भ्रमणमंडळाची स्थापना !!!
म्युन्स्टर (जर्मनी)दि. १८.०८.०८ (प्रतिनिधी) : जर्मनीतील मिपाकरांची बैठक शनिवार दि. १६ .०८.०८ रोजी श्री. लिखाळ यांच्या म्युन्स्टर ,जर्मनी येथील सदनिकेत घेण्यात आली. सदर बैठकीत मिसळपाव भ्रमणमंडळ,जर्मनी शाखेची स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
ह्या आनंदाच्या क्षणी विडंबनाचार्य केशवसुमार, स्वाती ,दिनेश ,सौ व श्री लिखाळ उपस्थित होते. त्याचबरोबर श्री.विपिन चिंचाळकर हे मिपाचे पाहुणेही ह्या ऐतिहासिक प्रसंगास साक्षी होते. सौ.
मिसळपाव
चतुर. एक साधा किटक. पण थेट काही दशके मागे नेणारा. शाळेतले दिवस आठवायला लावणारा. फुलपाखरे, टाचण्या आणि चतुर हे विशेष कुतुहलाचे विषय. काही मुले फुलपाखरे पकडायची व बाटलीत ठेवायची. मग ती मेल्यावर पंख पुस्तकात घालायचे! हा प्रकार मला कधीच आवडला नाही. त्या काळी प्रकाशचित्रणाचा नाद नव्हता आणि अक्कलही नव्हती (अजुनही नाहिये म्हणा; पण हातात क्यामेरा तर आहे?)
मला चतुर आणि टाचण्या अधिक आवडायच्या. चतुर बरे. दबकत जाऊन पकडायचे आणि शेपटाला बारीक घागा बांधुन पतंगासारखे उडु द्यायचे.

२. पक्ष्याच्या डोळ्यातून (bird's eye view :) )
.
.
(फिरता प्राणी) बबलु-अमेरिकन...