Skip to main content

राहणी

कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 27/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे. जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते?

मानवी स्पंज आणि स्प्रिंग!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 24/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील.

लयास गेले कधीच ते -

लेखक विदेश यांनी सोमवार, 16/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
लयास गेले कधीच ते रामराज्य ह्या भूमीवरचे आता इथल्या रामातही काही उरला नाही राम .. रावण पैदा झाले इथे सीताही जिकडे तिकडे वानरसेना बहुत जाहली म्हणती न कुणि राम राम .. संकटात जरि असते सीता मदतीला कुणि धावत नाही आता इथल्या सीतेलाही शोधत नाही कुठला राम .. महिमा कलीयुगाचा ऐसा मिळून राहती रावण राम सीता रडते धाय मोकलुन झाले सगळे नमक हराम .. .

वजन कमी करणारा आहार

लेखक बाबा पाटील यांनी बुधवार, 04/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
वजन कमी करणारा आहार १) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे. २) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी. ३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा. ४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री

वरुणदेवाचे पहिले दर्शन.....

लेखक निनाद जोशी यांनी सोमवार, 02/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
परवा यावर्षी पहिल्यांदा वरुण देवाने दर्शन दिले. त्या आधी हि तो आला होता. पण का कुणास ठाऊक एखादा पोस्टमन जसा हळूच दरवाज्यातून पत्र टाकून दुसऱ्या घराकडे वळतो , तसाच तो आला आणि आपल्या जलधारांची छोटीशी पिशवी रिती करून गेला. सकाळी जेव्हा उठलो तेव्हा जाणवल कि काहीतरी वेगळ वाटतंय. जीवाची होणारी तगमग , अंगाची होणारी लाही लाही अचानक कमी झाली होती .हवेत एक प्रकारची प्रसन्नता आली होती. बाहेर येऊन बघतो तर सर्व अंगणभर पाणी !!!! म्हणतल हे केव्हा झालं ???? काही न कळवता ,काही संकेत न देता पाहुणा आला अन गेला ही !!!! असं का केल असावं त्याने ?

मदतकेंद्र: सल्ला , मार्गदर्शन, साहाय्य, समुपदेशन

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 27/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लग्नाला १० वर्षे झालीत मला दोन मुले आहेत माझे मि खूप दारू पितात घरात सारखे तणाव राहतात मि ग्राम प कामाला आहे मि शाळे वर कामाला जाते पार्लर टाकले पण चालत नाही ते घरात आम्हाला पैसे देत नाहीत आई वडील काही म्हणत नाहीत माझे सासरे देखील दारू पितात गांजा पितात पता खेड तात तसेच मासाहार करतात पै कमी पडले कि बहिण आई त्या दोघांना देते .कृपया मला मदत करा त्यावर उपाय सागा सेवा काय करू कि वाद होणार नाहीत माझ्या जवळ पैसे येतील . -सौ स. श. रा.

लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे

लेखक खटासि खट यांनी बुधवार, 25/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो हल्लीच एका धाग्यावर प्रतिसाद देत असताना आमची गोची जाहली. धाग्याचा विषय होता लिव्ह इन रिलेशन(एस). यावर एक लंबुळका विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद देण्याचे मनी आले असता "आधी केले मग सांगितले " हे तुकावचन आठवोन हात बधिरले. तरी याकारणाने अंतरात जो न्यूनगंड उसळी मारू पाहतो आहे तो शमविण्याचा कंड म्हणोन आपणास या विषयीचा अनुभव घेतला पाहीजे असे वाटू लागले आहे. तरी जाणकारांनी खुलासा करावा. (शिवकालीन मोड ऑफ) १. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ? २. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ? ३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ? ४.

कर्त्याचे उत्तरदायित्व

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 05/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान महोदय, सादर प्रणाम, (हे पत्र २०१२ साली, तत्कालीन पंतप्रधान श्री.मनमोहनसिंग ह्यांना उद्देशून लिहिलेले असले तरी आजही ते संदर्भहीन झाले आहे असे नाही. वाचून सांगा की, याबाबत आपण काय म्हणता?) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आज पासष्ट वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरी अजूनही, भारतात कर्त्यास त्याचे उचित उत्तरदायित्व सुपूर्त करण्यात आलेले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मी हे का म्हणत आहे ते आधी स्पष्ट करतो. भारतातील सर्वात प्रमुख व्यवसाय शेतीचा आहे असे मानले जाते. सरकार नागरिकांकडून कर प्राप्त करून त्याचे बळावर शासन-व्यवहार चालवत असते. थेट कराचा मुख्य हिस्सा प्राप्ती कर समजला जातो.

देवस्थाने आणि भटजी....

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 23/01/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट. मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव.

आर्ट ऑफ द स्टेट - भाग ०२

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 20/01/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आर्ट ऑफ द स्टेट भाग -०१ http://misalpav.com/node/29885 ' हेम्या, आय अ‍ॅम व्हेरी सॉरी, मी खुप घाबरलो होतो, माझी फॅमिली, पोरी त्यांचं भविष्य, मी घाबरलो होतो रे खुप, माफ कर मला हेम्या माफ कर' भाग -०२ 'माफी अन बिना शिक्षेची, माणसांवरचा विश्वास कधीच उडालाय रे माझा, शिक्षा करणारच तुला, तसा नाही सोडणार, घाबरु नकोस शिक्षा पैशाचीच असेल आणि आयुष्यातुन उठवणार नाही तुला एवढं लक्षात ठेव.' - एवढं वाक्य दिसलं, अन माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली, जाग आली तेंव्हा मी बेडवर झोपुन होतो, बायको समोर बसुन होती, अन दोन्ही पोरी तिला बिलगुन उभारल्या होत्या.