मॅरेथॉन शर्यत- शहरांचा शरीर आणि मानसिक आरोग्य आरसा
मुंबई मॅरेथॉन मधे माझ्या सहकाऱ्यांपैकी ३ जण - २ अर्ध व १ पूर्ण मॅरेथॉन धावले, शर्यत पुर्ण केली. त्यांच्या उत्साहाकडे आणि अनुभवाकडे पाहून मॅरेथॉन एका वेगळ्या नजरेने पाहिल्याची जाणीव झाली. त्यांची वये ३० शीच्या आसपास. त्यांचे अनुभव दुसऱ्या दिवशी ऐकून हे जाणवले की, हे शहरी लोक नुसता हौशी उत्साह न दाखवता शर्यत पुर्ण करु शकले हा काही योगायोग नव्हे.
शहरातील आजचे जगणे पाहता - त्यात रोज बाहेरील खाणे आले, कामाचा व इतर सगळा ताण आला, रोजचा प्रवास, ह्याची गोळाबेरीज केली तर शहरी लोकांची शारीरीक क्षमता कशी टिकून राहील असा प्रश्न पडेल.
मिसळपाव
आनंद एक असामान्य खेळाडू तर आहेच पण अतिशय नम्र, विनयशील आणि साधा माणूस आहे. आपल्या यशाचे श्रेय तो आई-वडील आणि पत्नी अरुणा ह्यांना देतो.
२०१० साली होणार्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रशियन खेळाडू वेसेलिन टोपालोव हा त्याचा आव्हानवीर आहे. विजेतेपदाचा मुकुट टिकवण्याची तयारी आनंद करतोय.
त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे खास अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!!