Skip to main content

कथा

Jonbenet Ramsey..........(सुधारीत)

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 07/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
(सुधारीत) वाईट नशीबाने ज्याला दु:ख भेटल त्यांसाठी पण राखुन ठेवा.............हल्लीच खुप दीवसांनी नजरेत आल हे नाव............ Jonbenet Ramsey Killer is not yet found!!! Indian Police Jindabad!!!! http://www.youtube.com/watch?v=-H_rjoZxuQM

सॉक्रेटीसचा मृत्यू : ३९९ बी.सी.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 30/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सॉक्रेटीसचा मृत्यू : ३९९ बी.सी. मग रक्तरंजित क्रांती झाली. मरणाला न घाबरता, आपापल्या विचारांशी ठाम रहात लोकांनी मृत्यूलाही कवटाळायला कमी केले नाही. या युध्दामधे लोकशाहीवाद्यांचा विजय झाला, तेव्हाच सॉक्रेटीसचे भवितव्य ठरले गेले. कारण स्पष्ट होते. तो एक बुध्दीवादी आणि तरुणांना बिघडवणारा तत्वज्ञानी होता ना ! तरूणांना वादविवादांची धुंदी त्याच्या शिकवणीमुळेच तर चढली होती. तरूणांची बुध्दी व मती भ्रष्ट करणार्‍या माणसाला जगण्याचा आधिकार द्यायचा प्रश्नच उद्‌भवत नव्हता.

तर्पणाची छाया

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 28/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तर्पणाची छाया
दि. ४ मार्च २०१० "प्रथम पत्नीला स्मरून रामेश्वरच्याकिनाऱ्यावर तर्पण कर" अशी आज्ञा नाडी महर्षींनी केली त्याप्रमाणे मी ३४ वर्षानंतर सौ.छायाला तर्पण करायला मी रामेश्वरमच्या तटावरील समुद्रात सुर्याकडे हात जोडून उभा होतो. तेंव्हा एक वाक्य. क्षणात तरळून गेले. "छाया मी तुझ्या मृत्यूला नकळत का होईना जबाबदार आहे. त्यासाठी तू मला माफ कर. मला माझ्या जबाबदारीच्या त्या बोचणीतून सोडव." डोळ्यातून अश्रु टपकले.

दास्तान एका (खरड) वहीची...

लेखक फटू यांनी बुधवार, 26/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन पुर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवातल्या कुठल्याच गोष्टीशी कोणताही संबंध नाही. या लेखाचा शेवटचा बराचसा भाग वाचताना मिपाच्या कुणा सन्माननिय सभासदाची खरडवही जशीच्या तशी उचलून इथे चिकटवली आहे असे वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ही गोष्ट आहे आमच्या सोसायटीतल्या दोन लहान मुलांची. खरं तर एका लहान मुलाची आणि एका लहान मुलीची. मुलाचं नाव गणनायक आणि मुलीचं नाव सुखदा. गणनायक आमच्या सोसायटीच्या बी विंगमधल्या नातलग काकांचा मुलगा. तर सुखदा आमच्याच ए विंगमधल्या कुलकर्णी काकांची मुलगी. गणनायकला खरं तर सारी सोसायटी तसेच आमच्या शाळेतील मुलं गण्या म्हणूनच हाक मारतात.

जटायु - लेखक शिरीष रागणेकर

लेखक नन्या यांनी मंगळवार, 18/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच 'जटायु' हे पुस्तक वाचण्यात आले. लेखकाने आपल्या आयुष्यात, आलेले अनुभव लिहीले आहेत. आपणापेकी कोणी हे पुस्तक वाचले आहे का?

सत्यकथा: भाकड म्हैस!!

लेखक वसंत वडाळकर_मालेगांव यांनी रविवार, 16/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविकः साल १९६८... भंडारा... कृत्रीम रेतन केंद्र (कृत्रीम रेतनाद्वारे गायी व म्हशीला गर्भधारणा करण्याचे केंद्र) दुपारची वेळ. पोष्टमन टपाल देणास आत आला. ते रजिस्टर टपाल होते. नवीनच रुजू झालेल्या साहेबाने ते तपाल घेतले. साहेबाने टपाल फोडले व ते वाचू लागले. तसे त्यांच्या चेहेर्‍यावरचे हाव भाव बदलू लागले. जवळ उभा असलेला शिपाई व बाजूला बसलेला डॉक्टर, साहेबांचा चेहेरा न्याहाळत होते. साहेबांनी दोघांना जवळ बोलावले व त्यांना एका कागदावर सह्या करायला सांगितले. दोघांनी त्या कागदावर सह्या केल्या.