मी पण पळालो...
पुणे मँरेथॉनच्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास लकडीपुलावर प्रचंड गर्दी होती... बरेचजण आमच्या सारखेच पहिल्यांदा मँरेथॉन मधे भाग घेत होते... सगळे चेहरे आनंदी आणि उत्साही होते... वातावरण एकदम वेगळच भारावलेलं होतं... एका शब्दात सांगायच झालं तर प्रचंड "युफोरिया" होता वातावरणात... खालच्या नदी शेजारच्या रस्त्यावर बरेचजण warmup साठी पळत होते...
"पश्या, warmup साठी नको पळायला... आत्ताच दमलो तर मेन रेस राहून जाईल" रव्या
"हो बे... रेसच्या वेळेस सुरुवातीला हळू पळूत म्हणजे warmup होवून जाईल..." मी
पुणे मँरेथॉनच्या आदल्या दिवशी रव्याला फोन केला तर म्हणाला... "नको बे... मी नाही पळत...
मिसळपाव