात होईल याचा नेम नव्हता. तिथुन गांव अजुन कोस भर दुर. लवकर गांव गाठायला हवं तसच ओढाही भरला असल याचा अंदाज घेत त्याने मधली वाट धरली. मधेच एखादी विज चमकायची अाणि वाट दिसायची. तो वाट काढत समोर तर दोन वर्षाच्या चिमुरडीला छातीशी कवटाळुन ती त्याच्या मागं. पायाला चिखलाची लगदाळं चिकटलेली. मधेच एखादा काटा पायात घुसुन रक्तासगट बाहेर यायचा, आग मस्तकाला भिडायची. पोरगी सारखी बिमार पडते. गांवातल्या डॉक्टरला बरेचदा दाखवलं पर पोरीला गुण येईना. सारखी रडत असते.

श्रद्धाळु

लेखक आनंद कांबीकर यांनी गुरुवार, 22/10/2015 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
जे दिसतं, खरं असतं ते पटत नाही. जे अस्तित्वात नसतं नुसतं भासतं त्याच्यासाठी तंडायचं. इतिहासातल्या कथेपायी एक मेकायला तोडायचं. भाकर दुसरेच भाजतात आपण पेटुन राख व्हायचं. कोपर्यातल्या म्हतारीला कधी उठून तांब्याभर पानी नाही द्यायचं अण् झेंडे घेऊन रानोरानभटकायचं. 'तो' सर्वत्र आहे म्हणायचं वरतुन दगडापुढं रात्रंदिस रांग धरायचं. 'त्याला' ही हे पटत नसल पोट धरून 'तो' ही हसत असल. उपासातापासाने 'तेव' पावला असता तर रसत्यावरचा भिकारी रास्त्यात मावला नसता. आपण रक्ता-घामाच्ं टाकून पेटी भरतो आणि पुजारी गाड्यात फिरतो

झोपडपट्टीतले दिवस: भाग एक

लेखक तर्राट जोकर यांनी गुरुवार, 22/10/2015 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही तेव्हा झोपडपट्टीत राहायचो, रेल्वेच्या जागेत अतिक्रमण झालेली अठरापगड जातींच्या सरमिसळीची गोधडी. एक मोठा निळा फडका आणि बाकीचे छोटे छोटे रंगीबिरंगी ठिगळ असलेली. शहराच्या आजूबाजूच्या शेकडो गावांतून इथे दोन-चार, दोन-चार करत आलेली, मोलमजुरी, हमालीचं काम करणारी बिर्हाडं. आवसेला न चुकता डडंग-डंग...चिक...डडंड-डंग....डडंग-डंग...चिक...डडंड-डंग करत येणारा स्वच्छ कपड्यातला, अगदी वारकरी वाटणारा मांग.

कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 21/10/2015 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे कुणा बोलुनी कोण चुकले बघा रे कुणी होत वाचाळ थयथय उगाच कुणी शांत राहून ठेवीत जाच कसे सिद्ध होईल श्रेष्ठत्व त्याचे असे सैन्य नाठाळ ज्या राजियाचे कृतीतून ठरते इथे कोण वाघ मुखे बोंबलोनी करी काय सांग एकीत असते रहस्य यशाचे तुम्हाला महत्व न पटले अशाचे तुम्ही स्वाभिमानात धन्य जहाला तिथे एक चेहरा भुलवतो जगाला असे वेळ हाती न वागा असे रे कशाला करावे स्वतःचे हसे रे इथे संधी सर्वांस आहे समान भूतापरी हो जपा वर्तमान जसा जन्मतः वाघ ना वाघ झाला करोनीच हो दाखवा या जगाला -अपूर्व ओक ब्लॉग दुवा हा

नवरात्र जल जागर : माळ नववी

लेखक नाखु यांनी बुधवार, 21/10/2015 09:19 या दिवशी प्रकाशित केले.

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ९ ऋषीकेशमधून प्रस्थान

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 20/10/2015 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

नवरात्र जल जागर : माळ आठवी

लेखक नाखु यांनी मंगळवार, 20/10/2015 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी... माळ आठवी...