सुटकेस ६
सकाळी उठलो. चांगले प्रसन्न वाटत होते. आंघोळ वगैरे करून काऊंटरवरच्या म्हाताऱ्याला हिशोब दिला. आणि रस्त्यावर आलो. एका हॉटेलमध्ये फाफडा की काय तसले खाल्ले. आणी वडापने अहमदाबाद ला जायला निघालो. दोन अडीच तासांचा प्रवास मोठ्या मुश्कीलीने काटला. काल रात्री आपल्या हातून भयंकर गोष्ट घडली. गांज्याच्या नशेने माणूस एवढे उत्तेजित होते? काही कळेना. कदाचित माझ्याच मनात आतमध्ये कुठेतरी असे काही करायची सुप्त ईच्छा दडली असावी. पण पुन्हा असल्या फंद्यात पडायचे नाही असे मनोमन ठरवले.
वडाप अहमदाबादमध्ये घुसले तसे रोख चारशे रूपये देऊन उतरलो. आळस झटकून तोंड धुतले. आणि एक हॉटेलमध्ये नाष्टा केला.
मिसळपाव