Skip to main content

क्रीडा

आण्णा पळसुल्यासोबत पैज हारलो.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 26/04/2010 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
ललित मोदीं आणि मंडळींचा वादाच्या भोवर्‍यात असलेला आयपीएल सामना अखेर संपला एकदाचा.. आजच्या शेवटच्या सामन्यावर करोडोंचा सट्टा लागला होता म्हणे.. मी मात्र मधल्यामध्ये फुक्कटचा २५ रुपये हारलो.. (आपली ऐपत तितकीच! आधीच साला आपला धंदा डाऊन आहे!) "तात्या, उगाच काय 'सचिन!', 'सचिन!' म्हणून नाचतोस? संघाला जेव्हा खरोखरंच गरज असते तेव्हा सचिन कधीही काही करिश्मा करत नाही.. आज देखील तस्संच होईल बघ! मुंबै इंडियन्सवाले हारतील आज.. लावतोस २५ रुपयांची पैज?" माझा मित्र आण्णा पळसुले. मग मीदेखील सचिनच्या भरवश्यावर आण्णा पळसुल्यासोबत तावातावाने २५ रुपयांची पैज लावली.

भेट आभाळांची..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 24/04/2010 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आज सचिनचा वाढदिवस.. सर्वप्रथम त्याला सार्‍या मिपा परिवारातर्फे वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! त्याची डोळे दिपवून टाकणारी उत्तमोत्तम फटकेबाजी आम्हाला यापुढेही बघायला मिळावी हीच शुभकामना.. इथे मी काही सचिनच्या खेळाबद्दल भाष्य करणार नाही. त्याकरता मॉर्गनसारखे दिग्गज समर्थ आहेत.. मी सांगणार आहे एक आठवण.. खुद्द सचिननेच कुठल्याश्या दिवाळी अंकात सांगितलेली. तो कुठलासा मुलाखतवजा लेख होता एवढं नक्की आठवतंय. पण कुठला दिवाळी अंक हे आता आठवत नाही.. परंतु १९९५/९६चा सुमार असेल..

आमच्या तेंडल्याचा वाढदिवस !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 23/04/2010 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
सच्या भावड्या तुझा वाढदिवस आला..... आमच्या साठी २४ एप्रिल हा "सचिन दिवस" ! खोटं नाही सांगत - ह्या दिवशी आम्ही घरी गोडधोड करतो.... तू खेळत नसलास तर तुझ्या खेळींची चित्रफीत बघतो. आणि आम्ही गेल्या वर्षभरात काय काय बरोबर - चूक केलं त्याचा हिशोब मांडून तुझ्यासारखं काहीतरी (आमच्या लायकीनीच रे!) करायचा संकल्प करतो. ह्या वर्षी तर खूप मोठं सेलेब्रेशन होणार ! आयपीएल मध्ये ज्या पद्धतीनी मुंबईचा संघ हाताळलायस, जसा काय खेळलायस... आणि हो की रे !

पुन्हा एकदा लढत ६४ घरांच्या विश्वविजेतेपदाची!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 22/04/2010 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
तारीख २० एप्रिल २०१०. तब्बल ४० तासांचा थकवणारा प्रवास करुन विश्वनाथन आनंद बायको अरुणा समवेत अखेर एकदाचा बल्गेरियाची राजधानी सोफियाला पोचला आणि माझ्यासारख्या लाखो रसिकांनी सुटकेचा निश्वास सोडला! आईसलँडमधल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने तो फ्रँकफर्टला चार दिवस अडकून पडला होता आणि शेवटी त्याला गाडीने जावे लागले. तो आणि त्याचा आव्हानवीर बल्गेरियाचा वेसेलीन टोपालोव ह्यांच्यातला विश्वविजेतेपदाचा सामना २३ एप्रिलला सुरु होतोय.

द नवाब ऑफ नजफ़गढ़!

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 15/04/2010 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
"वीरेंदर सेहवाग सलग दुसर्‍या वर्षी 'विस्डेन क्रिकेटर ऑफ द ईयर' पुरस्काराचा मानकरी!" पेपरात हा मथळा वाचला आणि का कोण जाणे मन तडक मेलबर्नला पोहोचलं. १९५ धावांची केवळ अप्रतिम अशी खेळी खेळून षटकारानं द्विशतक पूर्ण करण्याच्या हौसेपायी सायमन कॅटीच या एका टुकार पार्ट टाईम बॉलरच्या एका अतिटुकार चेंडूवर डीप मिडविकेटला ब्रॅकनच्या हाती एक साधासोपा कॅच देऊन बाद होणारा वीरू आठवला. आपले द्विशतक हुकले याचं खचितही दु:ख नव्हतं महाराजांच्या चेहर्‍यावर. पण आपल्या त्या एका सामान्य फटक्यामुळे भारताने सामना गमावला (आणि कदाचित ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऑस्ट्रेलियात मालिकाविजयाची सुवर्णसंधीही!) याचं शल्य बोचत होतं त्याला.

अभिनंदन छोटा डॉन!

लेखक महेश हतोळकर यांनी शुक्रवार, 26/03/2010 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
छोटा डॉनच्या ब्लॉगची सकाळने घेतलेली दखल! http://www.esakal.com/esakal/20100325/5160732294887613459.htm * फॉरवर्डमधून या पाट्या सगळीकडे प्रसारित होत असल्या, तरी २२ मार्चला एका ब्लॉगमध्ये ही पोस्ट सर्वप्रथम झळकलीय. 'छोटा डॉन' नावाच्या या ब्लॉगवरची मुळ पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रियाही जरूर वाचा. लगे रहो डॉन भाई. अभिनंदन.

फिर आया मौसम आयपीएल का !

लेखक जयवी यांनी सोमवार, 15/03/2010 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
फिर आया मौसम आय पी एल का । पुन्हा एकदा धूमधडाका आय पी एलचा. मनोरंजन का बाप …इति सोनी टिव्ही :)
पुन्हा ते तासनतास टीव्ही ला चिकटून बसणं, पुन्हा संध्याकाळच्या सगळ्या कार्यक्रमांना कात्री !! टिव्ही वर फक्त सोनी मॅक्स !! गेल्या दोन वर्षांपासून ह्या आय पी एल नं जो काही धुमाकूळ घातलाय ना की ज्याचं नाव ते ! त्या ललित मोदीला एक कडक सॅल्यूट !! त्याने हे जे काय प्रकरण सुरु केलंय त्याला खरंच तोड नाही. पैशांचा पाऊस पाडून खेळाडूंना त्याने आकर्षित केलं आणि प्रेक्षकांनाही ! मला क्रिकेटमधलं फार काही कळतं अशातला भाग नाही.

कारभारी गोपाळे!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 12/03/2010 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीच्या आसपासचे अंगावर काटा मारणारे थंडीचे दिवस. सायकल दामटत शाळेत निघालो होतो. उललेल्या ओठांवर बोचर्‍या वार्‍याने चुरचुरत होतं. डोळ्यांना झोंबरं वारं लागून पाणी येत होतं. पहाटेच्या अंधारात सायकल स्टँडला लावून कुलूप घातले. किल्ली खिशात टाकली. तालमीच्या लाकडी दरवाज्याजवळ दबकत दबकत गेलो. जोर घुमवणार्‍या पोरांचे आवाज कानावर आले.. "हुंयक हुंय्या!" - "हुंयक हुंय्या!" "हुंयक हुंय्या!" - "हुंयक हुंय्या!" हळूच दरवाजा लोटून आत डोकावलो. डावीकडे जमिनीलगत समोरासमोर दोन भलेमोठे आरसे लावलेले होते आणि त्याच्यासमोर दोन्ही बाजूला पोरे एकमेकांकडे तोंडे करुन जोर घुमवत होती!